Lokmat Sakhi >Shopping > स्वेटर चांगल्या क्वालिटीचं आहे, हे कसं ओळखाल? लहान मुलांसाठी स्वेटर घेताना लक्षात ठेवा ५ गोष्टी

स्वेटर चांगल्या क्वालिटीचं आहे, हे कसं ओळखाल? लहान मुलांसाठी स्वेटर घेताना लक्षात ठेवा ५ गोष्टी

Shopping Tips For Sweater And Jacket For Kids: हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे मुलांसाठी स्वेटर खरेदी करायची असेल तर या काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.(how to identify good quality of sweater?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2024 01:16 PM2024-11-16T13:16:04+5:302024-11-16T15:40:23+5:30

Shopping Tips For Sweater And Jacket For Kids: हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे मुलांसाठी स्वेटर खरेदी करायची असेल तर या काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.(how to identify good quality of sweater?)

how to identify good quality of sweater, 5 tips for purchasing sweater and jacket for kids, shopping tips for sweater and jacket for kids | स्वेटर चांगल्या क्वालिटीचं आहे, हे कसं ओळखाल? लहान मुलांसाठी स्वेटर घेताना लक्षात ठेवा ५ गोष्टी

स्वेटर चांगल्या क्वालिटीचं आहे, हे कसं ओळखाल? लहान मुलांसाठी स्वेटर घेताना लक्षात ठेवा ५ गोष्टी

Highlightsलहान मुलांसाठी स्वेटर खरेदी करणार असाल तर या काही गोष्टी नक्कीच तपासून घ्या.

वातावरणात अजूनही म्हणावी तशी थंडी नाही. त्यामुळे नोव्हेंबरचा मध्य आला तरी अजूनही स्वेटर घालण्याची गरज अनेक भागांत भासलेली नाही. पण लहान मुलांना ही थंडी लगेच बाधते. त्यामुळे त्यांची काळजी घेणं आणि त्यांना सायंकाळनंतर गरम कपडे घालणं गरजेचंच आहे (5 tips for purchasing sweater and jacket for kids). म्हणूनच लहान मुलांसाठी स्वेटर खरेदी करणार असाल तर या काही गोष्टी नक्कीच तपासून घ्या (shopping tips for sweater and jacket for kids). यामुळे तुम्ही घेत आहात ते स्वेटर चांगल्या दर्जाचं आहे की नाही याचा अंदाज येईल आणि तुमची खरेदी अगदी परफेक्ट होईल.(how to identify good quality of sweater?)

 

मुलांसाठी स्वेटर खरेदी करताना..

१. लहान मुलांसाठी तुम्ही जेव्हा स्वेटर खरेदी करता तेव्हा ते त्यांचा विचार करून खरेदी करा. काही स्वेटर दिसायला अतिशय आकर्षक असतात. पण थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. त्यामुळे लहान मुलांसाठी स्वेटर खरेदी करताना सजावटीपेक्षा त्याचा उपयोग कसा आहे, यावर भर द्या.

पाहा घरच्याघरी काजळ बनविण्याची वर्षांनुवर्षे जुनी पद्धत- डोळ्यांना थंडावा मिळून टपोरे- सुंदर दिसतील

२. बरेच पालक पुढच्यावर्षीही चालावं या हिशोबाने मुलांना जरा मोठं स्वेटर घेतात. पण स्वेटर जर सैल झालं तर ते उबदार राहात नाही. त्यातून थंडी वाजतेच. जे स्वेटर अंगाला घट्ट बसतं, तेच स्वेटर उबदार असतं. त्यामुळे मुलांना नेहमी परफेक्ट फिटिंगचंच स्वेटर घ्या.

 

३. स्वेटर घेताना त्याचा कोणताही एक भाग हातात पकडा आणि थोडासा ताणून बघा. जर सोडल्यानंतर स्वेटर त्या भागात थोडं फुगीर राहीलं तर ते चांगल्या दर्जाचं नाही. ताणल्यानंतर पुन्हा जशासतसं होणारं स्वेटर चांगल्या दर्जाचं असतं.

हिवाळ्यात भरभरून फुलं देणारी ५ रोपं नक्की लावा; रंगबेरंगी फुलांनी बहरून जातील कुंड्या...

४. स्वेटरची बाह्य बाजू जशी तपासून पाहिली तसंच आतमध्ये हात घालून त्याचा स्पर्श हाताला कसा जाणवतो आहे, हे देखील पाहा. तसेच स्वेटरची आतून शिवण कशी आहे ते पाहा. कारण बरेच लहान मुलं टोचतं म्हणून स्वेटर घालणं टाळतात. त्यामुळे ते आतून मऊ असेल याची खात्री करूनच खरेदी करा. 

५. जे स्वेटर ॲक्रॅलिक, रेयॉन, पॉलिस्टर या धाग्यांनी तयार केलेले असतात, ते घेणं टाळा. कारण ते दिसायला आकर्षक असले तरी अजिबातच टिकाऊ, उबदार नसतात.  
 

Web Title: how to identify good quality of sweater, 5 tips for purchasing sweater and jacket for kids, shopping tips for sweater and jacket for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.