Join us  

Diwali Shopping: दिवाळीत गिफ्ट्स खरेदी करताना वारेमाप खर्च होतो? ३ टिप्स- खरेदी होईल एकदम बजेटमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 5:42 PM

Shopping Tips For Diwali Gifts: दिवाळीत इतरांना (Diwali 2024 Celebration) देण्यासाठीच्या गिफ्ट्सची खरेदी एकदम बजेटमध्ये (Diwali Shopping) करण्यासाठी या काही गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील.(how to do Diwali shopping in budget?)

ठळक मुद्देआपल्याला किती जणांना भेटवस्तू द्यायच्या आहेेत आणि त्याचं साधारण बजेट काय ठेवायचं आहे, हे आधीच ठरवून घ्या. दुकानात गेल्यावर त्यामुळे वस्तूंची निवड करणं सोपं जातं.

दिवाळीच्या आधी आपण एकदम उत्साहात असतो. भरपूर खरेदी करण्याच्या मूडमध्ये असतो. यानिमित्ताने नातेवाईकांना, मित्रमंडळींना काही ना काही तरी द्यावं असं आपल्याला वाटतं. शिवाय वर्षातून एकदाच द्यायचं आहे तर जरा चांगलं गिफ्ट देऊ असंही आपल्याला वाटतं (Diwali Shopping). त्यामुळे मग आपण अगदी जोमाने खरेदी करतो आणि त्यानंतर मग लक्षात येतं की उत्साहाच्या भरात आपण जरा जास्तच खर्च केला आहे. आपलं दिवाळीच्या इतर खर्चाचं आणि महिन्याचं बजेट पार कोलमडून जातं  (Diwali Shopping Tips in Marathi) असं यावर्षी तुमच्याबाबतीत होऊ द्यायचं नसेल तर दिवाळीत भेटवस्तू खरेदी करताना या काही गाेष्टी लक्षात ठेवा (how to avoid excessive expenses in Diwali shopping?).. खर्च आटोक्यात राहण्यास नक्कीच त्याचा उपयोग होईल...(how to do Diwali shopping in budget?)

दिवाळीमध्ये भेटवस्तूंची खरेदी करताना...

 

१. बजेटचा आकडा ठरवून घ्या...

आपल्याला किती जणांना भेटवस्तू द्यायच्या आहेेत आणि त्याचं साधारण बजेट काय ठेवायचं आहे, हे आधीच ठरवून घ्या. दुकानात गेल्यावर त्यामुळे वस्तूंची निवड करणं सोपं जातं.

पाठ दुखते म्हणून मुलं तक्रार करतात? डॉक्टर सांगतात त्यामागची ३ कारणं, मुलांची पाठदुखी थांबविण्यासाठी...

यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही जर प्रत्येकी १०० रुपये एवढं बजेट ठरवलं असेल तर त्याच किमतीत येणारी वस्तू घ्या. त्याच्यापेक्षा महाग असणारी एखादी वस्तू आवडली तर स्वत:वर कंट्रोल करा. कारण इथेच आपला जास्त खर्च होण्याची खूप दाट शक्यता असते. जे तुम्ही बजेट ठरवलं आहे, ते तंतोतंत पाळलं तर नक्कीच खर्च वाचतो.

 

२. होलसेल दरात खरेदी करा

दिवाळीत जर तुम्हाला खूप लोकांसाठी भेटवस्तू घ्यायच्या असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वस्तू शोधत बसू नका. अशी एक वस्तू ठरवा जी सरसकट सगळ्यांनाच दिली जाऊ शकते.

दिवाळीसाठी किचनची साफसफाई कुठून सुरू करावी सुचेना? ५ टिप्स- काम होईल सोपं आणि फटाफट

अशा वस्तूंची मग एकाच दुकानातून एकदम खरेदी करा. तुम्ही जर खूप वस्तू एकाचवेळी घेतल्या तर दुकानदार नक्कीच त्याची किंमत कमी करतो. याचा आपल्याला चांगलाच फायदा होऊ शकतो.

 

३. ऑनलाईन सेल

ऑनलाईन शॉपिंग साईटवर दिवाळीनिमित्त खूप सेल चालू असतात. या शॉपिंग साईटवरूनही तुम्ही घरबसल्या पाहिजे त्या वस्तूंची खरेदी करू शकता. फक्त ही खरेदी करताना रिटर्न पॉलिसी आहे ना ते एकदा तपासून घ्या.

मूड ऑफ असताना तृप्ती डिमरी खाते 'हे' २ पदार्थ, ती सांगते-मला स्वयंपाक करायलाही आवडतं पण..

जेणेकरून वस्तू न आवडल्यास आपल्याला त्या परत पाठवता येतील. शिवाय कोणतीही वस्तू घेताना ग्राहकांनी त्याला दिलेले रिव्ह्यू, ग्राहकांनी पाठवलेले फोटो आधी तपासून घ्या आणि मगच ती वस्तू खरेदी करा. 

 

टॅग्स :खरेदीदिवाळी 2024