स्वयंपाक घरातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गॅस सिलेंडर. गॅस सिलेंडर महागल्याने आपण सगळेच याचा अगदी जपून वापर करतो. गॅस सिलेंडरचा जपून वापर करताना आपण अनेक टिप्स आणि (Gas Saver Burner Stand ) ट्रिक्सचा वापर करतो. याचबरोबर, काहीवेळा आपल्या किचनच्या खिडकीतून खूप वारा येतो किंवा किचनमध्ये काम करताना गरम होत म्हणून फॅन लावतो अशा अनेक कारणांमुळे गॅसची फ्लेम व्यवस्थित पेटत नाही(How To Use Gas Saver Burner Stand).
अशा अनेक कारणांमुळे गॅसची फ्लेम व्यवस्थित एकसारखी जळत नसल्याने दररोज उगाचच भरपूर गॅस वाया जातो. अशा अनेक कारणांमुळे गॅसची फ्लेम वाया जाऊन गॅस लगेच संपू नये किंवा गॅस सिलेंडर जपून वापरण्यासाठी आपण एका खास उपकरणाचा नक्कीच वापर करु शकतो. हे गॅस सेव्हर उपकरणं म्हणजे नेमकं काय? ते कसं वापरावं याबद्दल अधिक माहिती घेऊयात(Home Gas Stove Fire & Windproof Energy Saving Stand).
स्वयंपाक घरातील सिलेंडर गॅसची बचत करण्यासाठीचे उपकरणं...
गॅस ही आपल्या जिवनावश्यक गरजांपैकी एक महत्वाची गरज आहे. आपण दिवसभर या गॅस शेगडीचा वापर करुन अनेक प्रकारचे अन्नपदार्थ यावर शिजवून तयार करतो. ज्यामुळे सिलेंडरमधील गॅस लवकर संपतो. काही वेळेला १५ दिवस किंवा महिनाभराच्या आत सिलेंडरमधील गॅस संपतो. ज्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडते. गॅसला सध्या दुसरा कोणता चांगला पर्याय नसल्याने स्वयंपाकासाठी त्याचा वापर करणे गरजेचेच आहे. पण गॅसची बचत कशी करायची? असा प्रश्न पडत असेल तर आपण ऑनलाईन शॉपिंग लिंकवर विकत मिळणाऱ्या 'गॅस सेव्हर स्टँड' चा वापर करुन गॅस सिलेंडरची बचत करु शकता.
तासंतास पुऱ्या लाटण्याची झंझटच विसरा! फक्त ९९ रुपयांत आणा 'पुरी कटर' - वेळखाऊ काम होईल पटकन...
'गॅस सेव्हर स्टँड' म्हणजे काय ?
'गॅस सेव्हर स्टँड' हे एक प्रकारचे गोलाकार, खोलगट असे स्टँड असते. या स्टँडला चार बाजूला चार खाचा असतात. ज्या शेगडीच्या वर असणाऱ्या लोखंडाच्या स्टँडच्या बरोबर मध्ये बसतात. या स्टँडच्या वापराने गॅसची फ्लेम संपूर्णपणे चारही बाजूने कव्हर होऊन झाकली जाते. ज्यामुळे या गॅसच्या फ्लेमला कुठूनही हवा लागत नाही, गॅसच्या फ्लेमचा हवेशी थेट संपर्क न आल्यामुळे फ्लेम कमी - जास्त न होता एकसारखी पेटते. गॅसची फ्लेम कायम एकसारखी जळत राहिल्याने गॅसची मोठ्या प्रमाणावर बचत केली जाते. यामुळे गॅस सिलेंडरची बचत होऊन गॅस लवकर न संपत अगदी खूप दिवस पुरतो.
चपाती लाटताना पीठ ओट्यावर फार सांडते? ही 'फ्लावर डस्टर' आयडिया पाहा, ओट्यावर पसारा होतच नाही...
फक्त १९० रुपयांत आणा हा भांडी घासणारा ब्रश, ना घासणी-ना स्पंज-काम करतो भरभर...
वैशिष्ट्ये :-
१. 'गॅस सेव्हर स्टँड' ची स्वच्छता करणे अतिशय सोपे आहे. अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण हे इतर भांड्याप्रमाणे स्वच्छ करु शकतो.
२. कोणत्याही प्रकारच्या किंवा आकाराच्या शेगडीवर अगदी सहजपणे व्यवस्थित फिट बसते.
३. हे 'गॅस सेव्हर स्टँड' मिश्र धातूंपासून तयार केले असल्याने कितीही हाय फ्लेमची उष्णता हे उपकरणं अगदी सहजपणे सहन करु शकते.
४. भांड्यांचा पृष्ठभाग कोणत्याही प्रकारचा असेल, गोलाकार, खोलगट किंवा इ. तरीही सगळ्या प्रकारची भांडी यावर व्यवस्थित फिट बसून न डगमगता राहू शकतात.
५. हे उपकरणं गॅस फ्लेमला चारही बाजूने कव्हर करत असल्याने फ्लेमला कोणत्याही प्रकारची हवा लागत नाही. परिणामी, गॅस फ्लेम कमी - जास्त न होता व्यवस्थित पेटते. यामुळे गॅसची फार मोठ्या प्रमाणांत बचत होते. यामुळे आपण स्वयंपाक घरातील खिडकी उघडी ठेवू शकता सोबतच किचनमधील फॅन देखील लावू शकता. या 'गॅस सेव्हर स्टँड' मुळे गॅसची फ्लेम न विझता एकसारखी पेटते.
किंमत आणि रेटिंग
हे 'गॅस सेव्हर स्टँड' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या 'गॅस सेव्हर स्टँड' ला ४.१ इतके रेटिंग देण्यांत आले असून आत्तापर्यंत ३०० पेक्षा अधिक लोकांनी हे स्टँड' विकत घेतले आहे. हे 'गॅस सेव्हर स्टँड' २०० रुपयांपर्यंत विकत मिळतात. असे हे 'गॅस सेव्हर स्टँड' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/3CmSYSg