प्रत्येक ऋतूंनुसार आपण आपल्या वॉर्डरोबमधील रोजच्या वापराचे कपडे बदलत असतो. उन्हाळा सुरू होण्याआधीच वातावरणातील काहिली वाढू लागली आहे. ज्याचा थेट परिणाम आपले सौंदर्य आणि त्वचेवर होतो. उन्हाळ्यांत आपण जीन्स, जॅकेट असे जाड कपडे घालू शकत नाही. या काळात आपण असेच कपडे घालायला हवे जे आपल्या त्वचेसाठी आरामदायक असतील. यांनुसार उन्हाळ्यात, हलक्या रंगाचे आणि आरामदायक कपडे घालण्यास प्राधान्य दिले जाते. उन्हाळातील कपडे निवडताना ते स्टायलिश असण्यासोबत आपल्या त्वचेसाठी आरामदायक असतील या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
उन्हाळा म्हटलं की काहीजणांना भरपूर घाम येतो. यामुळे उन्हाळ्यात असे कपडे घालावे की ज्यामध्ये घामापासूनही आराम मिळतो. या सिजनमध्ये आपण शक्यतो सैल, फिकट रंगांचे, हवेशीर, मोकळेढाकळे कपडे घालणे पसंत करतो. अशा कपड्यांमुळे शरीराचे तापमान नियंत्रीत राहण्यास मदत होते. याशिवाय उन्हाळ्यातही ट्रेन्डी व फॅशनेबल कपडे परिधान करून, आपणसुद्धा कुल लुक कॅरी करू शकता. उन्हाळ्यांत वापरण्यासाठी कुर्त्यांचे ५ ट्रेंडी पॅटर्न आपल्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच असायला हवेत(From Anarkali To Flared : 5 Trendy Kurta Styles To Ace Your Spring-Summer Look).
नक्की कोणते आहेत ते कुर्ती पॅटर्न...
१. स्ट्रेट कट कुर्ती (Straight cut kurti) - कुर्ती पॅटर्नसचा विचार केल्यास, स्ट्रेट कट कुर्ती पॅटर्न हा कुर्त्यांमध्ये सगळ्यांत लोकप्रिय असणारा पॅटर्न आहे. स्ट्रेट कट कुर्ती या लांबलचक ढोपराच्या खालपर्यंत पोहोचतील इतकी त्यांची उंची असते. प्लाझो, चुडीदार, किंवा क्रॉप पॅन्टसोबत स्ट्रेट कट पॅटर्नमधील कुर्ते परिधान केल्यास ते दिसण्यास अधिक छान दिसते. आपला फॉर्मल किंवा कॅज्युअल लूक पूर्ण करण्यासाठी विविध पॅटर्न, प्रिंट्स व रंगांच्या स्ट्रेट कट कुर्त्यांची योग्य ती निवड करावी. या पॅटर्नमधील कुर्ते ५०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत बाजारांत विकत मिळतात.
२. फ्लेयर्ड कुर्ती (Flared kurti) - लेटेस्ट आणि मॉडर्न स्टाइल असलेली ही फ्लेयर्ड कुर्ती खूपच आकर्षक दिसते. ही कुर्ती लॉन्ग लेंथ आणि फ्लेयर्ड पॅटर्नमध्ये असते. फ्लेयर्ड कुर्ती या नावांवरूनच आपल्याला समजलं असेल की या कुर्तीला दोन्ही बाजुंनी फ्लेयर्ड असतात. यामुळेच या पॅटर्नला फ्लेयर्ड कुर्ती असे म्हटले जाते. या पॅटर्नच्या कुर्त्यांमध्ये कॅज्युअल किंवा फिट-अँड-फ्लेअर असे दोन पॅटर्न असतात. जर आपल्याला एखाद्या पार्टीसाठी एकदम लाईट हलका लूक हवा असेल तर आपण फ्लेयर्ड कुर्तीचा पर्याय निवडू शकता. ऑफिस पार्टी किंवा इतर छोट्या मोठ्या सणांसाठी आपण एम्ब्रॉयडरी किंवा ऍप्लिक वर्क केलेला फ्लेयर्ड कुर्ती परिधान करु शकता. या पॅटर्सनच्या कुर्त्यांना खाली असणारा घोळ व दोन्ही बाजुंनी असणाऱ्या फ्लेयर्ड हेमलाईन्समुळे आपण परफेक्ट पार्टी रेडी लूक तयार करु शकतो. फ्लेयर्ड कुर्ती १००० रुपयांपासून सुरुवात करून, त्याचे प्रिंट्स, एम्ब्रॉयडरी वर्क यांच्यानुसार त्यांची किंमत वाढत जाते.
३. अनारकली कुर्ती (Anarkali Kurti) - अनारकली कुर्ती हा पॅटर्न देखील कुर्त्यांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा व बहुतेकजणींचा आवडता पॅटर्न आहे. अनारकली कुर्त्यांना पडणाऱ्या कळ्यांमुळे तो दिसताना फारच छान आणि उठून दिसतो. अनारकली कुर्ती पॅटर्न आपला एथनिक लूक पूर्ण करण्यास मदत करतो. अनारकली कुर्तीमध्ये भरपूर रंग, पॅटर्न, प्रिंट्स असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. यातून आपल्याला आवडेल किंवा आपल्याला शोभून दिसेल असा पॅटर्न निवडावा. प्रिंटेड अनारकली कुर्ती किंवा सुंदर नाजूक बॉर्डर असलेली प्लेन अनारकली कुर्ती देखील एखादया छोटेखानी फॅक्शनला आपण परिधान करु शकता. अनारकली कुर्ती एखाद्या खास फंक्शनसाठी किंवा कॅज्युअल ओकेजनसाठी देखील ट्राय करू शकता. फेस्टिव्ह, पार्टी, ऍनिव्हर्सरी आणि वेडिंग फंक्शनमध्ये वापरण्यासाठी अनारकली कुर्ती अतिशय बेस्ट ऑप्शन्स ठरते. अनारकली ड्रेसेसची किंमत थोडी महागच आहे. १,५०० रुपयांपासून सुरु होऊन पुढे २००० ते ३००० किमतीच्या रेंजमध्ये संपूर्ण अनारकली सेट विकत मिळतो.
४. जॅकेट स्टाईल कुर्ती (Jacket-style kurti) - जॅकेट स्टाईल कुर्ती आपल्याला पारंपरिक व वेस्टर्न असे दोन्ही लूक घेऊ शकतो. एखाद्या समारंभासाठी जर आपल्याला फ्युजन लूक हवा असेल तर आपण जॅकेट स्टाईल कुर्तीचा पर्याय निवडू शकता. जॅकेट स्टाईल कुर्तीमध्ये, आपण आत एखादे प्लेन टॉप व त्यावर प्रिंटेट जॅकेट घालू शकता. जेव्हा आपण जॅकेट असलेली कुर्ती घालता तेव्हा आपल्या एक प्रकारचा आकर्षक लुक मिळतो. कुर्त्यावर जॅकेट घालताना ते आतील टॉपच्या विरुद्ध रंगांचे किंवा त्या रंगाला मिळते जुळते घालावे, यामुळे आपला लूक अधिकच उठावदार दिसेल. जॅकेट स्टाईल कुर्ती खाली परिधान करण्यासाठी आपण जीन्स, प्लाझो, चुडीदार, जेगिंग्स, स्ट्रेट पॅण्ट्स, लेगिंग्स असे अनेक पर्याय निवडू शकता. जॅकेट स्टाईल कुर्ती साधारणपणे १,५०० ते २००० च्या किंमतीत विकत मिळतात.
५. फ्रंट स्लिट कुर्ती (Front slit kurti) - फ्रंट स्लिट हा कुर्तीचा पॅटर्न कायम ट्रेंडमध्ये असतो. फ्रंट स्लिट कुर्तीचा पॅटर्न बऱ्याच सेलिब्रिटीजचा आवडता कुर्ती पॅटर्न आहे. फ्रंट स्लिट कुर्ती खाली आपण जीन्स, प्लाझो, धोतीज व त्यावर दुपट्टा असा लूक करु शकता. फ्रंट स्लिट कुर्ती बाजारांत ५०० ते १०० रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये मिळू शकतात.