स्टायलिश राहणे किंवा अप टू डेट राहणे ही सध्या हौस नसून गरज झाली आहे. तुम्हाला स्वत:ला चांगले प्रेझेंट करायचे असेल तर तुम्ही चांगले राहणे आणि दिसणे आवश्यक असते. मेकअपच्या विविध साधनांबरोबरच हेअर ड्रायर हेही आता तरुणींसाठी अतिशय आवश्यक अशी गोष्ट झालेली आहे. झटपट आवरुन कुठे बाहेर जायचे असले की केस वाळवण्यासाठी हेअर ड्रायर अतिशय महत्त्वाचा असतो. सध्या बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढलेले असल्याने एका क्लिकवर आपण आपल्याला हव्या असलेल्या ब्रँडचा ड्रायर खरेदी करु शकतो. पण यापैकी नेमका कोणता हेअर ड्रायर खरेदी करावा किंवा तो खरेदी करताना काय काय पाहावे हे माहित करुन घेणे आवश्यक असते. यासाठीच आज आपण पाहणार आहोत ड्रायर खरेदी करताना कोणत्या ३ गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे (How To Buy Perfect Hair Dryer Important Tips).
१. सेरामिक, टूरमलाईन टेक्नॉलॉजी
अनेकदा ड्रायरने केस वाळवले की ते खूप भुरे होतात. मात्र ड्रायर वापरुनही केस मऊ ठेवायचे असतील तर असा ड्रायर निवडा ज्यामध्ये सेरामिक, टूरमलाईन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असेल. कारण सेरामिक टेक्नॉलॉजीमुळे तुमच्या ड्रायरमधून निर्माण होणारी हीट कंट्रोल केली जाते. तर टूरमलाईन टेक्नॉलॉजीमुळे तुमचे केस मऊ आणि सिल्की होतात. यामध्ये तुमच्या केसांमधील मॉइस्चर लॉक होते ज्यामुळे तुमच्या केसांना शाईन मिळते.
२. ऍडजस्टेबल हिट सेटिंग
हा पर्याय असेल तर तुम्ही हेअर ड्रायरच्या हवेचा प्रवाह (एअर फ्लो) कंट्रोल करू शकता. तुमचे केस दाट असतील तर तुम्ही हाय हिटचा ऑप्शन निवडू शकता. पण जर तुमचे केस पातळ असतील तर मात्र तुम्हाला कमी हिट किंवा कमी एअर फ्लोचा ऑप्शन निवडावा लागेल. म्हणून तुमच्या हेअर ड्रायर मध्ये हा हिट सेटिंगचा पर्याय असणे खूप महत्त्वाचे आहे.
३. कुल शॉट बटण
तुम्हाला स्टायलिंगसाठी हेअर ड्रायर हवा असेल तर त्यामध्ये कुल शॉट बटण आहे का ते पाहा. कारण त्यामुळे तुमचे केस छान सेट होतात. केसांना बाऊन्सी लुक देण्यासाठी राऊंड ब्रशने अशा सेटिंगचा वापर करा. यासाठी ऑनलाईन खरेदी करत असाल तर त्यामध्ये दिलेले व्हिडिओज आवर्जून पाहा. तसेच गरम हवा ब्लो केल्यानंतर जर तुम्ही तुमच्या केसांवर हेअर ड्रायर ने कूल एअर ब्लो केली तर तुमचे केस मुलायम व शाईनी होतात. त्यामुळे तुमच्या हेअर ड्रायर मध्ये कूल एअरचा पर्यायही असायला हवा.