अनेक घरांमध्ये महालक्ष्मी किंवा गौरींसाठी नव्या साड्यांची खरेदी केली जाते. आधी नव्या साड्या महालक्ष्मीला नेसवायच्या आणि नंतर दसरा किंवा दिवाळीला त्या स्वत: नेसायच्या असं अनेक जणी करतात. कारण या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी सेल सुरू असतो. शिवाय दुकानांमध्ये दसरा- दिवाळीसारखी गर्दीही नसते. त्यामुळे शांततेत साड्या बघता येतात. शिवाय सेल असल्याने कमी किमतीतही साड्या मिळतात. पण कमी किमतीच्या मोहापायी आपण डुप्लिकेट किंवा नकली कांजीवरम साडी तर नाही घेत ना... हे एकदा बघायला हवे (How to identify pure Kanjivaram or Kanchipuram saree?). म्हणूनच या काही टिप्स बघून घ्या. जेणेकरून कांजीवरम साडी खरेदी करताना फसवणूक होणार नाही. (Difference between pure kanjivaram and fake kanjivaram saree)
अस्सल कांजीवरम साडी कशी ओळखायची?
कांजीवरम साडीची खरेदी करताना पुढील ६ गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत.
१. याविषयी फॅशन डिझायनर श्वेता कपूर HT Lifestyle यांच्याशी बोलताना म्हणाल्या की कांजीवरम साडी घेताना तिचा पदर आधी तपासला पाहिजे. साडीपेक्षा जर पदर वजनाने जड असेल तर ती खरी कांजीवरम साडी आहे. तसेही कांजीवरम साडी ही जडच असते. कारण तिच्यावर खूप जरीकाम असते. लाईटवेट कांजीवरम साडी नसते.
दिवाणच्या बॉक्समध्ये भरुन ठेवलेल्या कपड्यांना कुबट वास येतो? ३ उपाय, न धुताच कपड्यांना येईल सुगंध
२. त्यांनी सांगितलेला दुसरा मुद्दा असा की कांजीवरम साडी घेताना त्या साडीवर नेहमी Silk Mark Organization of India यांनी दिलेला Silk Mark symbol आहे की नाही ते तपासून घ्यावे. यातून साडी अस्सल आहे की नाही, हे ओळखता येते.
३. व्यापारी मनोज कपूर म्हणतात की कांजीवरम साडीची जर नखाने थोडी खरवडून बघा. जर निघालेला धागा जर सोनेरी रंगाचा असेल तर तुमची साडी अस्सल आहे. पांढरा किंवा राखाडी रंगाचा धागा निघाल्यास साडीच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
गौरी- गणपतीच्या डेकोरेशनसाठी ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या आकर्षक बॅकड्रॉप, बघा ३ सुंदर पर्याय
४. साडीवर तुमचा तळहात घासून पाहा. हाताला जर मऊ लागले आणि त्याठिकाणचे तिचे तापमान थोडे वाढल्यासारखे वाटले तर ती शुद्ध कांजीवरम आहे. ज्या नकली साड्या असतात, त्या तळहाताला मऊ लागत नाहीत. शिवाय हाताने चोळल्यावर त्यांचे तापमानही बदलत नाही.
५. कांजीवरम साडीची अस्सलता उन्हात लगेच दिसून येते. उन्हात ती खूप चमकते. इतर कोणतीही साडी तिच्यासमोर फिकी पडते. त्यामुळे उन्हात ती सगळ्या बाजूंनी नीट निरखून बघा.
कुंडीतल्या मातीत मिसळा ३ पदार्थ, तुमच्या छोट्याशा बागेतही फुलतील भरपूर फुलं- झाडं वाढतील जोमानं
६. कांजीवरम साडीच्या शुद्धतेच्या बाबतीत फार पुर्वीपासून केली जाणारी एक परिक्षा म्हणजे ती साडी अंगठीतून घातली तरी आरपार निघते. अर्थात त्यासाठी अंगठी खूप लहान नको. कुठेही न अडकता साडी अंगठीतून निघाली तर ती १०० टक्के शुद्ध आहे.