दोन- तीन वर्षांपुर्वी क्वचितच कुणाच्या तरी हातात फिटनेस बॅंड (stylish fit band) दिसायचे. अनेक जणांना तर बरेच दिवस फिटनेस बँड आणि घड्याळ यातला फरकच कळला नव्हता. कारण घड्याळाप्रमाणेच ते हातावर बांधायचे असतात, त्यामुळे हे घड्याळ्याचेच एखादे नवे मॉडेल असावे, असा अनेकांचा समज झाला. पण आता मात्र फिटनेस बँडची गरज बऱ्याच जणांना कळली आहे. अनेक तरूणांसाठी फिटनेस बँड किंवा स्मार्ट वॉच हे एक स्टाईल स्टेटमेंट असले तरी त्याचा सदुपयोग करणारेही अनेक फिटनेस फ्रिक लोक आहेत.
सध्या स्मार्ट वॉच (smart watch and fitness band) आणि फिटनेस बँड हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी स्मार्ट वॉच हा पर्याय जरा महागडा आहे. त्या तुलनेत फिटबँड मात्र अगदी एक- दिड हजारात मिळू शकतात. फिटनेसबाबत अवेअर असणे हा एकच उद्देश खरेदीमागे असेल तर नक्कीच स्मार्ट वॉचपेक्षा फिटबँड घेणे, हेच कधीही जास्त परवडणारे ठरेल.
१५०० रूपयांत बाजारात उपलब्ध असणारे फिटबॅण्ड, हे बघा पर्याय..
१. Lenovo HX06
लिनेव्हो एच एक्स झीरो सिक्स हा फिटबँड फ्लिपकार्टवर १२९९ रूपयांत उपलब्ध आहे. ॲक्टीव्हिटी ट्रॅकींग, स्टेप्स काऊंट ॲक्टीव्ह मिनिट, हार्टबीट काऊंट असे पर्याय यात उपलब्ध असून तो वॉटरप्रुफदेखील आहे. याला तुम्ही ब्लूटूथ देखील कनेक्ट करू शकता. शिवाय एकदा चार्ज केला की याची बॅटरी ८ दिवस चालते. फिटबँडचा बेल्ट बदलण्याची सुविधा यात उपलब्ध असून याचे वजन २० ग्रॅम आहे. हा बँडविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
२.Fastrack Reflex 2.0
घडाळ्याच्या बाबतीत तर फास्ट्रॅक हा ब्रॅण्ड नावाजलेलाच आहे. त्यामुळे या ब्रॅंडचे फिटबँडही घेण्यास हरकत नाही. ऑनलाईन शॉपिंग साईटवर हा बँड सध्या ११९५ रूपयाला उपलब्ध आहे. हा बँड ब्लू टूथला कनेक्ट होतो शिवाय त्याची बॅटरी एकदा चार्ज केली की ४ दिवस चालते. तुमचा स्लीप पॅटर्न ट्रॅक करणे तसेच तुम्ही दिवसभरात किती कॅलरीज बर्न करू शकलात, हे याद्वारे चांगल्या पद्धतीने कळू शकेल. हा बँड अधिक जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
३. Xiaomi Mi Band HRX Edition
मोबाईलमध्ये अग्रेसर असणाऱ्या या कंपनीचा हा फिटबँडही अनेक जणांच्या पसंतीस उतरत आहे. ऑनलाईन शॉपिंग साईटवर हा बँड सध्या १२९९ रूपयाला मिळतो आहे. एकदा चार्ज केल्यानंतर बॅटरी तब्बल २३ दिवस टिकते, असा दावा कंपनीने केला आहे. स्लेप्ट अवर्स, ॲक्टीव्ह अवर्स, फुट स्टेप काउंट यासोबतच ब्लू टूथ कनेक्टिव्हिटी यामध्ये उपलब्ध आहे. या बँडविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.amazon.in/Mi-Band-HRX-Edition-Black/dp/B075BCSFNN/?tag=www91mobilesc_wr-21&ascsubtag=
४. Realme Band
या ब्रँडचे मोबाईल स्टर्डी आणि टिकाऊ असल्याने या ब्रँडचा फिटबँडही तसाच असेल, अशी अपेक्षा अनेक जणांची आहे. त्यानुसार अनेक जण हा बॅंड घेण्यास इच्छूक आहेत. ऑनलाईन शॉपिंग साईवर या बँडची किंमत १४९९ रूपये एवढी दाखविण्यात येत आहे. हार्ट रेट मॉनिटर याबाबत हा बँड अधिक उत्तम असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येते. या बँडविषयी अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.