Lokmat Sakhi >Shopping > दिवाळीसाठी घ्या सुंदर स्टेन्सिल्स, फक्त १० मिनिटांत काढा मोठी रांगोळी, पाहा अप्रतिम देखण्या डिझाइन्स...

दिवाळीसाठी घ्या सुंदर स्टेन्सिल्स, फक्त १० मिनिटांत काढा मोठी रांगोळी, पाहा अप्रतिम देखण्या डिझाइन्स...

How to use Rangoli Stencils : Rangoli designs using stencil : How to make rangoli with stencil tool : रांगोळी काढायला वेळच नाही? स्टेन्सिल्स वापरुन झटपट रांगोळी काढण्याची सोपी आयडिया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2024 03:49 PM2024-10-19T15:49:43+5:302024-10-19T16:35:58+5:30

How to use Rangoli Stencils : Rangoli designs using stencil : How to make rangoli with stencil tool : रांगोळी काढायला वेळच नाही? स्टेन्सिल्स वापरुन झटपट रांगोळी काढण्याची सोपी आयडिया..

How to use Rangoli Stencils Rangoli designs using stencil How to make rangoli with stencil tool | दिवाळीसाठी घ्या सुंदर स्टेन्सिल्स, फक्त १० मिनिटांत काढा मोठी रांगोळी, पाहा अप्रतिम देखण्या डिझाइन्स...

दिवाळीसाठी घ्या सुंदर स्टेन्सिल्स, फक्त १० मिनिटांत काढा मोठी रांगोळी, पाहा अप्रतिम देखण्या डिझाइन्स...

दिवाळीत(Diwali2024) सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे रांगोळी. दिवाळी सण रांगोळी शिवाय अपूर्णच आहे. दिवाळीला खास दारासमोर मोठमोठ्या रांगोळ्या काढून सजावट केली जाते. दिवाळीत सुबक अशी रांगोळी काढणे ही आपली परंपराच आहे. रांगोळीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स, आकर्षक रंग अशा अनेक प्रकारे आपण रांगोळी काढतो(Rangoli designs using stencil).

रांगोळी काढण्यासाठी पुरेसा वेळ हवा असतो, पटकन घाई गडबडीत हवी तशी मनासारखी रांगोळी काढता येत नाही. पण आजकाल रांगोळ्या काढण्यासाठी प्रत्येकालाच वेळ मिळतो असं नाही. याचबरोबर मोठया रांगोळ्या काढणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. अशावेळी बाजारांत विकत मिळणारे रांगोळीचे रेडिमेड साचे आणि स्टेन्सिल्स (How to use Rangoli Stencils) उपयोगी येतात. या वेगवेगळ्या डिझाईन्सचे रेडिमेड साचे आणि स्टेन्सिल्स वापरुन आपण अगदी १० मिनिटांत सुंदर, सुबक रांगोळी काढू शकतो. सध्या बाजारांत रांगोळीच्या साच्यांसोबतच प्लॅस्टिकच्या स्टेन्सिल्स देखील अगदी खिशाला परवडतील अशा स्वस्त दरात विकत मिळतात. या नवीन प्रकारच्या स्टेन्सिल्सचा वापर करून रांगोळी कशी काढायची ते पाहूयात(How to make rangoli with stencil tool).  

बाजारांत विकत मिळणाऱ्या या रांगोळीच्या पांढऱ्याशुभ्र स्टेन्सिल्स प्लॅस्टिकच्या असतात. या स्टेन्सिलसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स कोरलेल्या असतात. यात आपल्याला रांगोळीचे वेगवेगळे आकार विकत मिळू शकतात. यात लहान - मोठ्या अशा वेगवेगळ्या आकाराच्या रांगोळीच्या डिझाईन्स मिळतात. या स्टेन्सिल्स आपल्याला बाजारांत तसेच ऑनलाईन देखील अगदी सहजपणे विकत मिळतील. याचबरोबर या स्टेन्सिल्सच्या तळाशी एक पुठ्ठा चिटकविलेला असतो हा पुठ्ठा काढून आपण रांगोळी काढू शकता. तसेच जर रांगोळी काढायला जागा कमी असेल किंवा रांगोळी पुसली जाऊ नये म्हणून हा पुठ्ठा न काढता त्यात रंग भरून देखील आपण रांगोळी काढू शकता, यामुळे रांगोळी आपण उचलून कुठेही नेऊ शकतो.  त्याचप्रमाणे ही रांगोळी काढण्यासाठी आपल्याला पांढऱ्या रांगोळीची गरज देखील लागणार नाही. या पांढऱ्याशुभ्र प्लॅस्टिकच्या स्टेन्सिल्सचा आपण ३ वेगवेगळ्या प्रकारे वापर करु शकतो. १५० ते ६०० रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये आपल्याला या रांगोळीच्या स्टेन्सिल्स विकत मिळतील. 

या स्टेन्सिल्स विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.   

1. https://amzn.to/4hfHnUL

2. https://amzn.to/4dVpt6y

पांढऱ्याशुभ्र प्लॅस्टिकच्या स्टेन्सिल्सचा वापर कसा करावा... 

१. या पांढऱ्याशुभ्र प्लॅस्टिकच्या स्टेन्सिल्स दिसायला इतक्या सुंदर, नाजूक व आकर्षक असतात की आपण त्यांचा रांगोळी काढण्यासोबतच घरातील इतर सजावटीसाठी देखील वापर करु शकतो. या स्टेन्सिल्स आपण दारापुढे, किंवा घराच्या कोपऱ्यांना सजवण्यासाठी किंवा नैवेद्याच्या ताटाभोवती ठेवून सजावट करू शकतो. 

केशर पदार्थात घालताना तुम्हीही हमखास करताय ‘ही’ चूक, महागडं केशर वापरुनही रंग-स्वाद गायब कारण...

२. यासोबतच या स्टेन्सिल्स प्लॅस्टिकमध्ये कोरलेल्या असल्याने या जमिनीवर ठेवून त्यात रांगोळीचे विविध रंग भरून आपण रांगोळी देखील काढू शकतो. जिथे आपल्याला रांगोळी काढायची आहे त्या भागात या स्टेन्सिल्स ठेवून आपल्या आवडीप्रमाणे रंग भरत जावे. यामुळे सुंदर अशी डिझाईन तयार होईल. यामुळे आपण आपल्या आवडीची रांगोळी अगदी चटकन काढू शकतो. यामुळे रांगोळी काढणे सोपे झाले आहे तसेच रांगोळी काढण्यासाठी आपल्याला तासंतास वाया घालवण्याची देखील गरज भासणार नाही. 

ब्लाऊज-पंजाबी ड्रेसच्या गळ्याला लावा लटकन, रंगबिरंगी-नाजूक लटकनचे पाहा मनमोहक डिझाइन्स! ड्रेस कमाल सुंदर...

३. या  प्लॅस्टिक स्टेन्सिल्स वापरून आपण रांगोळी तर काढूच शकतो शिवाय घराची सजावट देखील करु शकतो. एक छोटासा पारदर्शक धागा घेऊन त्याच्या एका टोकाला या स्टेन्सिलस बांधून आपण घराच्या कोपऱ्यात, खिडकीच्या बाजूला किंवा दाराच्या दोन्ही बाजूला लटकवून घराची शोभा अधिक वाढवू शकतो.

 

Web Title: How to use Rangoli Stencils Rangoli designs using stencil How to make rangoli with stencil tool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.