गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या आलियाच्या (Alia Bhatt's floral print collection) साड्यांची जबरदस्त चर्चा आहे.. एवढंच नाही तर या साड्यांच्या माध्यमातून आलियाने यावर्षीचा summer trend सेट केला आहे, असंही फॅशन वर्ल्डमध्ये बोललं जातं.. आता तुम्ही साडीचे चाहते असाल आणि उन्हाळ्यासाठी साड्यांचं काही खास कलेक्शन करण्याचा तुमचा विचार असेल तर हे काही स्वस्तात मस्त पर्याय नक्की ट्राय करून बघा..
उन्हाळ्यात कॉटन, लिनन साड्यांना जशी मागणी असते, तशीच शिफॉन साड्यांनाही महिलांची पसंती मिळते. यातही गार्डन किंवा फ्लॉरल प्रिंट साड्या अधिकच भाव खाऊन जातात. ऑफिस किंवा कॅज्युअल अशा दोन्ही प्रकारांसाठी तुम्ही या साड्यांची निवड करू शकता. आलियाच्या साड्या तर डिझायनर आहेत, त्यामुळे त्याच्या किमतीही नक्कीच अव्वाच्या सव्वा आणि सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणाऱ्या असणार यात वाद नाही.. पण लोकल मार्केटमध्ये थोडासा शोध घेतला किंवा मग ऑनलाईन पर्याय तपासून पाहिले तर नक्कीच आपल्याला तशाच प्रकारच्या काही साड्या स्वस्ताही मिळू शकतात..
१. पांढऱ्या रंगातली ही शिफॉन साडी ऑनलाईन साईटवर अवघ्या २०० रूपयांत उपलब्ध आहे.. उन्हाळ्यात अशा फिक्या रंगांचा ट्रेण्ड असतोच. त्यामुळे साडी आवडली असेल तर फार विचार न करता घेऊन टाका.... Click to Buy-https://bit.ly/3MyA8rJ
२. हलका गुलाबी शेड असणारी ही ऑर्गेंझा साडी १२०० रूपयांत ऑनलाईनसाईवर उपलब्ध आहे. सध्या ऑर्गेंझा आणि फ्लोलर या दाेन्ही प्रकारच्या साड्यांचा ट्रेण्ड आहे. त्यात जर हे दोन्ही ट्रेण्डी प्रकार तुम्हाला एकाच साडीत मिळत असतील तर क्या बात है.. या साड्यांमध्ये अनेक रंग उपलब्ध आहेत. Click to Buy-https://bit.ly/3CftC41
३. आलियासारखी जॉर्जेट प्रकारातली ही साडी घ्यायची असेल, तर सध्या या साडीवर घसघशीत सुट देण्यात आली आहे. २९९९ ही या साडीची मुळ किंमत असून सध्या ऑनलाईन साईटवर ही साडी अवघ्या ९९९ रूपयांत उपलब्ध आहे.. पांढरी साडी आणि त्यावर गाेल्डन थ्रेडमधली एम्ब्रॉयडरी असा लूक नक्कीच खास दिसेल. Click to Buy-https://www.amazon.in/dp/B09TFTMFLD