थोड्याशा ट्रिक्स आणि टिप्स माहिती असल्या आणि आपल्याकडे मेकअपचं सामान उपलब्ध असलं तर निश्चितच आपला आपण छान मेकअप करू शकतो. स्वत:च स्वत:चा मेकअप केला की मग कोणत्याही कार्यक्रमासाठी झटपट तयार होता येतं.. आणि शिवाय आपण छान दिसतो आहे हे जाणवून आपला कॉन्फिडन्सही वाढतो.. म्हणून या १० गोष्टींची खरेदी करा आणि करा मस्त छान मेकअप.. आपला आपणच..
१. प्रायमर
हा मेकअपचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक. चेहऱ्याला प्रायमर लावल्यामुळे चेहऱ्यावर मेकअपसाठीचा बेस तयार होतो आणि आपण केलेला मेकअप अधिककाळ टिकतो. त्यामुळे मॉईश्चरायझर लावून झाल्यानंतर मेकअपची सुरुवात करताना चेहऱ्याला सगळ्यात आधी प्रायमर लावा.
२. फाउंडेशन
प्रायमरनंतर चेहऱ्याला फाउंडेशन लावावं. मेकअप अधिक परफेक्ट होण्यासाठी आणि नॅचरल लूक येण्यासाठी फाउंडेशनचं सिलेक्शन योग्य असावं लागतं. त्यामुळे फाउंडेशन निवडताना ते तुमच्या स्किनटोनपेक्षा दोन शेड कमी असेल असं निवडा.
३. कन्सिलर
चेहऱ्यावरचे काळे डाग लपविण्यासाठी कन्सिलरचा वापर करावा. डोळ्यांच्या खालचा भाग, हनुवटी, डोळ्याच्या बाजूला असणारा काळेपणा कन्सिलर लावून कमी करता येतो. यामुळे तुमचा चेहरा इव्हन टोन दिसतो.
४. कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर
कन्सिलर लावून झाल्यानंतर चेहऱ्याला कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावरड लावून टचअप करा. कॉम्पॅक्ट आणि लूज पावडर लावून चेहऱ्याचा मेकअप बेस सेट होतो.
५. आयब्रो पेन्सिल
मेकअप सेट झाल्यानंतर आयब्रो पेन्सिलचा वापर करा.. जर भुवया खूप पातळ असतील, तर हमखास आयब्रो पेन्सिल वापरा. आयब्रो पेन्सिलच्या वापरामुळे भुवयांना परफेक्ट शेप आणि रंग मिळतो. चेहरा अधिक खुलतो.
६. ब्लश आणि हायलायटर पॅलेट
गाल आणि चिकबोनचा भाग अधिक ठळक करण्यासाठी ब्लश आणि हायलायटरचा वापर करण्यात येतो. यामुळे तुमचा मेकअप निश्चितच अधिक उठून दिसतो आणि अधिक नैसर्गिक भासू लागतो.
७. आयशॅडो पॅलेट
डोळे अधिक उठून दिसण्यासाठी आयशॅडो पॅलेट अधिक महत्वाचे आहे. तुम्ही ब्रश किंवा बोटाच्या साहाय्याने आयशॅडो लावू शकता. तुमच्या ड्रेसिंगनुसार एकच शेड किंवा कॉम्बिनेशन शेडमध्ये आयशॅडो लावता येते.
८. आय लायनर
डोळ्यांना एकदा आयशॅडो लावून झालं की ते अधिक बोल्ड करण्यासाठी आय लायनरचा वापर करा. जर तुम्हाला आय लायनर लावण्याची सवय नसेल तर सुरुवातीला लिक्विड आय लायनर लावू नका. जेल किंवा पेन्सिल लायनर ट्राय करा.
९. मस्कारा
पापण्या अधिक दाट आणि भरगच्च दिसाव्या यासाठी मस्कारा लावणं गरजेचं आहे.. मस्कारा घेताना तो वॉटरप्रुफ असेल याची नेहमीच काळजी घ्या.
१०. लिपलायनर आणि लिपस्टिक
एवढा सगळा मेकअप झाल्यानंतर सगळ्यात शेवटी लिपलायनर किंवा लिपस्टिक लावावी. तुमचे कपडे जसे असतील, त्यांना मॅच होणारी शेड निवडा. ग्लॉसी, मॅट अशी तुमच्या आवडीनुसार लिपस्टिक लावा.