Lokmat Sakhi >Shopping > न कापता, चाकू-सुरी न वापरता खरबूज-टरबूज चिरा, पाहा ‘हे’ भन्नाट फ्रुट कटर...

न कापता, चाकू-सुरी न वापरता खरबूज-टरबूज चिरा, पाहा ‘हे’ भन्नाट फ्रुट कटर...

Fruit Slicer Watermelon Cutter Multi-Function Kitchen Cutting Tool : Stainless Steel Fruit Cutter : फ्रुट कटर वापरून तुम्ही कलिंगड, टरबूज सारखी फळं अगदी मिनिटभरात चटकन कापू शकता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 14:45 IST2025-04-03T13:57:55+5:302025-04-03T14:45:01+5:30

Fruit Slicer Watermelon Cutter Multi-Function Kitchen Cutting Tool : Stainless Steel Fruit Cutter : फ्रुट कटर वापरून तुम्ही कलिंगड, टरबूज सारखी फळं अगदी मिनिटभरात चटकन कापू शकता.

Fruit Slicer Watermelon Cutter Multi-Function Kitchen Cutting Tool Stainless Steel Fruit Cutter | न कापता, चाकू-सुरी न वापरता खरबूज-टरबूज चिरा, पाहा ‘हे’ भन्नाट फ्रुट कटर...

न कापता, चाकू-सुरी न वापरता खरबूज-टरबूज चिरा, पाहा ‘हे’ भन्नाट फ्रुट कटर...

प्रत्येक ऋतूत येणारी सिझन फळं आपण खातोच. सध्या उन्हाळा सुरु असल्याने, आपण कलिंगड, खरबूज यांसारखी रसाळ आणि पाण्याचे प्रमाण जास्त असणारी फळं मोठ्या प्रमाणावर खातो. बाजारांत प्रत्येक फळाच्या ठेल्यावर लालचुटुक, रसाळ कलिंगड, खरबूज सारखी फळं विकायला असतात. ही फळं पाहून आपल्याला खावीशी (Fruit Slicer Watermelon Cutter Multi-Function Kitchen Cutting Tool) वाटली की आपण ती लगेच घरी घेऊन येतो. परंतु कलिंगड, खरबूज सारखी (Stainless Steel Fruit Cutter) आकाराने मोठी आणि त्यांच्या बाहेरच्या साली थोड्या जाड असल्याने ते कापायला थोडे अवघड जाते.

एवढचं नव्हे तर काहीवेळा आपण ही फळं कापून मग त्याच्या लहान फोडी करुन खायच्या इतकं सगळं करावं लागत म्हणून ही फळं खाणं टाळतो. अशावेळी ही फळं दिवसेंदिवस तशीच पडून राहिल्याने खराब देखील होतात. कलिंगड, खरबूज सारखी फळं कापायची म्हणजे त्याला सूरी पण धारदार लागते. बोथट झालेल्या सुरीने ही फळं कापणं म्हणजे अशक्यच. यासाठी आता आपण फ्रुट कटरचा वापर करु शकतो. हे फ्रुट कटर वापरून तुम्ही कलिंगड, टरबूज सारखी फळं अगदी मिनिटभरात चटकन कापू शकता.     

कलिंगड, टरबूज सारखी फळं मिनिटभरात चटकन कापणारे कटर... 

कलिंगड, टरबूज सारखी फळं मिनिटभरात चटकन कापणारे हे कटर स्टेनलेस स्टील पासून तयार केलेले आहे. हे कटर एखाद्या गोलाकार चक्राप्रमाणेच दिसते. या कटरचा वापर करून तुम्ही कलिंगड, खरबूज सारखी मोठी जाड सालीची फळं देखील पटकन कापू शकता. याचबरोबर, या कटरने फळं कापल्यावर त्याचे तुकडे होऊन येतात त्यामुळे तुम्हाला ते परत लहान तुकड्यात कापत बसावे लागत नाही.

कारली - भोपळा आणि मिरच्यांच्या बिया काढण्यासाठी पाहा भन्नाट कटर, काही सेकंदात करा झटपट काम...

फक्त ५०० रुपयांत आणा हे 'सेन्सर लाईट्स', हवे तिथे लावा-आजी आजोबांसाठी खास सोय...

या गोलाकार चक्राप्रमाणे असणाऱ्या कटरला दोन्ही बाजूने पकडण्यासाठी दोन हॅण्डल असतात. तसेच या चक्राच्या बरोबर मधोमध धारदार सूरी सारख्या पाती असतात. या धारदार पातींच्या मदतीने फळं अगदी झटपट कापले जाते. सर्वातआधी कलिंगड किंवा खरबुजाच्या देठाकडील भाग कापून घ्या. त्यानंतर देठाकडील कापलेला भाग वर राहील अशा पद्धतीने कलिंगड किंवा खरबूज उभे ठेवा. त्यानंतर हे गोलाकार कटर त्यावर ठेवून दोन्ही हाताने दोन हॅण्डल धरून खालच्या दिशेने जोरात दाब द्या. आणि काय... तर तुमचे कलिंगड किंवा खरबूज तुमच्यासमोर एकसमान तुकड्यात कापलेलं दिसेल. 

कोथिंबीर आणि पुदिना अजिबात सडणार नाही, आजच खरेदी करा ‘हे’ भन्नाट भांडं, वस्तू फार कामाची...

सोफा-बेड-कार्पेटची स्वच्छता होईल चटकन, फक्त ४०० रुपयांचा हा ब्रश आणा-धूळ गायब...

इतर वैशिष्टये :-

१. या कटरची स्वच्छता करणे देखील अतिशय सोपे आहे. तुम्ही सहज साबण, लिक्विड सोपं आणि पाण्याच्या मदतीने इतर भांड्यांप्रमाणेच धुवू शकता. 

२. उत्तम दर्जाच्या फूड ग्रेड स्टेनलेस स्टील मटेरियल पासून बनलेले असल्याने तुम्ही याचा वापर करु शकता. 

३. कितीही मोठ्या आकारच किंवा जाड सालीच फळं तुम्ही अगदी सहज कापू शकता. 


किंमत आणि रेटिंग... 

हे ' फ्रुट कटर' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या ' फ्रुट कटरला' ५ स्टार  इतके रेटिंग देण्यांत आले. हे फ्रुट कटर' आपल्याला फक्त ४९९ रुपयांपर्यंत सहज विकत मिळते. असे हे ' फ्रुट कटर' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/4iNyMZC

Web Title: Fruit Slicer Watermelon Cutter Multi-Function Kitchen Cutting Tool Stainless Steel Fruit Cutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.