Lokmat Sakhi >Shopping > दिवाळी स्पेशल : व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी खास संधी! विशेष प्रदर्शन आणि उद्योजिका विकास मार्गदर्शन शिबिर

दिवाळी स्पेशल : व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी खास संधी! विशेष प्रदर्शन आणि उद्योजिका विकास मार्गदर्शन शिबिर

Diwali Special Exhibition and Entrepreneurship Development Mentoring Camp: पुण्यात धायरी येथे आयोजित महिला उद्योजिकांसाठी खास वस्तूविक्री प्रदर्शन आणि व्यवसाय मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 03:11 PM2024-10-11T15:11:31+5:302024-10-11T15:19:40+5:30

Diwali Special Exhibition and Entrepreneurship Development Mentoring Camp: पुण्यात धायरी येथे आयोजित महिला उद्योजिकांसाठी खास वस्तूविक्री प्रदर्शन आणि व्यवसाय मार्गदर्शन

Diwali Special: Special opportunity for business women! Special Exhibition and Entrepreneurship Development Mentoring Camp | दिवाळी स्पेशल : व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी खास संधी! विशेष प्रदर्शन आणि उद्योजिका विकास मार्गदर्शन शिबिर

दिवाळी स्पेशल : व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी खास संधी! विशेष प्रदर्शन आणि उद्योजिका विकास मार्गदर्शन शिबिर

Highlightsया शिबिराच्या माध्यमातून, प्रदर्शन, बल्क विक्री ,कॉर्पोरेट कनेक्ट सारख्या संधी, कर्ज व सबसिडी मिळण्यासाठी सहाय्य अशा प्रकारच्या अनेक उपक्रमाचा लाभ उपस्थित महिला उद्योजकांना मिळणार आहे.

“यशस्विनी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित” व “झेप उद्योगिनींची” यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान महिला उद्योजिकांना प्राप्त होण्यासाठी विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी मुक्ताई गार्डन मंगल कार्यालय, धायरी, पुणे येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या दरम्यान हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ( राज्यमंत्री योजना ) रुपाली चाकणकर, आणि महाराष्ट्राच्या लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थाकीय संचालक राजेंद्र निंबाळकर (IAS)हे उपस्थित राहणार आहेत. या शिबिराच्या माध्यमातून व्यवसाय योजना तयार करण्याची कौशल्ये, व्यवसायात आवश्यक विविध परवाने मिळून देण्यास सहाय्य, परदेशात व्यवसायाची संधी, निर्यात वाढविण्यासाठी मार्गदर्शन तसेच उद्योजकांचे आर्थिक नियोजन याबाबत सरकारी अधिकाऱ्यांसह अन्य तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.


या शिबिरात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. नंदकिशोर नैनवाड,( डेप्युटी संचालक, कृषी आयुक्तालाय, पुणे), तेजोमय घाडगे,( जिल्हा संसाधन PMFME योजना, कृषी विभाग, पुणे), शिवाजी देसाई (सेवानिवृत्त सहायुक्त FDA, आणि अन्न उद्योग सल्लागार), पी एन शेट्टी, (सीईओ एमएसएमई भारत मंच, रुपी बॉस फायनानशियल सर्व्हिसेस), सचिन दिनकर निवांगुणे (अध्यक्ष कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, CAIT महाराष्ट्र राज्य), अक्षय श्रीधर राणे ( एक्झिमवाला -संचालक, डायनॅमिको इंपेक्स, आयात निर्यात तज्ज्ञ व प्रशिक्षक) प्रा. आर्शिया कपूर (एम आय टी कला, डिझाईन आणि तंद्रज्ञान विद्यापीठ पुणे),  चंद्रहास गोपिनाथ रहाटे (इस्टेट आणि संपत्ती निर्माण एक्सपर्ट, सीईओ सी जी आर फिनटीम, सिओटी ( यूएसए), पौर्णिमा मनीष शिरीषकर (इक्वीटी मार्केट एकस्पर्ट, एम डी - डे टू डे प्रॉफिट) यांचे विशेष मार्गर्शन लाभेल.


या शिबिराच्या माध्यमातून, प्रदर्शन, बल्क विक्री ,कॉर्पोरेट कनेक्ट सारख्या संधी, कर्ज व सबसिडी मिळण्यासाठी सहाय्य अशा प्रकारच्या अनेक उपक्रमाचा लाभ उपस्थित महिला उद्योजकांना मिळणार आहे.  या कार्यक्रमाचे आयोजन झेप उद्योगिनींची संस्थेच्या संस्थापक पौर्णिमा मनीष शिरीषकर, यशस्विनी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या अध्यक्षा  सुनीता राजाराम डांगे तसेच श्र्वेता इंटरप्रायजेसच्या ललिता अमोल सोंडकर या धडाडीच्या उद्योगिनींनी केले आहे. 
या शिबिरास व प्रदर्शनास भेट देऊन आपल्या उद्योजक भगिनींना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबीर व प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी संपर्क: सौ पूर्णिमा मनीष शिरीषकर-९५९४८२५८०१

Web Title: Diwali Special: Special opportunity for business women! Special Exhibition and Entrepreneurship Development Mentoring Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.