Lokmat Sakhi >Shopping > हाय वेस्ट जीन्सची फॅशन पुन्हा 'इन', एक हजार रुपयांतही मिळतील असे ४ पर्याय

हाय वेस्ट जीन्सची फॅशन पुन्हा 'इन', एक हजार रुपयांतही मिळतील असे ४ पर्याय

Shopping tips: लेटेस्ट फॅशननुसार पुन्हा खुलवायचाय तुमचा वॉर्डरोब... मग लो वेस्ट जीन्स (new trend in jeans, high rise) सध्या ठेवून द्या आणि हाय वेस्ट जीन्सवर फोकस करा... खरेदी करायची असेल तर बघा हे ४ पर्याय... स्वस्तात मस्त जीन्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 06:19 PM2021-12-30T18:19:56+5:302022-02-25T17:43:56+5:30

Shopping tips: लेटेस्ट फॅशननुसार पुन्हा खुलवायचाय तुमचा वॉर्डरोब... मग लो वेस्ट जीन्स (new trend in jeans, high rise) सध्या ठेवून द्या आणि हाय वेस्ट जीन्सवर फोकस करा... खरेदी करायची असेल तर बघा हे ४ पर्याय... स्वस्तात मस्त जीन्स..

High waist jeans are in trend, these are the shopping options in lower price | हाय वेस्ट जीन्सची फॅशन पुन्हा 'इन', एक हजार रुपयांतही मिळतील असे ४ पर्याय

हाय वेस्ट जीन्सची फॅशन पुन्हा 'इन', एक हजार रुपयांतही मिळतील असे ४ पर्याय

Highlightsकधी काळी कपाटात ठेवून दिलेल्या त्या हाय वेस्ट जीन्सला आता पुन्हा चांगले दिवस आले आहेत.

दर काही महिन्यांनी जीन्सचे ट्रेण्ड बदलत असतात, त्यामुळे जीन्स जुनी, आऊटडेटेड (online shopping tips) कधीच होत नाही. आता हेच बघा ना कधी रिप्ड जीन्स येते तर कधी मंकी वॉश, कधी ॲन्कल लेन्थ तर कधी ॲन्कलला (ankle length jeans) झिप असणारी..कधी लो वेस्ट तर कधी हाय वेस्ट (high waist jeans).. आता नेमकं असंच झालं आहे. काही महिन्यांपुर्वी अगदी कंबरेपर्यंत वर येणारी हायवेस्ट जीन्स अगदीच झिडकारली गेली आणि तिच्या जागी लो वेस्ट जीन्स (low waist jeans) आली... पण दुनिया गोल म्हणतात, तसंच हे फॅशन वर्ल्डही (fashion world) गोल आहे असंच म्हणावं लागेल. कारण कधी काळी कपाटात ठेवून दिलेल्या त्या हाय वेस्ट जीन्सला आता पुन्हा चांगले दिवस आले आहेत.

 

कंबरेपर्यंत येणारी स्टायलिश हायवेस्ट जीन्सची (stylish jeans) फॅशन सध्या चांगलीच इन आहे. झीप, बटन, इलॅस्टिक अशा वेगवेगळ्या प्रकारात ही जीन्स उपलब्ध आहे. ही जीन्स घेण्यासाठी खूप जास्त पैसे अडकविण्याचीही गरज नाही. १००० रूपयाच्या आतबाहेर चांगल्या ब्रॅण्डच्या हाय वेस्ट जीन्स उपलब्ध आहेत. यासाठी तुम्ही तुमच्या लोकल मार्केटमध्येही बघू शकता किंवा मग ऑनलाईन खरेदीचे हे काही पर्यायही तपासून पाहू शकता. 

 

Roadster कंपनीची ब्लॅक स्किनी फिट हाय वेस्ट जीन्स ऑनलाईन खरेदी केल्यास अवघ्या ७९९ रूपयांत मिळत आहे. या जीन्सला लोकांकडून चांगले रिव्ह्यूज मिळाले असून तुमी जर उंच आणि स्लिम असाल, तर नक्कीच या जीन्सचा विचार करू शकता. ही जीन्स स्ट्रेचेबल असून क्लिन लूक क्रॉप्ड लूक या प्रकारात येणारी आहे. या जीन्सबाबत अधिक माहिती हवी असल्यास या लिंकवर क्लिक करा.

Click to Buy-https://bit.ly/3ImayU2

 

SLVETE या कंपनीची ब्लू रंगाची हायवेस्ट स्किन टाईट जीन्स ऑनलाईन शॉपिंग साईटवर ८४९ रूपयांत उपलब्ध आहे. कंबरेच्या ठिकाणी या जीन्सला मोठा बेल्ट असून त्यावर काळ्या रंगाची ५ बटणं लावण्यात आली आहे. त्यामुळे शॉर्ट शर्टवर ही जीन्स घातल्यास तुमचा लूक अधिक कॅची दिसू शकतो. 

Click to Buy- https://www.amazon.in/dp/B07XZNSHQC

 

 

पांढऱ्या रंगाची ही हाय वेस्ट जीन्स अतिशय स्टायलिश लूक देणारी आहे. जीन्सवर कंबरेच्या भागात मध्यभागी ६ बटन आहेत, शिवाय कंबरेवर दोन्ही बाजूंनी लेस असणारं डिझाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे शाॅर्ट कुर्त्यावर ही जीन्स अधिक छान दिसू शकते. BLISSEVER या कंपनीची ही जीन्स खालील शॉपिंग साईटवर ७९९ रूपयांत उपलब्ध आहे. 

Click to Buy- https://bit.ly/3tq7iRB

 

 

JustFaith या कंपनीची ग्रे रंगाची हाय राईज जीन्स ऑनलाईन शाॅपिंग साईटवर केवळ ५०० रूपयांत उपलब्ध आहे. अतिशय स्टायलिश लूक देणारी ही जीन्स स्लिमफिट असून ॲन्कल लेन्थ आहे. उंच असणाऱ्या तरूणींना ही जीन्स नक्कीच सुट होईल. या जीन्सबाबत अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

Click to Buy- https://bit.ly/3pfrfsS
 

Web Title: High waist jeans are in trend, these are the shopping options in lower price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.