Join us  

कपाटात असायलाच हवेत या ५ रंगाचे ब्लाऊज; कोणत्याही साडीवर मॅच होतील-परफेक्ट लूक मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 8:31 PM

Fashion Tips : आजकाल मार्केटमध्ये तुम्हाला रेडिमेड ब्लाऊज बरेच पाहायला मिळतील.

साडी नेसायला सर्वांनाच आवडते. साडीवर शोभून दिसेल असे स्टाईलचे ब्लाऊज अनेकजण शिवून घेतात. (Styling Tips) साडीला आकर्षक लूक देण्यासाठी आणि स्टायलिंगसाठी परफेक्ट ब्लाऊज डिजाईन्स निवडणं फार महत्वाचं असतं कारण ब्लाऊजमुळेच साडीला आकर्षक लूक येत असतो. आजकाल मार्केटमध्ये तुम्हाला रेडिमेड ब्लाऊज बरेच पाहायला मिळतील. (Blouse Color That Will Match With Every Saree)

नेहमी प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवण्याची काही आवश्यकता नसते. काही सिलेक्टेट रंगाचे ब्लाऊज जर तुमच्या कपाटात असतील तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांची स्टाईल करू शकता. प्रत्येक साडीवर सुट होतील असे ५ ब्लाऊज डिजाईन्स कोणते ते पाहूया. 

1) गुलाबी रंगाचे ब्लाऊज

गुलाबी रंगात तुम्हाला डार्क, लाईट असे बरेच शेड मिळतील. गुलाबी रंगाचे ब्लाऊज तुम्ही प्लेन किंवा गोल्डन, सिल्व्हर फॅब्रिकमध्ये निवडू शकता. यात तुम्हाला थ्रेड वर्कमध्ये रेडिमेड ब्लाऊज मार्केटमध्ये पाहायला मिळेल. तुम्ही यात हिरवा, पिवळा, जांभळ्या रंगाच्या साडीबरोबर मॅच करू शकता. 

2) काळ्या रंगाचे ब्लाऊज

काळा रंग इव्हरग्रीन ट्रेंडमध्ये असतो. सिंपल डिजाईन्सच्या ब्लाऊजबरोबर तुम्ही वार्डरोबमध्ये या ब्लाऊजचा समावेश करू शकता. कारण ब्लॅक रंगानं तुम्ही जवळपास सर्वच स्टाईल्स मॅच करू शकता. कॉटन फॅब्रिकमद्ये या पद्धतीचे ब्लाऊज शिवून घालू शकता. 

3) हिरव्या रंगाचे ब्लाऊज

हिरव्या रंगाचे ब्लाऊज तुम्हाला फार आवडेल. तुम्ही पिवळा, पिंक, रेड, व्हाईट अशा वेगवेगळ्या रंगाचे ब्लाऊज साडीबरोबर स्टाईल करू शकता. यात तुम्हाला सिल्क फॅब्रिक्समध्ये वेगवेगळ्या डिजाईन्सचे ऑपश्न्स मिळतील. 

4) सोनेरी रंगाचे ब्लाऊज

सोनेरी ब्लाऊज नेहमीच रॉयल लूक देते. तुम्ही कोणत्याही फॅन्सी साडीवर हे ब्लाऊज ट्राय करू शकता.  यात तुम्ही रेडीमेड प्लेन पासून महागड्या डिजाईन्स पाहायला मिळतील.

5) रेड कलरचे ब्लाऊज

रेड लकर बोल्ड आणि स्टायलिशि लूक देण्यात मदत करतो. या कलरचे ब्लाऊज तुम्ही गोल्डन, ब्लॅक,ग्रीन, पिंक, पर्पल, ब्लू आणि इतर रंगाच्या साड्यांवर स्टाईल करू शकता. साडीच लूक रॉयल स्टायलिश लूक देण्याचे काम करते. या पाचही रंगाचे ब्लाऊज तुम्हाला शोभून दिसतील.

टॅग्स :खरेदीफॅशन