Lokmat Sakhi >Shopping > दिवाळीत मुलांना महागडे कपडे घेता आणि टोचतात म्हणत ते घालत नाहीत? ३ टिप्स, मुलांसाठी कपडे घेताना लक्षात ठेवाच..

दिवाळीत मुलांना महागडे कपडे घेता आणि टोचतात म्हणत ते घालत नाहीत? ३ टिप्स, मुलांसाठी कपडे घेताना लक्षात ठेवाच..

Comfortable Outfits For Children: कपडे टोचतात, असं म्हणत लहान मुलं महागडे कपडे अंगालाही लावत नाहीत. बऱ्याच पालकांची ही तक्रार असते. म्हणूनच मुलांसाठी कपडे खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 02:38 PM2022-10-19T14:38:11+5:302022-10-19T14:39:22+5:30

Comfortable Outfits For Children: कपडे टोचतात, असं म्हणत लहान मुलं महागडे कपडे अंगालाही लावत नाहीत. बऱ्याच पालकांची ही तक्रार असते. म्हणूनच मुलांसाठी कपडे खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा.

How to choose perfect festive dress for children? so that they feel more comfortable and easy  3 tips to keep in mind while buying clothes for kids.. | दिवाळीत मुलांना महागडे कपडे घेता आणि टोचतात म्हणत ते घालत नाहीत? ३ टिप्स, मुलांसाठी कपडे घेताना लक्षात ठेवाच..

दिवाळीत मुलांना महागडे कपडे घेता आणि टोचतात म्हणत ते घालत नाहीत? ३ टिप्स, मुलांसाठी कपडे घेताना लक्षात ठेवाच..

Highlightsमुलांनी असं केल्यावर एवढे मोठे पैसे वाया गेल्याचंही सारखं वाईट वाटतं. म्हणूनच मुलांसाठी जेव्हा असे फेस्टिव्ह कपडे घ्याल, तेव्हा या काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.

दिवाळीत आपण मोठी माणसं ज्या पद्धतीने नटतो, छान तयार होतो, तसंच आपल्या लहान मुलांनीही व्हावं, अशी अनेक पालकांची अपेक्षा असते. अर्थात त्यात काही गैरही नाही. म्हणूनच तर मग पालक मोठ्या हौशीने त्यांच्या मुलांसाठी महागडे कपडे खरेदी करतात. पण मुलं मात्र ते कपडे टोचतात (etching to children because of clothes?) म्हणून अंगाला लावायलाही नाही म्हणतात. पालकांनी रागावल्यावर, चिडल्यावर बळेबळेच एखादा तास अंगावर ठेवतात, पण त्यानंतर मात्र ते कपडे त्यांना मुळीच नको असतात. मुलांनी असं केल्यावर एवढे मोठे पैसे वाया गेल्याचंही सारखं वाईट वाटतं. म्हणूनच मुलांसाठी जेव्हा असे फेस्टिव्ह कपडे घ्याल (How to choose perfect festive dress for children?), तेव्हा या काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.

 

मुलांसाठी कपडे घेताना...
१. काॅटन किंवा सिल्क कॉटन

मुलांसाठी जे कपडे घ्याल, त्याचा कपडा एकदा तपासून पहा. शक्यतो झगमग कपडे मुलांसाठी घेऊच नका.

"एक कप चहा.." अशी ओरडून उद्धटासारखी ऑर्डर द्याल तर.. कॅफे मालकाने पहा काय लावलाय बोर्ड

त्याऐवजी कॉटन किंवा सिल्क कॉटन या प्रकारात उपलब्ध असणारे मऊसर कपडे घ्या. असे कपडे धुतल्यानंतर आणखीनच मऊ पडतात.

 

२. वर्क असणारे कपडे टाळा
वर्क असणारे कपडे घेताना आपण असा विचार करतो की वर्क तर बाहेरून आहे, मुलांना याचा त्रास होणार नाही.

कडधान्याचं उटणं! घरच्याघरी दिवाळीत तयार करा हे कडधान्याचं खास उटणं, मिळेल ब्रायडल ग्लो- चेहरा होईल सुंदर 

पण कपड्याच्या बाहेरच्या भागात जरी वर्क असलं तरी ते प्रत्येकवेळी हातांना, पायांना टोचतं. गळ्याजवळ, काखेत जर वर्क असेल, तर ते मुलांना हमखास त्रास देतंच. त्यामुळे कपड्यावर वर्क नेमकं कुठे आहे आणि ते मुलांच्या अंगाला कुठे लागू शकतं, हे एकदा तपासून बघा.

 

३. कपड्याची शिलाई
कपड्यावर जिथे शिलाई असते, तो भाग आतून असतो. या भागात जर काही दोरे, धागे किंवा ड्रेसच्या बाहेरून जे वर्क असते, त्याचा जो भाग आत मुडपलेला असतो, त्यानेही मुलांना त्रास होतो. त्यामुळे ड्रेस उलट करून एकदा त्याची शिलाई कशी आहे, हे बघायलाही विसरू नका. 
 

Web Title: How to choose perfect festive dress for children? so that they feel more comfortable and easy  3 tips to keep in mind while buying clothes for kids..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.