Join us  

पावसाळी चप्पल खरेदी करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, नाहीतर ऐन पावसाळ्यात दुखतील पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 2:13 PM

Easy tips to choose the best footwear for monsoon पावसाळी चप्पल टिकाऊ तर हवीच, पण पायांची काळजी म्हणूनही ४ गोष्टी महत्त्वाच्या

पावसाळा सुरु झाला की, प्रत्येक घरात छत्री, रेनकोट खरेदीसाठी लगबग सुरु होते. प्रत्येक ऋतूनुसार चप्पलांची देखील खरेदी होते. पावसाळ्यात अनेक भागात पाणी साचते, चिखलातून वाट काढून जावे लागते. या सगळ्यात चपलांमुळे पाय सटकून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर पावसाळी चप्पलांशिवाय रस्त्यावर चालत असाल तर, पायांना इजा होऊ शकते. यासह चालताना कपडे देखील खराब होतात. पायांना इन्फेक्शन होते, ते वेगळंच.

परंतु, अशावेळी असा प्रश्न पडतो की, पावसाळ्यात नेमके कोणते चप्पल, शूज खरेदी करावे? पावसाळी चप्पल खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? जर आपण देखील पावसाळी चप्पल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, या ४ टिप्स फॉलो करायला विसरू नका(Easy tips to choose the best footwear for monsoon).

सोल तपासून खरेदी करा

पावसाळ्यात अनेकदा चप्पलांमुळे पाय सटकून पडण्याची शक्यता जास्त असते. कारण या दिवसात रस्त्यांमध्ये पाणी आणि चिखल साचते. अशावेळी चप्पलांची सोल मजबूत असेल तर, पाय सटकणार नाहीत. जर चप्पलांची सोल निकृष्ट दर्जाची असेल तर, चप्पल लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे चप्पल खरेदी करताना सोल तपासून घ्या.

जेवलीस का? J1 झाले का विचारणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी दिला रट्टा, पोस्ट व्हायरल

वॉटर प्रुफ

पावसाळ्यात चप्पल  वॉटर प्रुफ आहेत की नाही हे तपासा, चप्पल जर वॉटर प्रुफ असतील तर, ते लवकर झिजणार नाहीत. असे चप्पल संपूर्ण पावसाळा ऋतू टिकतात.

फ्लिप फ्लॉप किंवा क्रोक्स

सध्या फ्लिप फ्लॉप - क्रोक्सचा ट्रेण्ड आहे. अनेक लोकं या चप्पलांचा वापर करतात. फ्लिप फ्लॉप चप्पल खरेदी करताना त्याची ग्रीप नीट तपासून घ्या. पावसाळ्यात चांगल्या ब्रँडचे चप्पल खरेदी करा.

१०१ वर्षांच्या आजीचा भार खांद्यावर वाहत कावड यात्रेला निघालेल्या नातवाची कमाल, २७० किलोमीटर पायी प्रवास

फिकट रंगाची चप्पल खरेदी करा

अनेक लोकं न्यूड कलरला पसंती दर्शवत आहेत. न्यूड कलर क्लासी दिसतात. न्यूड कलरची चप्पल एथनिक व वेस्टर्न पोशाखात सूट करते. त्यामुळे पावसाळी चप्पल खरेदी करताना सिंपल - न्यूड कलरची चप्पल खरेदी करा.

टॅग्स :मोसमी पाऊससोशल मीडियासोशल व्हायरल