Lokmat Sakhi >Shopping > काजळ आवडतं, मग स्वतःसाठी परफेक्ट काजळ कसं निवडाल? खरेदी करताना ५ गोष्टी तपासा..

काजळ आवडतं, मग स्वतःसाठी परफेक्ट काजळ कसं निवडाल? खरेदी करताना ५ गोष्टी तपासा..

How to select smudge free kajal: काजळ लावून काही तास झाले की ते लगेच खाली येतं.. डोळ्याखालचा भागही काळसर होतो... असा पांडा आय लूक (panda eye look) टाळायचा असेल तर काजळ खरेदी करण्यापुर्वी त्याची अशी टेस्ट करून बघा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 04:50 PM2022-01-17T16:50:15+5:302022-01-17T16:59:58+5:30

How to select smudge free kajal: काजळ लावून काही तास झाले की ते लगेच खाली येतं.. डोळ्याखालचा भागही काळसर होतो... असा पांडा आय लूक (panda eye look) टाळायचा असेल तर काजळ खरेदी करण्यापुर्वी त्याची अशी टेस्ट करून बघा ...

How do you choose the perfect smudge proof kajal for yourself? 5 things to keep in mind while purchasing kajal | काजळ आवडतं, मग स्वतःसाठी परफेक्ट काजळ कसं निवडाल? खरेदी करताना ५ गोष्टी तपासा..

काजळ आवडतं, मग स्वतःसाठी परफेक्ट काजळ कसं निवडाल? खरेदी करताना ५ गोष्टी तपासा..

Highlightsपरफेक्ट स्मज फ्री किंवा स्मज प्रुफ काजळ खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा प्रयोग नक्की करून बघा. हवं तर याला काजळासाठीची लिटमस टेस्ट म्हणता येईल. 

भारतातल्या बहुसंख्य तरूणी घरातून बाहेर पडताना आठवणीने काजळ लावतात. काजळ (how to apply kajal perfectly) हा अनेकींच्या मेकअपचा एक महत्त्वाचा भाग असतो. आजकाल तर ऑफीस किंवा कुठे बाहेर जाण्यासाठी तयार व्हायचं असेल तर अनेक तरूणी पावडर, लिपस्टिक आणि काजळ एवढाच मेकअप करतात. यामुळेही त्यांना लगेचच एक परफेक्ट मेकअप लूक मिळू शकतो. कमी कॉस्मेटिक्समध्ये परफेक्ट लूक (beauty tips) तेव्हाच मिळतो, जेव्हा वापरली गेलेली प्रत्येक वस्तू परफेक्ट असते. 

 

काजळ लावायला खूप जणींना आवडतं. पण अनेक जणींचा एक कॉमन प्रॉब्लेम असतो. तो म्हणजे काजळ लावून काही तास झाले की लगेच काजळ पसरतं. मग डोळ्यांखालचा भाग तर काळा होतोच, पण त्यामुळे सगळाच चेहरा खूप काळा आणि विद्रुप दिसू लागतो. आपल्या चेहऱ्याचंही असं होऊ द्यायचं नसेल, तर आपण निवडलेलं काजळ हे स्मज फ्री असणं गरजेचं आहे. म्हणूनच परफेक्ट स्मज फ्री किंवा स्मज प्रुफ काजळ खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा प्रयोग नक्की करून बघा. हवं तर याला काजळासाठीची लिटमस टेस्ट म्हणता येईल. 

 

कसं ओळखायचं स्मज फ्री किंवा स्मज प्रुफ काजळ?
बाजारात अनेक प्रकारचे काजळ असतात, जे स्मज फ्री किंवा स्मज प्रुफ असण्याचा दावा करतात. पण आपण जेव्हा त्याचा उपयोग सुरू करतो, तेव्हा काही वेळातच आपल्या डोळ्यांखाली काजळ पसरलेलं दिसतं. म्हणूनच काजळाची खरेदी करण्यापुर्वी ही टेस्ट करून बघा.
१. सगळ्यात आधी तर आपल्या हाताची मुठ करा आणि तळहाताच्या वरच्या बाजुवर आपल्याला जे काजळ खरेदी करायचं आहे, त्याने एक रेघ ओढा.

photo credit- google


२. काजळाचा डार्कनेस यावरून लक्षात येईल. आपल्याला जसं आवडतं त्यानुसार आपल्या हातावर काजळ पेन्सिलने एक किंवा दोन स्ट्रोक मारा.
३. आता काजळ सेट होण्यासाठी एक- दोन मिनिटाचा वेळ जाऊ द्या. 
४. त्यानंतर काजळाच्या रेघेवर आपल्या दुसऱ्या हाताचे बोट अलगद फिरवा. जर बोट फिरवल्यानंतर काजळ लगेचच पसरत असेल किंवा आपल्या बोटाला लागत असेल तर ते अजिबातच स्मज फ्री किंवा स्मज प्रुफ नाही हे समजावे. असे काजळ तुम्ही लावले तर ते लगेचच पसरेल.


५. यानंतर आता एक दुसरी टेस्ट करून बघा. काजळाची रेघ हातावर ओढल्यानंतर तर सेट होऊ द्या. त्यानंतर त्यावर पाण्याचे एक- दोन थेंब टाका. एखाद्या कॉटन कपड्याने किंवा कापसाच्या बोळ्याने पाणी अलगदपणे पुसण्याचा प्रयत्न करा. पाण्यासोबत जर काजळही निघून गेलं तर ते वॉटरप्रुफ नाही. आपल्या डोळ्याच्या वॉटर लाईनवर येणाऱ्या पाण्यासोबत ते ही ओघळणार आणि डोळ्यांखाली पसरून काळं होणार हे यातून लक्षात घ्यावं.  
६. वरील दोन्ही टेस्टवरून कोणतं काजळ जास्त डार्क आणि लाँग लास्टिंग आहे, हे देखील लक्षात येतं.. 

 

२०० रूपयांपेक्षा कमी किमतीत जर स्मज फ्री काजळ खरेदी करायचे असेल, तर हे ऑनलाईन पर्याय तपासून पहा..
https://www.myntra.com/kajal-and-eyeliner/maybelline/maybelline-new-york-colossal-kajal---black/1963241/buy

https://www.flipkart.com/lakm-eyeconic-kajal-pencil/p/itmegzvrqfgzfbez?pid=KJLEGZVRD9Q8Q5TY&lid=LSTKJLEGZVRD9Q8Q5TYBPHSHM&marketplace=FLIPKART&q=kajal&store=g9b%2Fffi%2Fttr%2Fdbs&srno=s_1_4&otracker=search&otracker1=search&fm=SEARCH&iid=97a77c6f-39ee-4cd3-ac46-2477e2e8aefe.KJLEGZVRD9Q8Q5TY.SEARCH&ppt=sp&ppn=sp&ssid=h75oe33ayo0000001642418128896&qH=7faafcbcc6456af7

 

Web Title: How do you choose the perfect smudge proof kajal for yourself? 5 things to keep in mind while purchasing kajal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.