Lokmat Sakhi >Shopping > टरबूज घेताना लक्षात ठेवा ३ टिप्स, बघा न फोडता कसं ओळखायचं गोड, रसरशीत टरबूज

टरबूज घेताना लक्षात ठेवा ३ टिप्स, बघा न फोडता कसं ओळखायचं गोड, रसरशीत टरबूज

3 Simple Tips To Identify Ripe, Sweet And Red Watermelon: टरबूज पिकलेले- लालबूंद आहे की कच्चे पांढरे आहे हे अगदी चटकन ओळखायचं असेल तर या काही खास टिप्स लक्षात ठेवा... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2024 03:46 PM2024-05-08T15:46:25+5:302024-05-08T15:47:19+5:30

3 Simple Tips To Identify Ripe, Sweet And Red Watermelon: टरबूज पिकलेले- लालबूंद आहे की कच्चे पांढरे आहे हे अगदी चटकन ओळखायचं असेल तर या काही खास टिप्स लक्षात ठेवा... 

How to choose perfect watermelon in summer, 3 simple tips to identify ripe, sweet and red watermelon | टरबूज घेताना लक्षात ठेवा ३ टिप्स, बघा न फोडता कसं ओळखायचं गोड, रसरशीत टरबूज

टरबूज घेताना लक्षात ठेवा ३ टिप्स, बघा न फोडता कसं ओळखायचं गोड, रसरशीत टरबूज

Highlightsआपली टरबूजाची खरेदी अगदी परफेक्ट व्हावी यासाठी टरबूज खरेदी करताना ३ गोष्टी नेहमी तपासून घ्या

टरबूज हे उन्हाळ्यातलं बहुतांश लोकांचं अगदी आवडीचं फळं. आंब्याच्या मागोमाग जे फळं कित्येक लोकांना उन्हाळ्यात खायला आवडतं, ते फळ म्हणजे टरबूज. पण बऱ्याचदा असं होतं की टरबूज घेताना आपली निवड नेमकी फसते आणि मग सगळाच हिरमोड होऊन जातो. आपण आणलेलं टरबूज अगदीच पांढरं, कच्चं निघतं. त्यामुळे मग एवढं मोठं फळ वाया जातं. पैसेही वाया जातात. असं होऊ नये आणि आपली टरबूजाची खरेदी अगदी परफेक्ट व्हावी यासाठी टरबूज खरेदी करताना ३ गोष्टी नेहमी तपासून घ्या (How to choose perfect watermelon in summer). लालबुंद, गोड, रसाळ फळ ओळखण्याच्या त्या काही सोप्या ट्रिक्स आहेत. (3 simple tips to identify ripe, sweet and red watermelon)

 

लालबूंद गोड टरबूज कसं ओळखायचं?

टरबूज गोड लालबूंद आहे की नाही हे कसं ओळखायचं याविषयीच्या काही सोप्या ट्रिक्स organicshandy या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत.

१ रुपयाही खर्च न करता त्वचेवर येईल आलिया- कतरिनासारखा नॅचरल ग्लो- बघा सोपा उपाय...

१. टरबुजावरच्या रेषा

टरबूज पिवळसर रंगाचं असो किंवा मग गर्द हिरव्या रंगाचं असो. टरबुजावर एका समान अंतरावर उभ्या रेषा दिसतात. जर टरबुजावरच्या रेषा एकमेकींपासून अगदी समान अंतरावर असतील तर ते टरबूज पिकलेलं नाही. जे टरबूज पिकलेलं असतं, त्याच्यावरच्या रेषा मधूनच तुटलेल्या दिसतात किंवा एकमेकींपासून कमी- जास्त अंतरावर असतात.

 

२. टरबुजाचे देठ

ज्या टरबुजाचे देठ हिरवेगार असते ते टरबूज कच्चे असते. ज्या टरबुजाचे देठ वाळलेले आणि लाकडासारखे चॉकलेटी रंगाचे झालेले असते, ते टरबूज पिकलेले असते.

जास्वंदाला फुलं येतच नाहीत? यापैकी १ उपाय करा, रोपावरची फुलं कधीच कमी होणार नाहीत

३. टरबुजाचा आवाज

तुम्ही जे टरबूज खरेदी करण्यासाठी निवडलं असेल त्या टरबुजावर हाताने थपथपल्यासारखे करा. जर टरबुजातून येणारा आवाज थोडा जड आणि बसका वाटला तर ते टरबूज घेऊ नका. टरबूजावर मारल्यानंतर ते आतून हलके आहे, असे जाणवले तरच ते घ्या. कारण ते पिकलेले असते. 

 

Web Title: How to choose perfect watermelon in summer, 3 simple tips to identify ripe, sweet and red watermelon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.