Join us  

गणपतीच्या डेकोरेशनसाठी बॅकड्रॉप घ्यायचा? ३ स्वस्तात मस्त पर्याय- उठून दिसेल तुमचा बाप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 4:47 PM

Attractive Backdrop For Ganesh Festival Decoration: गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी बॅकड्रॉपच्या शोधात असाल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघून घ्या...(online shopping for ganesh festival decorative items)

ठळक मुद्दे यंदाच्या गणेशोत्सवासाठी सगळ्यांपेक्षा वेगळा असा एकदम हटके बॅकड्रॉप शोधत असाल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून पाहा

अवघ्या महाराष्ट्रात धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे (Ganesh Festival 2024). त्यामुळे घराघरात गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झालेली दिसून येते (ganapati decoration ideas). गणपतीसाठी दरवर्षी वेगवेगळी सजावट करायची, असा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार मग मागचे बॅकड्रॉप बदलून वेगवेगळी सजावट  केली जाते. तुम्हीही यंदाच्या गणेशोत्सवासाठी सगळ्यांपेक्षा वेगळा असा एकदम हटके बॅकड्रॉप शोधत असाल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून पाहा (attractive backdrop for ganesh festival decoration at low price). कमीतकमी किमतीत नक्कीच चांगले पर्याय मिळू शकतात.(online shopping for ganesh festival decorative items)

गणपतीसाठी आकर्षक बॅकड्रॉप खरेदी

 

१. खूप झकपक नसणारा आणि एकदम डिसेंट लूक देणारा बॅकड्रॉप घ्यायचा असेल तर हा पर्याय एकदा बघा. यामध्ये अनेक वेगवेगळे रंग उपलब्ध आहे.

कम्प्युटरवर काम करून मान- खांदे दुखतात? श्री. श्री. रविशंकर सांगतात ५ मिनिटांचा व्यायाम, पटकन आराम मिळेल 

हा बॅकड्रॉप  नेटचा असून त्यासोबत २ हिरव्या पानांच्या माळा, एलईडी लाईट्सची एक माळ, २ हूक, रिबनचे १ पॅकेट, १ डबलसाईड टेप अशा वस्तू मिळत आहेत. यामुळे सजावटीसाठी तुम्हाला इतर वस्तूंची शोधाशोध करण्याची गरजच नाही. हा सगळा सेट ६५७ रुपयांना मिळत आहे.Click To Buy:https://fktr.in/cGGKrrc

 

 

२. धबधब्याचा थ्री डी व्ह्यू देणारा हा आणखी एक बॅकड्रॉप पाहा. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.

स्क्रिनवर सतत काम करून डोळ्यांवर ताण येतो? २०-२०-२० चा फॉर्म्युला वापरा- डोळ्यांना आराम मिळेल

यावर तुम्ही फोकस लाईट सोडले तर ते आणखी आकर्षक दिसेल. हा बॅकड्रॉप सध्या ६४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून तो ८ फूट लांब आणि ५ फूट रुंद आहे.Click To Buy:https://fktr.in/91HFkU1

 

 

३. अगदी पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पासाठी डेकोरेशन करायचं असेल तर हा एक पर्याय पाहा. यामध्ये अनेक वेगवेगळे डिझाईन्स उपलब्ध आहेत.

झटपट करा पोह्यांची इडली! डाळ तांदूळ भिजवून वाटण्याची कटकटच नाही- बघा चवदार रेसिपी

केळीच्या पानांना आणि झेंडूच्या माळांना थ्री डी इफेक्ट देण्यात आला असून त्यामुळे ते एकदम खरे असल्याचा भास होतो. या बॅकड्रॉपला ग्राहकांकडूनही चांगले रेटिंग देण्यात आले असून तो ४५९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे. Click To Buy:https://fktr.in/ORjKqPq

 

टॅग्स :गणेश चतुर्थी २०२४ऑनलाइनखरेदी