Join us  

How to choose perfect jewellery : आपल्याला कोणते कानातले शोभतील, गळ्यातले कसे निवडायचे? 5 सोप्या टिप्स, खरेदी करा परफेक्ट ज्वेलरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2022 6:29 PM

How to choose perfect jewellery आपल्या चेहऱ्याचा आकार, रंग यानुसार ज्वेलरीची निवड कशी करायची हे अवलंबून असते, ज्वेलरी खरेदी करताना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात....

ठळक मुद्देआपल्या चेहऱ्याचा, शरीराचा आकार लक्षात घेऊन ज्वेलरीची निवड करायला हवीत्वचेचा रंग, स्कीन टोन आणि ज्वेलरीचा रंग यानुसार ज्वेलरी निवडल्यास सौंदर्य खुलण्यास होईल मदत

सण असो नाहीतर लग्नसमारंभ कपड्यांच्या खरेदीइतकीच ज्वेलरी खरेदीही महत्त्वाची How to choose perfect  jewellery असते. कोणत्या कपड्यावर काय छान दिसेल याबरोबरच आपल्या त्वचेचा रंग, आपल्या चेहऱ्याचा आकार, उंची यानुसार ज्वेलरीची निवड करणे आवश्यक असते. गोल्ड ज्वेलरीपासून ते अगदी रस्त्यावर मिळणारी स्वस्तात मस्त ज्वेलरी आपण खरेदी करत असतो. आपण ज्वेलरी खरेदी  jewellery shopping करायला गेलो की दुकानदार आपल्याला असंख्य प्रकार दाखवतो. मग त्यातले नेमके काय घ्यायचे, आपल्या कपड्यांवर, आपल्यावर काय उठून दिसेल याबाबत आपण फार कन्फ्युज होऊन जातो. ज्वेलरी खरेदी करताना आपल्याला कोणत्या प्रकारचे कानातले शोभतील, कोणते गळ्यातले आपल्या रंगाला आणि उंचीला सूट होतील या सगळ्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. पाहूयात ज्वेलरी खरेदी करतानाच्या सोप्या टिप्स...

(Image : Google)

१. आपल्या स्कीन टोनचा विचार करा

भारतातील लोकांच्या त्वचेचा रंग वेगवेगळा असतो. आपण ज्या भागात राहतो त्यानुसार तेथील हवामानाचा आपल्या रंगावर मोठा परिणाम होत असतो. उष्णता अधिक असलेल्या म्हणजेच केरळ, तामिळनाडू यांसारख्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची त्वचा काहीशी गडद रंगाची असते. तर काश्मिर किंवा हिमाचल प्रदेशामध्ये थंड हवामान असल्याने येथील लोक जास्त गोरे असतात. तर देशातील सर्व ठिकाणी विविध स्कीन टोन असणारे लोक आढळतात. त्यामुळे आपल्या त्वचेला सूट होईल अशी ज्वेलरी आपण खरेदी करायला हवी. 

२. ज्वेलरीच्या रंगाविषयी

ज्वेलरी खरेदी करताना आपण स्टोन, मोती, कुंदन अशा वेगवेगळ्या प्रकारातील ज्वेलरी घेतो. अशावेळी आपल्या कपड्यांच्या रंगाबरोबरच आपल्या स्कीनचा टोन लक्षात घेऊन त्यानुसार ज्वेलरी खरेदी करायला हवी. यातही सिल्व्हर, गोल्डन, ऑक्सिडाईज, रोज पिंक अशा वेगवेगळ्या बेसमध्ये ज्वेलरी मिळते. आपल्या रंगावर कोणता बेस चांगला वाटेल याचा योग्य तो विचार करुन मगच नेमका बेस कलर निवडावा.

३. मोती आणि ख़डे निवडताना 

मोत्यांचे दागिने घेताना साधारणपणे पांढऱ्या रंगाचे किंवा मोती रंगाचे मोती खरेदी केले जातात. मात्र यामध्ये गुलाबीसर रंगाचे तसेच थोडे सिल्व्हर शेडकडे जाणारे मोतीही पाहायला मिळतात. तुमचा रंग गोरा असेल तर तुम्हाला पारंपरिक मोतिया कलरचे तसेच रोज शेडच्या मोत्याचे दागिने छान दिसतात. तर तुमचा रंग थोडा गव्हाळ असेल तर तुम्हाला सिल्व्हर शेडमधील मोती जास्त चांगले दिसतात. 

(Image : Google)

४. चेहऱ्याचा आकार लक्षात घ्या

तुमचा चेहरा गोल, चौकोनी, दंडगोल कशा प्रकारचा आहे हे लक्षात घ्या. त्यानुसार तुमची ज्वेलरी निवडा. चेहऱ्याच्या आकारानुसार ज्वेलरीची निवड केल्यास तुमचे सौंदर्य जास्त खुलू शकेल. त्यामुळे चेहऱ्याचा आकार लक्षात घेऊन त्यानुसार ज्वेलरीची निवड करा. 

५. तुमची पर्सनॅलिटी लक्षात घ्या

तुम्ही जाड आहात की बारीक, उंच आहात की बुटके किंवा मध्यम उंचीचे यानुसारही तुमच्या ज्वेलरीची निवड करा. तुमच्या शरीराचा बांधा, त्याची ठेवण लक्षात घेऊन ज्वेलरी निवडल्यास ती ज्वेलरी आपल्यावर आणखी खुलण्यास मदत होईल. तुमच्या डोळ्यांचा रंग, कानांचा आकार, हनुवटीचा आकार हाही तुमच्या दागिन्यांची निवड करताना लक्षात घ्यायला हवा.  

टॅग्स :खरेदीब्यूटी टिप्सदागिने