Lokmat Sakhi >Shopping > ३ बर्नरची शेगडी घ्यावी की ४? ग्लास टॉप घ्यावी की स्टिलच बरे? कशी निवडाल परफेक्ट गॅस शेगडी?

३ बर्नरची शेगडी घ्यावी की ४? ग्लास टॉप घ्यावी की स्टिलच बरे? कशी निवडाल परफेक्ट गॅस शेगडी?

Shopping Tips For Gas Stove: यंदा दिवाळीला गॅस शेगडी खरेदी करण्याचा विचार असेल, तर या काही गोष्टी आधी तपासून बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 04:22 PM2022-10-13T16:22:55+5:302022-10-13T16:23:17+5:30

Shopping Tips For Gas Stove: यंदा दिवाळीला गॅस शेगडी खरेदी करण्याचा विचार असेल, तर या काही गोष्टी आधी तपासून बघा...

How to select perfect gas stove or gas shegadi? 3 Tips for gas stove/ shegadi shopping | ३ बर्नरची शेगडी घ्यावी की ४? ग्लास टॉप घ्यावी की स्टिलच बरे? कशी निवडाल परफेक्ट गॅस शेगडी?

३ बर्नरची शेगडी घ्यावी की ४? ग्लास टॉप घ्यावी की स्टिलच बरे? कशी निवडाल परफेक्ट गॅस शेगडी?

Highlightsगॅस शेगडी घेताना ऑफरपेक्षा क्वालिटी तर बघाच पण खाली दिलेल्या काही गोष्टीही तपासून बघा. 

दिवाळीनिमित्त मार्केट सध्या चांगलंच सजलं असून प्रत्येक दुकानच वस्तूंच्या नवनविन व्हरायटींनी भरून गेलं आहे. सध्या बाजारात प्रत्येक वस्तूचेच अनेक नवनवे प्रकार आले असून त्यांच्यावर भरपूर सवलतही दिली जात आहे. लोकल मार्केटप्रमाणेच ऑनलाईन (Shopping Tips For Gas Stove) मार्केटवरही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स आहेत. पण या ऑफर्सपेक्षा आपली गरज आणि निवडलेल्या वस्तूंची गुणवत्ता तपासणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळेच गॅस शेगडी घेतानाही (gas stove/ shegadi shopping) ऑफरपेक्षा क्वालिटी तर बघाच पण खाली दिलेल्या काही गोष्टीही तपासून बघा. 

 

गॅस खरेदी करताना...
१. गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड नको

गॅस शेगडी ही अगदी रोजच्या वापरातली. गॅसजवळ काम करताना तो सुरक्षितच असायला पाहिजे. त्यामुळे गॅस शेगडीची निवड करताना गुणवत्तेच्या बाबतीत कधीही तडजोड करू नका. गॅसचे जे ब्रॅण्ड चांगले परिचित आहेत, त्यापैकीच एखाद्या शेगडीची निवड करा. त्यासाठी एकवेळ थोडे अधिक पैसे मोजावे लागले तरी चालेल, पण शेगडी सुरक्षित आणि उत्तम दर्जाचीच पाहिजे.

 

२. ग्लास टॉपची शेगडी घ्यावी का?
स्टीलची गॅस शेगडी आता थोडी जुनाट वाटते. त्याऐवजी काळा रंग असणारी ग्लास टॉपची शेगडी जास्त आकर्षक दिसते. या शेगड्या स्टीलप्रमाणे मजबूत नसतात, असं पुर्वी बोललं जायचं. पण तो एक गैरसमज आहे.

केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस चांगला असतोच, पण त्यासोबत वापरा हे २ पदार्थ आणि कमाल बघा

ग्लास टॉप असणाऱ्या शेगड्याही स्टीलप्रमाणेच मजबूत आणि टिकाऊ आहेत. या गॅसवरील घाण, सांडलेले खरकटे पदार्थ लगेच दिसून येत असल्याने स्टीलपेक्षा त्यांची स्वच्छता जरा अधिक ठेवावी लागते.

 

३. किती बर्नर असलेला गॅस घ्यावा?
२ बर्नरपेक्षा ३ बर्नर असलेला गॅस कधीही चांगला. आता तर ४ बर्नर असलेला गॅसही येतो. पण तो गॅस उभट असल्याने त्याला जास्त जागा लागते.

लसूण आणि लाल मिरच्यांची झणझणीत चटणी, तोंडाला येईल चव- जेवणाची वाढेल रंगत, बघा ही झटपट रेसिपी 

तुमचा ओटा एवढा आहे का? आणि खरंच ४ बर्नरची गरज आहे का? ते एकदा तपासून बघा. कारण हल्ली प्रत्येक घरात ३ किंवा ४ जणच असतात. आणि त्यासाठी एवढा मोठा ४ बर्नरचा गॅस घेण्याची आवश्यकता नसते. 
 

Web Title: How to select perfect gas stove or gas shegadi? 3 Tips for gas stove/ shegadi shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.