Join us

आलिया भटची गुलाबी साडी आवडली? १ हजार रुपयांहूनही कमी किमतीत करा तिच्यासारखा बार्बी लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2023 17:46 IST

Alia Bhat's Look in Rocky Aur Rani Kii Prem Kahaani: खूप पैसे खर्च करण्याची मुळीच गरज नाही. अगदी हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत आलिया भटसारखा पिंक साडीतला स्टनिंग बार्बी लूक (Pink saree barbie look) करता येऊ शकतो. त्यासाठीच या खास टिप्स..

ठळक मुद्देअगदी हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत तुम्हाला आलिया भटसारखा स्टनिंग बार्बी लूक करता येऊ शकतो. 

सध्या आलिया भट (Alia Bhat) आणि तिच्या वेगवेगळ्या साड्या खूपच चर्चेत आहेत. आलिया भट आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) या दोघांच्या प्रमुख भूमिका असलेला 'रॉकी और राणी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यामुळे आलिया सध्या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. प्रत्येक कार्यक्रमातच आलियाची एक नवी झलक पाहायला मिळतेय आणि तिच्या जवळपास सगळ्याच लूक्सची जबरदस्त चर्चा होते. आता सध्या आलियाच्या गुलाबी साडीतल्या (Pink saree) बार्बी लुकची चांगलीच चर्चा रंगली आहे. या गुलाबी साडीमध्ये आलिया 'देसी बार्बी' दिसत आहे, अशी कमेंट तिच्या चाहत्यांनी तिला दिली आहे. तुम्हाला जर तिचा हा स्टनिंग बार्बी लूक आवडला असेल, तर अगदी हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत तो करता येऊ शकतो. 

 

चित्रपटाच्या प्रमोशन संदर्भात मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत आलियाने ही गडद गुलाबी रंगाची शिफॉन साडी नेसली होती. सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या या साडीचा ब्लाऊजही गुलाबी रंगाचा आणि वेलवेटचा होता. अतिशय कमी दागिने घालूनही आलिया या साडीमध्ये कमालीची सुंदर दिसत होती. गुलाबी रंगाच्या साडीवर तिने ऑक्सिडाईज दागिने घातले होते. कानात मोठे झुमके, हातात ऑक्सिडाईज अंगठी, नाकामध्ये नोजपीन आणि कपाळावर काळ्या रंगाची मोठी गोलाकार टिकली, असा एकंदरीत तिचा लूक होता. शिवाय मेकअपही अगदी हलकासा होता. तरीदेखील ती अतिशय आकर्षक दिसत होती.

 

आता तिच्या या साडीची किंमत काही हजारांमध्ये असू शकते. पण थोडासा शोध घेतला तर ऑनलाईन शॉपिंग साईटवर अशी साडी अगदी पाचशे ते सहाशे रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही साडी खरेदी केली आणि त्यावर तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारातून २००- ३०० रुपये खर्च करून ऑक्सिडाईज ज्वेलरी घेतली तर अगदी हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत तुम्हाला आलिया भटसारखा स्टनिंग बार्बी लूक करता येऊ शकतो. 

Click To Buy

https://www.amazon.in/dp/B09CNWNNRS?th=1

 

टॅग्स :खरेदीसाडी नेसणेआलिया भटरणवीर सिंग