ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असलेले डाळिंब अतिशय पौष्टिक मानले जाते. डाळिंब नियमितपणे खाल्ले तर मधुमेहदेखील नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठीही डाळिंब अतिशय गुणकारी मानले गेलेले आहे. असे हे बहुगुणी डाळिंब जेव्हा आपण खरेदी करतो, तेव्हा बऱ्याचदा आपली निवड चुकते आणि आपण आणलेलं डाळिंब अगदीच पांचट किंवा बेचव असल्याचं लक्षात येतं. डाळिंबाचे दाणेही धड पिकलेले नसतात (shopping tips for pomegranate). त्यामुळे मग ते खाण्याची काही मजा येत नाही. म्हणूनच आता डाळिंबाची निवड चुकू नये म्हणून ते खरेदी करताना २ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा (how to identify ripe and sweet pomegranate without cutting it). त्यामुळे आपण घेत आहोत ते फळं पिकलेलं, गोड आणि रसरशीत आहे, हे ते न चिरताही आपण ओळखू शकू. (How to choose a perfectly ripe and sweet pomegranate)
डाळिंब पिकलेलं गोड आहे हे कसं ओळखायचं?
डाळिंब पिकलेलं, गोड आणि रसदार आहे हे कसं ओळखायचं, याविषयीच्या काही टिप्स theveggiewifey या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत. त्या २ टिप्स नेमक्या कोणत्या ते पाहा.
होळी स्पेशल थंडाई- शिल्पा शेट्टीची खास रेसिपी, गारेगार थंडाईशिवाय रंगांची मजा नाहीच...
१. आपण बाजारात गेल्यावर आपल्याला प्रामुख्याने २ प्रकारचे डाळिंब दिसतात. एक अगदी गोलाकार असतात शिवाय त्यांच्यावरचे आवरणही चमकदार असते. दुसरे डाळिंब असते ते थोडे सुकलेले वाटते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या बाह्य रुपावरून तरी आपण पहिल्या प्रकारच्या डाळिंबाचीच निवड करतो. नेमकं इथेच आपण चुकतो. डाळिंब घेताना गोलाकार डाळिंब कधीच घेऊ नये. ते व्यवस्थित पिकलेलं नसतं. ज्या डाळिंबाचा आकार थोडा षटकोनाप्रमाणे दिसत असतो, ते डाळिंब घ्यावं. कारण ते छान पिकलेलं असतं.
२. डाळिंब घेताना त्यावर तुमच्या नखाने हलकीशी टिचकी मारून पाहा.
होली आयी रे!! नखांवरचा रंग लवकर निघतच नाही? ३ टिप्स- नखं चटकन होतील स्वच्छ
टिचकी मारल्यानंतर जर तुम्हाला आतून पोकळ असल्यासारखा आवाज आला तर ते डाळिंब घ्यावं. वजनाने जड असलेलं डाळिंब घेणं टाळा. कारण ते पुर्णपणे पिकलेलं नसतं.