Join us  

How to wear perfect saree : साडी नेसली की फुगते? परफेक्ट लूकसाठी पेटीकोट ऐवजी 'हे' ट्राय करा.. साडी बसेल चापूनचोपून !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 1:56 PM

How to wear perfect saree , Saree wearing Ideas : या प्रकारच्या साडीसाठी चांगली आणि योग्य फिटिंग जीन्स घाला, जेणेकरून साडी सैल होणार नाही.

ज्या महिलांना साडी नेसण्याची आवड असते त्यांना वेगवेगळ्या व्हरायटी आणि स्टाइलमध्ये साडी नेसण्याचाही क्रेझ असतो.  नेहमी पेटिकोटवर साडी नेसण्यापेक्षा तुम्ही वेगळे पर्यायही ट्राय करू  शकता. जेणेकरून साडी चापून चोपून दिसेल आणि  फुगणार नाही.  आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला पेटीकोटवर साडी नेसण्याच्या अनेक पद्धती पाहिल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला जीन्सवर साडी नेसण्याचा सोपा मार्ग सांगणार आहोत. (Saree wearing Ideas) 

जीन्सवर साडी नेसून तुम्ही स्वत:ला थोडा वेगळा आणि स्टायलिश लुक देऊ शकता. जर तुम्ही साडी नीट नेसली असेल तर तुम्ही अशा लूकमध्ये पार्टीलाही जाऊ शकता. मात्र, जीन्सवर साडी नेसताना थोडी काळजी घ्यावी लागते. तुम्ही जीन्सच्या वर साडी नेसता, तेव्हा परफेक्ट लुक मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. (How to wear saree on denim)

- जीन्सवर साडी घालण्यासाठी तुम्हाला पेन्सिल फिट जीन्सची निवड करावी लागेल हे लक्षात ठेवा. या जीन्सवर साडीचे फिटिंग चांगले दिसते साडीचा रंग आणि पॅटर्न लक्षात घेऊन जीन्सचा रंग निवडावा. बेसिक पेन्सिल फिट जीन्सची निवड केल्यास  अधिक उत्तम दिसेल. 

- साध्या साडीच्या ड्रेपिंगमध्ये पेटीकोटमध्ये साडी अडकवता त्याचप्रमाणे तुम्हाला एका बाजूनं साडी अडकवायची आहे. तुमची जीन्स एका बाजूने फ्लॉन्ट केलेली असावी. आता तुम्हाला साडीचा पदर खांद्यावर ठेवा. हे देखील लक्षात ठेवा की फक्त शिफॉन, जॉर्जेट आणि नेट फॅब्रिक असलेल्या साड्या जीन्सवर अधिक चांगल्या प्रकारे ड्रेप केल्या जाऊ शकतात, म्हणून त्यांची निवड करा. आता पातळ प्लेट बनवा. तुम्ही पुढच्या बाजूला प्लेट्स बनवू शकता आणि त्यांना मागील बाजूस टक करू शकता. पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला प्लेट्स बनवू नका, जीन्सवर साडी नेसत असाल, तर मागच्या बाजूला प्लेट्स बनवा.

- प्लेट्स बनवल्यानंतर पदर सेट करा. तुम्ही पदराला अनेक प्रकारे ड्रेप करू शकता.  यासाठी, आपण प्रथम खांद्यावर प्लेट बनवा आणि खांद्यावर पिन अप करा. तुम्ही जीन्सवर साडी नेसत असाल, तर तुम्ही ती क्रॉप टॉप, ब्रालेट ब्लाउज, टी-शर्ट यावरही वेअर करू शकता.

- स्वतःला स्टायलिश लूक द्यायचा असेल तर साडीच्या वरच्या बाजूला बेल्ट ट्राय करू शकता. जर बेल्टचा ट्रेंडी आणि फॅशनेबल लुक असेल तर तुम्हाला परफेक्ट जीन्स साडीचा लुक मिळेल. अशा प्रकारच्या साडीवर तुम्ही स्निकर्ससुद्धा ट्राय करू शकता. जीन्स, साडी लुकवर जास्त दागिने कॅरी करू नका. या प्रकारच्या साडीसाठी चांगली आणि योग्य फिटिंग जीन्स घाला, जेणेकरून साडी सैल होणार नाही.

टॅग्स :खरेदीस्टायलिंग टिप्स