Join us  

How to choose perfect goggle : गॉगल खरेदी करताय, पण फॅशनबरोबरच डोळेही महत्त्वाचे! गॉगल खरेदी करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2022 1:16 PM

How to choose perfect goggle : आपण फॅशन म्हणून कमीत कमी किंमतीचा रस्त्यावर मिळणारा गॉगल खरेदी करतो. पण त्याचा डोळ्यांना त्रास होऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवे.

ठळक मुद्दे गॉगलचा आकार आपल्या आवडीचा घेत असताना त्याचे फिटींग आणि डोळे पूर्ण झाकले जातात की नाही हे पाहायला हवे.  रस्त्यावरुन डुप्लिकेट गॉगल खरेदी करणे पडेल महागात...

थंडीत ज्य़ाप्रमाणे आपण आवर्जून स्वेटर, टोपी, मोजे घालतो. त्याचप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढला की स्कार्फ, टोपी, गॉगल या गोष्टी आवश्यक असतात. त्वचा आणि डोक्याला ऊन लागू नये म्हणून आपण जशी काळजी घेतो तसेच डोळ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून (Summer Special) काळजी घेणे महत्त्वाचे असते. त्यासाठी उन्हाळ्यात गॉगल वापरणे अतिशय गरजेचे असते. गॉगल हा फॅशनसाठी वापरला जात असला तरी डोळ्यांचे संरक्षण करणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो हे लक्षात ठेवाया हवे. त्यामुळे गॉगल खरेदी करताना (How to choose perfect goggle) तो कसा दिसतो याबरोबरच त्याचा डोळ्यांना कसा उपयोग आहे याकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा आपण फॅशन म्हणून कमीत कमी किंमतीचा रस्त्यावर मिळणारा गॉगल खरेदी करतो. पण त्याचा डोळ्यांना त्रास होऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवे. पाहूयात गॉगल खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात...

(Image : Google)

१. काचेबाबत हे लक्षात ठेवा 

गॉगलची काच ही साधी प्लास्टीक, किंवा फायबरची असेल तर त्याचा उन्हापासून संरक्षण होण्यासाठी म्हणावा तसा उपयोग होत नाही. इतकेच नाही तर या काचेवर लगेच चरे पडतात आणि तसा चरे पडलेला गॉगल आपण दिर्घकाळ वापरत राहिलो तर दृष्टीला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे गॉगलची काच चांगल्या प्रतिची असेल याची काळजी घ्यावी. 

२. ब्रँडेड गॉगल घेताना

ब्रँडेड गॉगल महाग असतात म्हणून आपण सादे गॉगल घेण्याला पसंती देतो. पण ब्रँडेड गॉगलची क्वालिटी निश्चितच चांगली असते, त्यामुळे तुम्ही दिर्घकाळ एखादी वस्तू चांगली वापरत असाल तर आपल्या डोळ्यांसाठी एकदा पैसे खर्च करायला हरकत नाही. मात्र गॉगल नक्की त्याच ब्रँडचा आहे ना याची खातरजमा करुन चांगल्या दुकानातून किंवा शोरुममधून तो घ्यायला हवा. हल्ली बाजारात मोठमोठ्या कंपनीच्या नावाने डुप्लिकेट वस्तू विकल्या जातात. अशावेळी आपली फसवणूक होऊ शकते. 

३. पोलोराइज्ड म्हणजे काय? 

पोलोराइज्ड काचा म्हणजे सूर्याच्या अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणाऱ्या काचा. एरवी उन्हामुळे डोळ्यांना गरम झळा लागतात. त्यामुळे डोळे लाल होणे, चुरचुरणे, डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या उद्भवतात. पण आपल्या गॉगलची काच पोलोराइज्ड असेल तर डोळ्यांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते आणि आपले डोळे भर उन्हातही सुरक्षित राहतात. त्यामुळे पोलोराइज्ड काच असलेला गॉगल घेतलेला केव्हाही चांगला.

(Image : Google)

४. आकार आणि साईजबाबत

अमुक एक आकारातील गॉगल आपल्याला चांगला दिसतो म्हणून आपण तो खरेदी करतो. पण चांगले दिसण्याबरोबरच डोळ्यांना कोणता गॉगल फिट बसतो हे पाहणेही महत्त्वाचे आहे. अनेकदा आपल्याला गॉगल इतका घट्ट होतो की त्यामुळे चेहऱ्यावर वळ उठतात किंवा घाम येतो. किंवा काही वेळा गॉगल नुसते खाली पाहिले तरी पडतो. त्यामुळे गॉगलचा आकार आपल्या आवडीचा घेत असताना त्याचे फिटींग आणि डोळे पूर्ण झाकले जातात की नाही हे पाहायला हवे.  

टॅग्स :खरेदीसमर स्पेशल