Lokmat Sakhi >Shopping > स्मृती इराणी यांचे इमोशनल आवाहन; करें नारीसे खरीदारी! पोटासाठी दिवाळीत राबणाऱ्या 'तिला' मदत करणार ना..

स्मृती इराणी यांचे इमोशनल आवाहन; करें नारीसे खरीदारी! पोटासाठी दिवाळीत राबणाऱ्या 'तिला' मदत करणार ना..

दिवाळीची खरेदी आणि महिला उद्योजकता यांच्या अनुशंगाने केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांनी एक अतिशय भावनिक पोस्ट नुकतीच सोशल मिडियावर शेअर केली आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 02:45 PM2021-11-02T14:45:35+5:302021-11-02T14:47:21+5:30

दिवाळीची खरेदी आणि महिला उद्योजकता यांच्या अनुशंगाने केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांनी एक अतिशय भावनिक पोस्ट नुकतीच सोशल मिडियावर शेअर केली आहे. 

Emotional appeal of Smriti Irani; Shop from women! help her for growing her business | स्मृती इराणी यांचे इमोशनल आवाहन; करें नारीसे खरीदारी! पोटासाठी दिवाळीत राबणाऱ्या 'तिला' मदत करणार ना..

स्मृती इराणी यांचे इमोशनल आवाहन; करें नारीसे खरीदारी! पोटासाठी दिवाळीत राबणाऱ्या 'तिला' मदत करणार ना..

Highlightsसध्या दिवाळीनिमित्त देशभरातच खरेदीची धुम सुरू आहे. म्हणूनच खास या प्रसंगी स्मृती इराणी यांनी समस्त भारतीयांना एक भावनिक आवाहन केलं आहे.

दिवाळीची खरेदी सगळीकडेच सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच वेळ कमी आणि कामं जास्त अशी गत जवळपास प्रत्येकाचीच झाली असल्यामुळे भराभर वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल आहे. दिवाळी हा वर्षाचा मोठा सण. यानिमित्ताने अगदी प्रत्येक शहराच्या बाजारपेठेत कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असते. उद्योजकतेला वाव देण्यात तर दिवाळीसारखा दुसरा सण नाही. म्हणूनच दिवाळीची खरेदी आणि उद्योजकता यांच्यावर आधारीत एक पोस्ट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतीच सोशल मिडियावर शेअर केली आहे.

 

स्मृती इराणी सोशल मिडियावर कायम अपडेट असतात. सोशल मिडियाच्या माध्यमातून विविध घटनांशी कनेक्ट होण्याचा त्यांचा प्रयत्न कायमच चर्चेचा विषय असतो. आता सध्या दिवाळीनिमित्त देशभरातच खरेदीची धुम सुरू आहे. म्हणूनच खास या प्रसंगी स्मृती इराणी यांनी समस्त भारतीयांना एक भावनिक आवाहन केलं आहे. ''इस दिवाली करें नारी से खरीदारी....'' असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून केला आहे. 

 

दिवाळीच्या सुमारास प्रत्येकाच्या मागेच अनेक कामे असतात. घरातली, बाहेरची सगळीच जबाबदारी सांभाळताना तर महिलांची विशेष दमछाक होते. वेळची जुळवाजुळव करून दिवाळीची कामे कशी उरकावी हा एक मोठा प्रश्न बायकांसमोर असतो. त्यामुळे मग अनेकदा ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय निवडला जातो. बदलत्या काळानुसार खरेदी करण्याचे ते एक चांगले माध्यम असले तरी यामुळे स्थानिक उद्योगांना मोठा फटका बसतो, असे एका वर्गाचे मत आहे. त्यामुळेच ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करा आणि त्यांचे उद्योग वाचवा असे आवाहन कायम केले जाते. 

 

स्मृती इराणी यांनी केलेले आवाहनही थोडेसे याच आशयाने जाणारे आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये त्या म्हणतात की दिवाळीनिमित्त अनेक जणी वेगवेगळे व्यवसाय सुरु करतात. त्यांचे काम, त्यांचा व्यवसाय वाढावा, अशी त्यांची माफक अपेक्षा असते. यासाठी त्यांची धडपड सुरू असते. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी झगडणाऱ्या या महिलांना एक मदतीचा हात द्या. तसेच या दिवाळीची खरेदी महिला उद्योजकांकडूनच करण्याचा प्रयत्न करा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला नेतृत्व विकाससंदर्भात असणाऱ्या दृष्टीकोनाला साथ द्या, असे त्यांनी सांगितले आहे. 

 

आपल्या प्रत्येकाच्याच माहितीत अशा अनेक महिला उद्योजक असतात, ज्या त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. कुणी फराळ विकतात तर कुणी पणत्यांवर अतिशय सुरेख सजावट करतात. कुणी आकाशदिवा बनवतात तर कुणी उटणं, सुगंधी तेल यांची निर्मिती करतात. दिवाळी म्हणजे भेटवस्तूंची देवाण- घेवाण. खरे पाहिले तर आपल्यालाही अशा अनेक महिला माहिती असतात, ज्यांच्याकडे खूप कला असते आणि त्या अनेक कलात्मक वस्तूंची निर्मिती करत असतात. या महिलांनी बनविलेल्या अनेक वस्तू आपण निश्चितच कुणाला तरी भेट म्हणून देऊ शकतो. अशा सगळ्या छोट्या- छोट्या गोष्टींचा विचार करा आणि महिला उद्योजकांकडूनच यंदाची दिवाळी खरेदी करण्याचा प्रयत्न करा,असं स्मृती इराणी यांनी सांगितलं आहे. 

 

स्मृती इराणी यांनी शेअर केलेला व्हिडियो अवघ्या काही मिनिटांचा असला तरी खूपच मोठा संदेश देणारा आहे. या व्हिडियोच्या सुरुवातीला वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्या अनेक महिला काम करताना दिसत आहेत. कुणाला तरी आपण पैसे देणारच आहोत ना, मग या महिलांना द्या. त्यांना मदत करा. कारण या महिला श्रीमंत होण्यासाठी नाही, तर त्यांच्या पोटासाठी, त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी हा व्यवसाय करत आहेत, हे लक्षात घ्या. तुमचा मदतीचा एक हात त्यांच्या उद्योजकतेला हजारो हातांचं बळ देणारा असेल, असा मोठा संदेश या व्हिडियोतून देण्यात आला आहे. सध्या सोशल मिडियावर स्मृती इराणी यांची पोस्ट आणि हा व्हिडियो खूपच व्हायरल झाला आहे. 
 

Web Title: Emotional appeal of Smriti Irani; Shop from women! help her for growing her business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.