Lokmat Sakhi >Shopping > घरासाठी पडदे खरेदी करायचे? ४ टिप्स! नव्या वर्षात कमी खर्चात घराला मिळेल क्लासी लूक

घरासाठी पडदे खरेदी करायचे? ४ टिप्स! नव्या वर्षात कमी खर्चात घराला मिळेल क्लासी लूक

Home Decoration Ideas: घरासाठी पडदे खरेदी करणार असाल तर कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या ते पाहा..(How to choose curtain for getting rich classy look to our living room?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2025 16:34 IST2025-01-04T16:33:26+5:302025-01-04T16:34:33+5:30

Home Decoration Ideas: घरासाठी पडदे खरेदी करणार असाल तर कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या ते पाहा..(How to choose curtain for getting rich classy look to our living room?)

How to choose curtain for getting rich classy look to our living room, how to select colour combinations for curtain | घरासाठी पडदे खरेदी करायचे? ४ टिप्स! नव्या वर्षात कमी खर्चात घराला मिळेल क्लासी लूक

घरासाठी पडदे खरेदी करायचे? ४ टिप्स! नव्या वर्षात कमी खर्चात घराला मिळेल क्लासी लूक

Highlightsतुम्ही जे पडदे घ्याल ते खूप पॅटर्न असणारे, भडक- चमकदार रंग असणारे किंवा मोठे मोठे डिझाईन असणारे नको. पडदे नेहमी पेस्टल रंगाचे आणि प्लेन घ्या.

आपल्या घरामध्ये हॉलच्या भिंतींचा रंग, घरातला सोफा, सोफ्याचे कव्हर, फरशा, गालिचा या सगळ्या गोष्टी आपल्या हॉलचा लूक ठरविण्यासाठी जितक्या महत्त्वाच्या असतात तेवढेच महत्त्वाचे असतात खिडक्यांना, दरवाज्यांना लावलेले पडदे. जर पडदे सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी परफेक्ट असतील आणि पडद्यांचीच निवड चुकली असेल तर तुमच्या हॉलचा सगळा लूक बिघडू शकतो. त्यामुळेच बाकीच्या सगळ्या गोष्टींसोबतच पडद्यांची निवडही खूप काळजीपुर्वक केली पाहिजे (how to select colour combinations for curtain?). त्यासाठीच या काही टिप्स पाहा.. यामध्ये पडद्यांमध्ये थोडा बदल करून आपण आपल्या हॉलला किती क्लासी आणि रिच लूक देऊ शकतो, ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी खूप पैसे घालविण्याची अजिबात गरज नाही..(How to choose curtain for getting rich classy look to our living room?)

 

घरासाठी पडदे निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

१. पडदे लावण्यासाठी आपल्याला रॉड लागतो. तो रॉड खूप फॅन्सी किंवा भडक रंगाचा नको. रॉड आणि त्याचे हॅण्डल जेवढे सोबर असतील तेवढे ते जास्त रिच दिसतात.

बंदिश बँडीट्स फेम श्रेया चौधरीचे जबरदस्त वेटलॉस, म्हणाली 'या' अभिनेत्यामुळे वजन घटवू शकले..

तसेच तुमच्या खिडकीची लांबी जेवढी असेल त्यापेक्षा रॉडची लांबी १२ ते १५ सेमीने जास्त हवी. खिडकीच्या दोन्ही बाजुला ५ ते ७ इंच लांब रॉड गेला पाहिजे.

पालकांनी वाढत्या वयातल्या मुलांसमोर कधीच बोलू नयेत ५ गोष्टी, मुलांवर होतील वाईट परिणाम

२. हल्ली सिंगल रॉडऐवजी डबल रॉड आणि एकाच रंगाच्या पडद्याऐवजी कॉम्बिनेशन पडद्यांची फॅशन आहे. त्यामुळे तशा पद्धतीचे रॉड आणि पडदे घेण्यास प्राधान्य द्या. घराला आपोआपच मॉडर्न टच मिळेल.

 

३. कॉम्बिनेशनमध्ये पडदे घेणार असाल तर शीर कर्टन आणि पॉलिस्टर कर्टन यांचं कॉम्बिनेशन घ्या. फिकट रंग असणारे पातळ शीर कर्टन मधोमध लावा आणि त्याच्या आजुबाजुला गडद रंग असणारे पॉलिस्टर कर्टन लावा. यामुळे गरजेनुसार पडदा ओढून तुम्ही घरात अंधार, उजेड करू शकता.

केस गळणं थांबविण्यासाठी अभिनेत्री लता सभरवाल यांनी केला 'हा' उपाय; १० दिवसांतच दिसतो फरक

४. तुम्ही जे पडदे घ्याल ते खूप पॅटर्न असणारे, भडक- चमकदार रंग असणारे किंवा मोठे मोठे डिझाईन असणारे नको. पडदे नेहमी पेस्टल रंगाचे आणि प्लेन घ्या. त्यामुळे घराला खूप क्लासी लूक मिळतो आणि घर खूप हवेशीर, मोकळे आणि मोठे वाटते.

 

Web Title: How to choose curtain for getting rich classy look to our living room, how to select colour combinations for curtain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.