Lokmat Sakhi >Shopping > दिवाळीत नवा प्रेशर कुकर घ्यायचाय? खरेदी करताना कायम तपासून पाहा ३ गोष्टी, निवडा उत्तम कुकर

दिवाळीत नवा प्रेशर कुकर घ्यायचाय? खरेदी करताना कायम तपासून पाहा ३ गोष्टी, निवडा उत्तम कुकर

Shopping for Pressure Cooker: कधी कधी दिवाळीत मिळणाऱ्या सवलतींना आपण भुलतो आणि मग गरज नसताना अनेक चुकीच्या वस्तूंची खरेदी करून बसताे. त्यासाठीच या काही टिप्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 06:09 PM2022-10-11T18:09:16+5:302022-10-11T18:10:03+5:30

Shopping for Pressure Cooker: कधी कधी दिवाळीत मिळणाऱ्या सवलतींना आपण भुलतो आणि मग गरज नसताना अनेक चुकीच्या वस्तूंची खरेदी करून बसताे. त्यासाठीच या काही टिप्स.

How to choose perfect pressure cooker for house? 3 Tips for selecting perfect cooker | दिवाळीत नवा प्रेशर कुकर घ्यायचाय? खरेदी करताना कायम तपासून पाहा ३ गोष्टी, निवडा उत्तम कुकर

दिवाळीत नवा प्रेशर कुकर घ्यायचाय? खरेदी करताना कायम तपासून पाहा ३ गोष्टी, निवडा उत्तम कुकर

Highlightsबऱ्याचदा आपण ती वस्तू कशी आहे, यापेक्षा त्यावर मिळणारी सवलत कशी आहे, हे बघण्यात गुंतून जातो आणि मग चुकीची वस्तू घरी घेऊन येतो.

स्वयंपाक घरातल्या अनेक गोष्टींची खरेदी दिवाळीचे मुहूर्त गाठून केली जाते (festive shopping). या काळात केली जाणारी खरेदी यासाठी वाढलेली असते, कारण या दरम्यान जवळपास प्रत्येक वस्तूवरच खूप सवलती दिल्या जातात. बऱ्याचदा आपण ती वस्तू कशी आहे, यापेक्षा त्यावर मिळणारी सवलत कशी आहे, हे बघण्यात गुंतून जातो आणि मग चुकीची वस्तू घरी घेऊन येतो. म्हणूनच यंदा दिवाळीला प्रेशर कुकर खरेदी करायचा (How to choose perfect pressure cooker for house?) असेल तर मिळणाऱ्या सवलतींपेक्षा अधिक लक्ष या काही गोष्टींकडे द्या (Shopping for Pressure Cooker).

 

प्रेशर कुकरची खरेदी करताना...
१. किती मोठा आणि कोणत्या झाकणाचा घ्यावा?

आपली गरज किती, आपण रोजच्या वापराला घेणार की कधी तर पाहूणे मंडळी आल्यावर लावायला मोठा घेणार हे एकदा ठरवून घ्या. त्यानुसार कुकर किती लीटरचा घ्यायचा, याचा अंदाज येतो.

मुलं खूपच टीव्ही पाहतात, ऐकतच नाहीत? ४ उपाय, टीव्ही बघणं होईल कमी..

रोजच्या वापरासाठी घेणार असाल तर बाहेरचे झाकण असणारा घ्या. आतले झाकण असणारे कुकरचे डबे परफेक्ट मापाचे लागतात. कधी कधी रोजच्या गडबडीत भांड्यांची अदलाबदल होते. मग त्यात आत बसणारे डबे नसतील, तर पंचाईत होते. तशी अडचण बाहेरचे झाकण असणाऱ्या कुकरची होत नाही. त्यात वेगवेगळ्या आकाराचे डबे ॲडजस्ट होऊन जातात.

 

२. स्टिलचा, हिंडालियम की नॉन स्टिक?
रोजच्या वापराला घेणार असाल तर स्टील किंवा हिंडालियमचा कुकर घेणे कधीही चांगले. हे कुकर दणकट असतात शिवाय कोणत्याही घासणीने घासले तरी चालतात.

आलिया भट- करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीचा खास सल्ला, ५ व्यायाम, योगा कधीही-कुठेही.. कारण

नॉनस्टिक कुकर मात्र रोजच्या सरधोपट वापरासाठी तेवढे सहज नसतात. त्यामुळे कधीतरीच लावायला घेणार असाल तर नॉनस्टिक घेऊ शकता.

 

३. इंडक्शनवर चालणारा कुकर घ्यावा का?
घरात इंडक्शन असेल तर इंडक्शनवर चालणारा कुकर नक्की घ्या. पण तो चांगल्या नावाजलेल्या ब्रॅण्डचा असावा.

हरबऱ्याच्या डाळीचं पारंपरिक धिरडं खाण्याचे ५ फायदे, खमंग धिरडं चवीलाही उत्तम आणि पोटभरीचं

कारण साधारण क्वालिटीचा कुकर घेतला तर काही दिवसांनी कुकरच्या तळाला ती इंडक्शनवर चालण्यासाठी प्लेट लावलेली असते, ती प्लेट निघून जाते.  

 

Web Title: How to choose perfect pressure cooker for house? 3 Tips for selecting perfect cooker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.