Lokmat Sakhi >Shopping > स्मार्ट-स्टायलिश दिसायचं तर लक्षात ठेवा ५ फॅशन टिप्स

स्मार्ट-स्टायलिश दिसायचं तर लक्षात ठेवा ५ फॅशन टिप्स

How To Look Fashionable Fashion Tips : कोणत्याही निमित्ताने शॉपिंग करण्याचा विचार करताय? खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2023 10:35 AM2023-06-11T10:35:11+5:302023-06-11T11:10:16+5:30

How To Look Fashionable Fashion Tips : कोणत्याही निमित्ताने शॉपिंग करण्याचा विचार करताय? खास टिप्स...

How To Look Fashionable Fashion Tips : Look more fashionable with the help of these fashion tips | स्मार्ट-स्टायलिश दिसायचं तर लक्षात ठेवा ५ फॅशन टिप्स

स्मार्ट-स्टायलिश दिसायचं तर लक्षात ठेवा ५ फॅशन टिप्स

फॅशनेबल कपडे घालायला आपल्याला सगळ्यांनाच आवडते. आजची पिढी तर कपड्यांच्या बाबतीत प्रचंड सजग आहे. ऑफिसला जाताना, मित्रमैत्रिणींसोबत लंचला अथवा डिनरला जाताना, पार्टीला जाताना, पिकनिकला जाताना असे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आजकाल प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये पाहायला मिळतात. फिरायला जायचा बेत आखला की खरेदी करणं हे तरुण पिढीसाठी अनिर्वाय असतं. तुम्ही सुद्धा व्हेकेशनला जायचा विचार करत असाल तर शॉपिंग करण्यासाठी ॲमेझॉनवर तुम्हाला खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत (How To Look Fashionable Fashion Tips).

१. महिलांनी व्हेकेशनवर जायच्या आधी जरूर करा ही शॉपिंग

फिरायला जायचे म्हटले की, कोणकोणत्या गोष्टी पाहायच्या हे आपण आधीच ठरवतो. कोणत्या ठिकाणी किती दिवस राहायचे, तिथे काय काय खायचे याचे प्लानिंग कित्येक दिवस आधीपासून सुरू होते. आता तर या प्लानिंगमध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. एखाद्या ठिकाणी फिरायला जाताना कोणत्या दिवशी कोणते कपडे घालयचे, कोणता ट्रेंड फॉलो करायचा याविषयी विचार केला जातो. एक मस्त लूक येण्यासाठी तुम्ही मोठ्या आकाराचे शर्ट, वन पिस याची निवड करू शकता. तसेच वेगवेगळ्या रंगाची प्रिंट असलेल्या कपड्यांना देखील तुम्ही प्राधान्य देऊ शकता. हे कपडे तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालतील. फुल अम्ब्रेला घेर असलेला वन पीस, लूज पॅटर्न शॉर्ट कुर्ता कोणत्याही महिलेवर उठून दिसतो. छान प्रिंट असलेले सैल वन पीस, पँट याची देखील नक्कीच शॉपिंग करा. तसेच सध्या कट्स डिझाइनचा चांगलाच बोलबाला आहे. ड्रेसच्या पाठीमागे, पुढे, अथवा हातावर आपल्याला हे कट्स पाहायला मिळतात. 

२. फुलाचे डिझाईन असलेल्या प्रिंटला द्या प्राधान्य

कपड्यांवर कोणती प्रिंट असली की ते कपडे अधिक छान दिसतील असा आपण कपडे घेताना अनेकवेळा विचार करतो. खरं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कपड्यांवर विविध फुलांचे प्रिंट असले तर ते खूपच आवडते. सध्या फुलांच्या डिझाईनची चलती आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण विविध आकाराची फुले असलेले डिझाइन आपल्याला कपड्यांवर, शूजवर, बॅगवर देखील पाहायला मिळते. एवढेच नव्हे तर फुलांच्या डिझाईनचे कानातले, अंगठ्या, गळ्यातले याला देखील चांगलीच मागणी आहे.

३. या फॅशन टिप्स आहेत महिला आणि पुरुष दोघांसाठीही उपयुक्त

आता पुरुषांप्रमाणे महिलादेखील शर्ट, टी-शर्ट, पँट परिधान करायला लागल्या आहेत आणि एवढेच नव्हे तर हे दोघेही सध्या ब्लेझरच्या प्रेमात पडले आहेत असेच म्हणावे लागेल. कारण ब्लेझर, त्यावर साजेसा टाय आणि बेल्ट असा पेहराव दोघांनाही प्रचंड आवडत आहे. या ब्लेझरमध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यावरील बटणं, खिसे याच्यावर आपल्याला विविध डिझाईनदेखील दिसून येतात. या ब्लेझरप्रमाणेच महिला आणि पुरुष दोघांनाही जंपसूट घालणे कर्म्फटेबल वाटत आहे. जंपसूटमध्ये देखील विविध प्रकार असून या जंपसूटमुळे तुम्ही एकदम हटके आणि कूल दिसता यात काहीच शंका नाही. 

कोणत्याही पार्टीत अथवा ऑफिसला तुम्ही जंपसूट घालू शकता. तसेच काही जंपसूटवर तुम्हाला स्टाईलिश जॅकेटसुद्धा मिळतात. यासोबतच महिला आणि पुरुषांमध्ये सध्या टँक टॉपची क्रेझ पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर हे दोघेही कार्गो पँटच्या प्रेमात पडल्याचे आपल्याला दिसून येते. कॅज्युअलमध्ये कार्गो पँट, लो राईज ट्राऊजर, युटिलिटी जीन्स यांना सध्या चांगलीच पसंती आहे.  सध्या फॅशन जगतात क्रॉप्ट जॅकेटची चलती आपल्याला पाहायला मिळत आहे. दुकानांपेक्षा सध्या जॅकेट्स खरेदीसाठी ग्राहकांकडून ॲमेझॉनला जास्त पसंती मिळाल्याचे चित्र आहे. 

४. स्कर्टमधील विविध प्रकार

स्कर्टमध्ये आपल्याला सध्या विविध प्रकार पाहायला मिळत आहेत. ऑफिसला जाणाऱ्या महिला ब्लेझरसोबतच टाईट स्कर्टला देखील पसंती देताना दिसत आहेत. तसेच मॉलमध्ये फिरायला जाताना, एखाद्या डिनर पार्टीला जाताना अथवा एखाद्या समुद्रकिनारी फेरफटका मारायला जात असताना तुम्ही व्रॅप स्कर्टचा विचार करू शकता. या स्कर्टवर एखादा डिझायनर टी-शर्ट घातला तर तुमचा लूक खूपच छान दिसतो. तसेच स्कर्टमध्ये मॅचिंग सेट हा देखील प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. यात स्कर्ट आणि स्कर्टवरील टी-शर्ट याचा रंग आणि डिझाईन अगदीच सारखे असते.

५. फॅशनेबल शूज आणि ज्वेलरी

शूज, बॅग्स, ज्वेलरी या अ‍ॅक्सेसरीज आपला लुक पूर्ण करण्यासाठी गरजेच्या आहेत. कोणत्या ड्रेसवर कधी, कुठली अ‍ॅक्सेसरीज घालायची याबद्दल कित्येकांच्या मनामध्ये शंका असतात. कपड्यांपासून बनवलेल्या अथवा सॉफ्ट फरपासून बनवलेल्या पर्स सगळ्याच कपड्यांसोबत खूपच छान दिसतात. तसेच तुम्ही गॉगल घ्यायचा विचार करत असाल तर स्लिम शेड्स, शिल्ड शेड्सचा विचार करा.

६. ऑफिससाठी शॉपिंग

ऑफिसमध्ये जायचे म्हणजे आपला पोशाख हा अतिशय चांगला असणे गरजेचे असते. गेली दोन वर्षं अनेकजण घरातून काम करत असल्याने आता अनेकांना शॉपिंगची गरज लागणार यात काही शंकाच नाही. ऑफिससाठी अतिशय साध्या पण उठून दिसणाऱ्या कपड्यांची निवड करा. तुम्ही ऑफिससाठी व्रॅप स्कर्ट, युटिलिटी जीन्स, व्हाईट लेग टाऊजर आणि त्यावर छानसा शर्ट अशा आऊटफिटचा विचार करू शकता. जीन्स आणि ट्राऊजर हे पर्याय पुरुष आणि महिला या दोघांसाठी योग्य आहेत. पुरुष आणि महिला दोघांनीही त्याच्यावर कट आऊट लोफर्स, टेलर्ड लोफर्स यांसारखे शूज घातल्यास ते कॉम्बिनेशन खूपच छान दिसेल. महिला त्यासोबतच किटन हिल्स, फ्लॅटफॉर्म शूज यांसारख्या पर्यायांचा विचार करू शकतात.

७. स्लीप ड्रेस आणि शीर लेअर ड्रेसचा ट्रेंड

विविध रंगाची आणि वेगवेगळ्या आकाराची फुलं असलेल्या कपड्यांना तसेच स्लीप ड्रेसना सध्या महिलांची चांगलीच पसंती मिळत आहे. तसेच शीर लेअर ड्रेसचा फॅशन जगतात चांगलाच बोलबाला आहे. यात आतील ड्रेस छोटा अथवा सिव्हलेस असतो आणि त्यावर त्याच रंगाचा ट्रान्सफरन्ट ड्रेस असतो. यापैकी काही ड्रेसमध्ये बाहेरील ट्रान्सफरन्ट ड्रेसवर लेसचे छानसे डिझाइन पाहायला मिळते. यामुळे अशाप्रकारचे ड्रेस खूपच सुंदर दिसतात. ड्रेसवर असलेल्या विविध प्रकारच्या एम्ब्रोडरीमुळे तसेच लेसच्या विविध डिझाइनमुळे या ड्रेसला खूपच मागणी आहे. यासोबत स्ट्रॅपी सँडल, बॅलेट शूज खूप छान दिसतात. तसेच चोकर किंवा मोत्याचा एखादा दागिना यासोबत घातल्यास तुमच्या सौंदर्याला चार चाँद लावू शकता. तसेच या सोबत तुम्ही टॉप हँडल बॅग कॅरी केल्यास ती खूपच छान दिसेल.

८. स्पोर्टस लूक

स्पोर्टस लूकसाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट परिधान करतात. या जॅकेटवर आपल्याला विविध प्रकारचे मोठाले डिझाईन पाहायला मिळतात. या जॅकेटला तरुणांमध्ये चांगलीच मागणी आहे. यासोबत स्पोर्टस लूकसाठी कार्गो पॉकेट असलेले पँट्स, डेनिम शर्ट आणि पँट, लेदर जॅकेट यांसारख्या अनेक पर्यायांचा तुम्ही विचार करू शकता.

९. नॉटिकल स्टाईल

नॉटिकल स्टाईलची सध्याच्या तरुण मुलांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. खलाशी तसेच समुद्रकिनारी राहाणारे लोक यांच्या कपड्यांशी मिळतीजुळती ही नॉटिकल स्टाईल आहे. यातील ब्रेटॉन स्ट्रीपचे शर्ट, टी शर्ट लोकांना प्रचंड आवडतात. शॉर्टस् अथवा ट्राऊजरसोबत ते खूपच छान वाटतात. त्यावर तुम्ही छानसे सँडल, डेक शूज, रबर बूट घालू शकता. एवढेच नव्हे तर अधिक फॅशनेबल दिसण्यासाठी त्यावर छानशी बेस बॉल कॅप ट्राय करा आणि त्यासोबत एक छोटीशी बॅग घ्या. 

१०. पुरुषांनी व्हेकेशनवर जायच्या आधी जरूर करा ही शॉपिंग

व्हेकेशनवर जायचा विचार करत असाल तर विविध रंगाच्या खूप छान प्रिंट असलेल्या कपड्यांचा तुम्ही नक्की विचार करू शकता. तसेच पोलो डॉट असलेले शर्ट आणि टी-शर्ट देखील तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक खुलवतील. यासोबत तुम्ही स्निकर, सँडल यांसारखी पादत्राणे घालू शकता. तसेच कूल लूकसाठी बकेट हॅट घालणे विसरू नका. ट्रॅक पँटमध्ये देखील सध्या विविध पर्याय तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विविध रंगाचे, डिझाईन्सच्या, मोठाले प्रिंट असलेल्या ट्रॅक पँटना चांगलीच पसंती मिळत आहे. त्यावर विविध प्राण्यांचे प्रिंट देखील आपल्याला दिसून येत आहे.

११. पारंपरिक लूक

एखाद्या लग्न कार्याला अथवा एखाद्या घरगुती समारंभाला जात असल्यास जरीचे कपडे, बांधणीचे कपडे, चिकनकरी, विविध प्रकारची एम्ब्रोडअरी असलेल्या कपड्यांना पुरुष आणि महिला या दोघांचीही पसंती मिळते. यातही गडद रंगांचे कपडे परिधन करण्यास सगळ्यांना आवडतात. तसेच एम्ब्रोडअरीमध्ये काहींना एकदम कमी एम्ब्रोडअरी आवडते तर काहींना प्रिंट केलेले कपडे अधिक आवडत असल्याचे दिसून येते. या कपड्यांची पसंती करण्याआधी तुम्हाला कोणते कपडे अधिक खुलून दिसतात याचा नक्कीच विचार करा.

ॲमेझॉनवर शॉपिंग करण्यासाठी क्लिक करा https://www.amazon.in/

Web Title: How To Look Fashionable Fashion Tips : Look more fashionable with the help of these fashion tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.