Join us  

दिवाळीच्या खर्चाचं टेन्शन आलं? बजेट कंट्रोलमध्ये राहण्यासाठी ४ गोष्टी कटाक्षाने पाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 9:15 AM

Tips for Controlling Diwali Budget: दिवाळीचा खर्च थोडा- थोडा करत कसा वाढत जातो, ते कळतच नाही. म्हणूनच दिवाळीनंतर होणारा पैशांचा ठणठणाट टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. 

ठळक मुद्देयावर्षी खरेदी करण्यापुर्वी या काही गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवा. म्हणजे मग शॉपिंग होईल अगदी बजेटमध्ये....

दिवाळीला उत्साहाच्या भरात आपण खर्च करतो.. आवडलेली प्रत्येक वस्तू घेण्याकडे आपला कल असतो. आनंद, उत्साह यामुळे दणक्यात खरेदी होऊन जाते खरी. पण नंतर मात्र भरमसाठ खर्च (how to control lots of expenses during diwali shopping?) झाल्याने चांगलंच दिवाळं निघालंय, याची जाणीव होते. दरवर्षी आपण ठरवतो आणि स्वत:ला पक्क बजावतो की पुढच्या वर्षी असं नाही करायचं... पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न... जेवढा व्हायचा तेवढा खर्च होऊनच जातो. यावर्षी पुन्हा तसंच होऊ नये, म्हणून खरेदी करण्यापुर्वी या काही गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवा. म्हणजे मग शॉपिंग होईल अगदी बजेटमध्ये (tips for budget shopping).

 

दिवाळीची खरेदी करण्यापुर्वी या गोष्टी लक्षात ठेवा१. विंडो शॉपिंगवर कंट्रोलदिवाळीच्या दिवसांमध्ये बाजारात फिरून विंडो शॉपिंग करण्याची मजा काही वेगळीच असते. दुकानांसमोरची लाईटिंग, सजलेली दुकाने पाहिली, तर मन प्रसन्न होऊन जाते.

काजोलची ३४ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, गोटा पट्टी बॉर्डरमुळे दिसतेय खुलून; साडीची खासियत अशी की..

इतक्या देखण्या वस्तू बाहेर लावलेल्या असतात की ते घेण्याचा भयंकर मोह होतो. त्यामुळे विंडो शॉपिंग करताना पण एक बजेट ठरवून घ्या आणि त्याच्या बाहेर जायचे नाही, हे पक्के ठरवून टाका.

 

२. ऑनलाईन साईट्सचा मोहदसरा- दिवाळीच्या निमित्ताने ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर भव्य सेल सुरू असतो. वस्तूंची कमी किंमत पाहून आपण मोहात पडतो आणि मग गरज नसताना वेगवेगळ्या वस्तू घेऊन ठेवतो. अशी खरेदी करताना संयम बाळगा. जे घरात नाही किंवा ज्याची खरोखरच गरज आहे, फक्त तेवढेच घ्या.

 

३. गिफ्टचा खर्च मर्यादित ठेवादिवाळीत इतरांसाठीही भरपूर गिफ्ट्स घ्यावे लागतात. बऱ्याचदा एका गिफ्टचे बजेट जर २०० रुपये ठेवलेले असेल आणि नेमकी त्याच्यापेक्षा २०- २५ रुपयांनी महागडी वस्तू आवडली तर आपण ती सरळ घेऊन टाकतो.

करवा चौथ स्पेशल : करवा चौथसाठी सुंदर नटलेल्या ७ अभिनेत्री, खास ट्रेण्डी- ट्रॅडिशनल लूक

पण अशा प्रत्येक गिफ्टच्या वाढलेल्या किमतीमुळे मात्र बजेटचा आकडा भलताच फुगून जातो. त्यामुळे ठरवल्यापेक्षा कमी किमतीचं गिफ्ट घ्या, पण प्रत्येक गिफ्टच्या मागची किंमत वाढू देऊ नका.

 

४. पुढच्या महिन्याचा खर्च आधीच बाजूला ठेवादिवाळीत पगार, बोनस असं सगळंच अकाऊंटला जमा होतं. त्यामुळे पैसे जास्त दिसतात आणि मग आपण खर्च करत जातो.

प्रेग्नन्सीमध्ये हाय हिल्स घातल्यानं ट्रोल झालेल्या बिपाशा बसूच्या पायात सोनेरी चपला.. पहा व्हायरल फोटो

पण हे टाळण्यासाठी पुढच्या महिन्याचा खर्च आधीच बाजूला वेगळा काढून ठेवा. म्हणजे आपोआप पैसे कमी दिसले की खर्चही कमी केला जातो. 

 

टॅग्स :खरेदीऑनलाइनदिवाळी 2021