Lokmat Sakhi >Shopping > आपल्या घरी येणाऱ्या मदतनिसांना दिवाळीत काय गिफ्ट द्याल? ४ पर्याय, प्रेमानं करु ही दिवाळी एकदम खास

आपल्या घरी येणाऱ्या मदतनिसांना दिवाळीत काय गिफ्ट द्याल? ४ पर्याय, प्रेमानं करु ही दिवाळी एकदम खास

Gift Ideas For House Helpers in Diwali : यंदा दिवाळीच्या निमित्ताने आपण आपल्या मदतनिसांना काहीतरी खास भेटवस्तू देऊया की, जेणेकरुन त्यांची दिवाळी स्पेशल आणि छान होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 03:51 PM2022-10-19T15:51:47+5:302022-10-19T16:29:26+5:30

Gift Ideas For House Helpers in Diwali : यंदा दिवाळीच्या निमित्ताने आपण आपल्या मदतनिसांना काहीतरी खास भेटवस्तू देऊया की, जेणेकरुन त्यांची दिवाळी स्पेशल आणि छान होईल.

Gift Ideas For House Helpers in Diwali : What gift will you give to the helpers who come to your home on Diwali? 4 options, do it with love this Diwali is very special | आपल्या घरी येणाऱ्या मदतनिसांना दिवाळीत काय गिफ्ट द्याल? ४ पर्याय, प्रेमानं करु ही दिवाळी एकदम खास

आपल्या घरी येणाऱ्या मदतनिसांना दिवाळीत काय गिफ्ट द्याल? ४ पर्याय, प्रेमानं करु ही दिवाळी एकदम खास

Highlights दिवाळीच्या निमित्ताने आपण प्रेमाने त्यांना या गोष्टी दिल्या तर त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. घरासाठी दिवसरात्र काबाडकष्ट करणाऱ्या या महिलांना आपणच प्रेमाने नाही वागवणार तर काय उपयोग

आपल्या प्रत्येकाच्या घरी कामाला एक तरी मदतनीस येतातच. मग ते काम भांड्याचे असो, केर-फरशीचे असो किंवा अगदी स्वयंपाकाचे असो. आपण ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीत नोकरीला असतो आणि इमानदारीने काम करतो. त्याचप्रमाणे आपल्या घरी या मदतनीस मावशी नियमितपणे येऊन आपल्या रोजच्या कामांना हातभार लावत असतात. त्यांनाही घरातल्या कटकटी, आजारपणं, मुलांच्या चिंता, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असं सगळं असतंच की. आपल्याला कंपनी दिवाळीचा बोनस देते, घरातील मंडळी आपल्यासाठी भेटवस्तू घेतात. पण स्वत:च्या आणि दुसऱ्यांच्या घरात राबणाऱ्या या माऊलीचीही दिवाळी चांगली व्हावी यासाठी आपण काहीतरी करायला नको का? या आपल्या ना दिवाळीला कधीही काय देऊ म्हटलं तरी त्या पैसे द्या म्हणतात. म्हणजे या पैशाने त्या मुलाबाळांना किंवा घरातल्या लोकांना काहीतरी करु शकतील. पण त्यांच्या स्वत:साठी त्या कधीच काही नको म्हणतात. पण यंदा दिवाळीच्या निमित्ताने आपण या मदतनिसांना काहीतरी खास भेटवस्तू देऊया की, जेणेकरुन त्यांची दिवाळी स्पेशल आणि छान होईल. त्यासाठीच काही चांगले-उपयुक्त पर्याय (Gift Ideas For House Helpers in Diwali). 

(Image : Google)
(Image : Google)

१. डबा किंवा बाटली 

एक मदतनीस महिला अनेक घरातील कामं करत असल्याने त्या सकाळी घरातून डबा घेऊन बाहेर पडतात. कधी त्या एखाद्या पिशवीत पोळ्या किंवा भाकरी बांधून आणतात आणि कधी एखाद्या छोट्या डब्यात भाजी आणतात. पण आपण जर त्यांना चांगला डबा किंवा पाण्याची बाटली घेऊन दिली तर त्यांना त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. 

२. कपडे

कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता या महिला स्वत:साठी काही घेतात की नाही सांगता येत नाही. मुलाबाळांचे आणि इतर नातेवाईकांचे करता करता त्या स्वत:साठी खरेदी करतातच असे नाही. अशावेळी त्यांना दुकानात घेऊन जाऊन त्यांच्या आवडीची एखादी साडी किंवा ड्रेस मटेरीयल घेतल्यास त्यांना नक्कीच आनंद मिळू शकेल.

(Image : Google)
(Image : Google)

३. स्वेटर किंवा स्कार्फ 

आपल्या मावशी कुठूनतरी दूरवरुन आपल्या घरी चालत किंवा वाहनाने येतात. यावेळी त्यांना येताना ऊन, वारा लागू शकते. अशावेळी त्यांच्याकडे स्कार्फ किंवा स्वेटर असतोच असे नाही. मात्र दिवसभर इतक्या घरातील कामं करुन आधीच थकून गेलेला जीव ऊन्हाने किंवा थंडीने हैराण होऊ शकतो. अशावेळी त्यांना एखादा छानसा स्वेटर, टोपी किंवा स्कार्फ असं काही दिलं तर त्यांना त्याचा नक्कीच उपयोग होईल. 

४. चप्पल 

मदतनीस लोक बरेचदा चालत येतात. चालण्यासाठी आपल्या पायात चांगली चप्पल नसेल तर पाय दुखणे, पाठ दुखणे, टाचांच्या समस्या उद्भवणे अशा तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उन्हा-पावसात दूरवरुन चालत येणाऱ्या या मावशींना आपण चपलांचा किंवा बुटांचा चांगला जोड नक्की भेट म्हणून घेऊन देऊ शकतो. या गरजेच्या वस्तू असल्या तरी त्यांना त्याचे महत्त्व कळेल आणि त्या ते घेतीलच असे नाही. मग दिवाळीच्या निमित्ताने आपण प्रेमाने त्यांना या गोष्टी दिल्या तर त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. 

Web Title: Gift Ideas For House Helpers in Diwali : What gift will you give to the helpers who come to your home on Diwali? 4 options, do it with love this Diwali is very special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.