Lokmat Sakhi >Shopping > पणत्या घरीच रंगवायचं ठरवताय? मग हे घ्या 'रंग'; घरच्याघरी बनवा डिझायनर पणत्या

पणत्या घरीच रंगवायचं ठरवताय? मग हे घ्या 'रंग'; घरच्याघरी बनवा डिझायनर पणत्या

पणत्या रंगवणं, त्यांना सजवणं अशी खूप खूप कामे आपल्याला दिवाळीच्या दिवसात स्वत:ची स्वत:लाच करावी वाटतात. तुमचंही असंच झालं असेल आणि यंदा पणती घरीच रंगवायची असं ठरवलं असेल, तर मग या घ्या काही सोप्या टिप्स....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 02:11 PM2021-10-27T14:11:40+5:302021-10-27T14:12:20+5:30

पणत्या रंगवणं, त्यांना सजवणं अशी खूप खूप कामे आपल्याला दिवाळीच्या दिवसात स्वत:ची स्वत:लाच करावी वाटतात. तुमचंही असंच झालं असेल आणि यंदा पणती घरीच रंगवायची असं ठरवलं असेल, तर मग या घ्या काही सोप्या टिप्स....

Diwali special: Do you decide to paint diya at home? Then take this colour and Make designer diya at home | पणत्या घरीच रंगवायचं ठरवताय? मग हे घ्या 'रंग'; घरच्याघरी बनवा डिझायनर पणत्या

पणत्या घरीच रंगवायचं ठरवताय? मग हे घ्या 'रंग'; घरच्याघरी बनवा डिझायनर पणत्या

Highlightsदिवाळीत जर पणत्यांना रंग द्यायचा असेल तर साधारण दिवाळीच्या चार ते पाच दिवस आधी तुम्ही या कामाला लागा.

दिवाळीच्या दिवसात सगळ्यात मानाचं स्थान असतं ते पणतीला. एवढीशी पणती, तिचा उजेडही एवढासा. पण तरीही तिच्यातलं पावित्र्य, मांगल्य सगळ्या सणाचा आनंदच द्विगुणित करतं. गेरु रंगाच्या पणत्या तर बाजारात अगदी सहजच मिळतात. पण त्या पणत्यांचं सौंदर्य जर अधिक खुलवायचं असेल, तर आपण त्याला घरच्याघरी अगदी छान पद्धतीने रंगवू शकतो. रंगवलेल्या पणत्या बाजारात दुप्पट- तिप्पट दराने मिळतात. म्हणूनच मग एवढ्या महागड्या रंगीत पणत्या घेण्यापेक्षा स्वस्तात मिळणाऱ्या पणत्या घ्या आणि घरच्याघरीच त्याला मस्त रंग देऊन सुंदर बनवा. 

 

असा द्या पणत्यांना रंग 
- दिवाळीत जर पणत्यांना रंग द्यायचा असेल तर साधारण दिवाळीच्या चार ते पाच दिवस आधी तुम्ही या कामाला लागा.
- पणत्यांची खरेदी आठवडाभरापुर्वी करा.
- पणत्या घेतल्या की एक पुर्ण दिवस त्या पाण्यात भिजत ठेवा.
- त्यानंतर पणत्या उन्हात ठेवा आणि एक- दोन दिवस पुर्णपणे सुकू द्या.
- पणत्या पुर्णपणे सुकल्यानंतरच त्याला रंग द्यावा.
- ॲक्रॅलिक, फायब्रिक किंवा पर्ल असे कोणतेही रंग आपण पणत्यांना देऊ शकतो.
- यापैकी कोणताही एक रंग घ्या आणि पेंटींगच्या ब्रशने पणत्यांना रंग द्या.
- यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडेल ते शेड निवडू शकतो.
- एका पणतीला दोन रंग वापरूनही शेडींग करता येते. पण दोनपेक्षा अधिक रंग वापरू नका. कारण ते खूपच भडक दिसेल आणि पणत्यांचे मुळ सौंदर्य निघून जाईल.
- पणतीला दिलेला रंग वाळल्यानंतर त्यावर मोती, कुंदन, खडे असे रंग देऊन सजवा.

 

पणत्या ठेवण्यासाठी तयार करा स्टॅण्ड
- पणत्या ठेवण्यासाठी बांगड्यांचे एक सोपे स्टॅण्ड करता येते. या स्टॅण्डवर पणत्या ठेवल्या तर त्या निश्चितच अधिक चांगल्या  दिसतील. 
- स्टॅण्ड बनविण्यासाठी आपल्याला जुन्या, उपयोगात नसलेल्या बांगड्यांचा वापर करायचा आहे.
- ज्या रंगात तुम्ही पणत्या रंगवल्या आहेत, त्याचा कॉन्ट्रास्ट रंग स्टॅण्ड बनविण्यासाठी वापरा. जेणेकरून स्टॅण्ड आणि पणत्या दोन्ही उठून दिसेल. 


- आता स्टॅण्डसाठी जो रंग निवडला, त्या रंगाची लोकर घ्या आणि बांगडीला गुंडाळा. लोकर बांगडीभोवती फक्त गोलाकार गुंडाळा. बांगड्यांच्या दोन टोकांभोवती लोकर गुंडाळू नका. 
- यानंतर बांगडीला एखादी सोनेरी लेस अशा पद्धतीने गुंडाळा की बांगडीच्या मधोमध पणती लेसचे एक छान फुल तयार झालेले दिसेल.
- आता या बांगडीच्या काठांवर वेगवेगळे माेती, कुंदन लावा आणि बांगडीला आकर्षक पद्धतीने सजवा.
- अशा सजविलेल्या बांगडीवर पणती ठेवली तर ती निश्चितच अधिक खुलून दिसेल. 

 

Web Title: Diwali special: Do you decide to paint diya at home? Then take this colour and Make designer diya at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.