Lokmat Sakhi >Shopping > दिवाळीत फ्रिज खरेदी करायचा विचार आहे? आधी ५ गोष्टी तपासा, घरी येईल परफेक्ट फ्रिज

दिवाळीत फ्रिज खरेदी करायचा विचार आहे? आधी ५ गोष्टी तपासा, घरी येईल परफेक्ट फ्रिज

How to Buy Perfect Refrigerator Tips for Diwali Shopping : दिवाळीच्या निमित्ताने नवीन फ्रिज खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 05:54 PM2022-10-11T17:54:07+5:302022-10-11T17:56:21+5:30

How to Buy Perfect Refrigerator Tips for Diwali Shopping : दिवाळीच्या निमित्ताने नवीन फ्रिज खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर...

How to Buy Perfect Refrigerator Tips for Diwali Shopping : Thinking of buying a fridge this Diwali? Check 5 things first, perfect fridge will come home | दिवाळीत फ्रिज खरेदी करायचा विचार आहे? आधी ५ गोष्टी तपासा, घरी येईल परफेक्ट फ्रिज

दिवाळीत फ्रिज खरेदी करायचा विचार आहे? आधी ५ गोष्टी तपासा, घरी येईल परफेक्ट फ्रिज

Highlights इलेक्ट्रीक वस्तूंमध्ये दर काही दिवसांनी नवे मॉडेल किंवा नवे तंत्रज्ञान येत असल्याने ही वस्तू जास्तीत जास्त सोयीची व्हावी असा प्रयत्न उत्पादक कंपनीने केलेला असतो. दिवाळीच्या निमित्ताने फ्रिज खरेदी करायचा विचार असेल तर माहिती हव्यात अशा ५ गोष्टी..

दिवाळी म्हटली की आपण सोन्या-चांदीचे दागिने, घरातील आवश्यक मोठी वस्तू असे काही ना काही आवर्जून खरेदी करतो. काही वेळा आपण घरात वर्षानुवर्षे एखादी वस्तू वापरत असतो, ती वस्तू खराब झाली तरी दुरुस्त करुन किंवा आहे त्याच अवस्थेत आपण ती वापरत राहतो. पण मग दिवाळीच्या निमित्ताने ही वस्तू काढून टाकावी आणि नवीन घ्यावी असे आपल्याला वाटते. या काळात बाजारात आणि ऑनलाईनही मोठ्या प्रमाणात डीस्काऊंट असल्याने इलेक्ट्रीक वस्तू घेणे परवडतेही. इलेक्ट्रीक वस्तूंमध्ये दर काही दिवसांनी नवे मॉडेल किंवा नवे तंत्रज्ञान येत असल्याने ही वस्तू जास्तीत जास्त सोयीची व्हावी असा प्रयत्न उत्पादक कंपनीने केलेला असतो. दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही आहे त्यापेक्षा मोठा किंवा थोडा अॅडव्हान्स फ्रिज घ्यायचा प्लॅन करत असाल तर खरेदी करताना कोणत्या ५ गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे याविषयी (How to Buy Perfect Refrigerator Tips for Diwali Shopping)...

(Image : Google)
(Image : Google)

१. लीटर (क्षमता)

फ्रिजचे मोजमाप हे लीटरमध्ये होत असल्याने आपल्याला किती पदार्थ, वस्तू फ्रिजमध्ये ठेवायला लागतात त्यानुसार फ्रिज किती लहान-मोठा हवा ते ठरते. जास्त लीटरच्या फ्रिजमध्ये जास्त गोष्टी मावत असल्याने आपण पीठे, सुकामेवा, मसाले, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, भाज्या जास्त प्रमाणात वापरत असू तर त्यांच्या साठवणूकीसाठी आपल्याला जास्त लीटरचा प्रसंगी डबल डोअर किंवा ट्रीपल डोअर फ्रिज खरेदी करता येतो. 

२. वॅट (पॉवर)

फ्रिज खरेदी करताना त्यावर तो किती वॅटचा आहे हे लिहीलेले असते. जितके वॅट जास्त तितकी त्या फ्रिजची पॉवर किंवा क्षमता जास्त. त्यामुळे ही गोष्ट फ्रिज खरेदी करताना अवश्य तपासून घ्यावी. 

३. बीईई रेटींग (किती इलेक्ट्रीसिटी खर्च होते)

हे रेटींग फ्रिजवर दिलेले असते. फ्रिजच्या दरवाजाला एक स्टार असलेले लेबल असते. त्यावर स्टार्स असतात आणि जितके स्टार जास्त तितकी कमी इलेक्ट्रीसिटी खर्च होते. फ्रिजसाठी दिवसरात्र प्लग जोडलेला असल्याने इलेक्ट्रीसिटी जास्त प्रमाणात जाण्याची शक्यता असते. मात्र या रेटींगचा विचार करुन फ्रिज खरेदी केल्यास आपल्याला ते फायद्याचे ठरते.

(Image : Google)
(Image : Google)

४. वॉरंटी 

वॉरंटी म्हणजे आपण खरेदी करत असलेल्या वस्तूमध्ये काही बिघाड झाल्यास ती संबंधित कंपनीकडून दुरुस्त करुन मिळण्याचा कालावधी. साधारणपणे फ्रिजसारख्या मोठ्या वस्तूंना ३ ते ५ वर्षांची वॉरंटी असते. यामध्ये काही ठराविक गोष्टी कव्हर केलेल्या असल्याने त्यांचा काही बिघाड झाल्यास कंपनीला आपल्याला त्या बदलून देणे बंधनकारक असते. 

५. कंपनीला असलेले रेटींग, ग्राहकांचे रिव्ह्यू 

ऑनलाईन खरेदी करताना वेगवेगळ्या साईटसवर ठराविक प्रॉडक्टला ग्राहकांनी काही रेटींग दिलेले असतात. इतकेच नाही तर अनेकांनी ते प्रॉडक्ट कसं चांगलं आहे किंवा कसं चांगलं नाही याविषयीही लिहीलेले असते. मोठी खरेदी करताना अशाप्रकारचा अभ्यास करणे फायद्याचे ठरते.
 
 

Web Title: How to Buy Perfect Refrigerator Tips for Diwali Shopping : Thinking of buying a fridge this Diwali? Check 5 things first, perfect fridge will come home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.