Lokmat Sakhi >Shopping > १ कापडी पिशवी आपले जगणे सोपे करते, पाहा काय करायचे..

१ कापडी पिशवी आपले जगणे सोपे करते, पाहा काय करायचे..

International Plastic Bag Free Day 2023 : एक माणूस अन्न आणि श्वासाद्वारे आयुष्यात सरासरी 20 किलो मायक्रोप्लास्टिक घेतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2023 06:49 PM2023-07-03T18:49:51+5:302023-07-03T18:51:17+5:30

International Plastic Bag Free Day 2023 : एक माणूस अन्न आणि श्वासाद्वारे आयुष्यात सरासरी 20 किलो मायक्रोप्लास्टिक घेतो.

International Plastic Bag Free Day 2023 : 1 cloth bag makes your life easier, see what to do.. | १ कापडी पिशवी आपले जगणे सोपे करते, पाहा काय करायचे..

१ कापडी पिशवी आपले जगणे सोपे करते, पाहा काय करायचे..

राजेंद्रकुमार वि सराफ 

आपण अतिशय नियमितपणे प्लास्टिकच्या पिशव्या वापरतो. एकदाच  वापरल्या जाणार्‍या या प्लास्टिकच्या पिशव्यांचे विघटन होण्यास शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे परिसंस्थेचे दीर्घकालीन नुकसान होते. दरवर्षी माणसांनी फेकलेले सुमारे 8 दशलक्ष टन प्लास्टिक समुद्रात प्रवेश करते. असेच चालू राहिल्यास 2050 पर्यंत महासागरात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक असेल. 90 टक्के समुद्री पक्ष्यांच्या पोटात  प्लास्टिकचा कचरा आढळतो. एक माणूस अन्न आणि श्वासाद्वारे आयुष्यात सरासरी 20 किलो मायक्रोप्लास्टिक घेतो. खरे तर दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिकने आपल्या दैनंदिन जीवनात क्रांती घडवून आणली आहे. कामांमध्ये अधिक व्यावहारिकता, सुविधा आणि सुरक्षितता आणली आहे (International Plastic Bag Free Day 2023). 

मात्र त्याबरोबरच कागद, कापूस, लोकर, लाकूड, धातू यांसारख्या पारंपरिक साहित्याची जागा प्लास्टिकने घेतली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या जंगलतोड कमी झाली आहे. सर्वात महत्वाचे, प्लास्टिकचे  उत्पादन जास्तीत जास्त पर्यावरण पूरक करण्याचे सातत्याने प्रयत्न होत आहेत. जगातील केवळ 4% तेल उत्पादन प्लास्टिकसाठी वापरले जाते. प्लास्टिकचे प्रदूषण मानवाच्या निष्काळजीपणामुळे होत आहे. आपण जर ते योग्यरित्या वापरले  व हाताळले तर प्लास्टिकचे प्रदूषण सहजपणे टाळता येईल. मात्र त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने, कुटुंबाने, समाजाने सर्व स्तरावर योग्य पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

"मी आजपासून प्लास्टिक पिशवी वापरणार नाही" असा निर्धार प्रत्येकाने करावा. जमत नसेल तर सुरवातील सप्ताहात एक दिवस तरी न वापरण्याचा संकल्प करावा. सामान आणण्यासाठी कागदी  व कापडी पिशवीचा वापर करावा.  आवश्यक असल्यास जाड प्लास्टिक पिशवीचा वापर व अनेक वेळा फेरवापर करावा. छोटे पाकीट वापरण्याऐवजी मोठे पाकीट वापरावे. प्लास्टिक पिशवीत पॅक केलेला किराणामाल (साखर, डाळी, धान्य इत्यादी) घेण्याऐवजी पोत्यातून मोजून आपल्याजवळील कापडी पिशवीत घ्यावे. पिशवी अशी कापावी की कापलेला तुकडा पिशवीपासून अलग होणार नाही. 

(Image : Google)
(Image : Google)

प्रत्येक प्लास्टिक वस्तूवर फेरवापरच्या चिन्हाच्या आत 1 ते 7  आकडे लिहिले असतात. ते आकडे प्लास्टिकचा फेरवापर दर्शवतात. 3, 6 व 7 क्रमांक असलेल्या प्लास्टिकचा फेरवापरा टाळावा. हॉटेल मधून अन्न मागवताना आपल्या घरात असणाऱ्या स्टीलच्या डब्यांचा पर्याय वापरावा. हॉटेल मध्ये जेवायला जाताना सोबत डबे घेऊन जावे त्यामुळे उरलेले अन्न त्यात आणता येईल. हे हास्यास्पद वाटत असले तरी करावे. समजा प्लास्टिकच्या पिशवीत आणले असेल तर ती पिशवी धुवून ठेवावी. प्लास्टिक पासून काही वस्तू तयार करता येतात. उदाहरणार्थ प्लास्टिक पिशवी पासून बसकर वा पायपुसणी इत्यादी. प्लास्टिक पिशव्या जमा करून त्या भंगारवाल्याला द्याव्यात, असे सोपे सहज करता येण्याजोगे पर्याय शोधले तर प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. 

(लेखक पर्यावरण अभियंता असून मराठी विज्ञान परीषण पुणे विभागाचे अध्यक्ष आहेत. )

Web Title: International Plastic Bag Free Day 2023 : 1 cloth bag makes your life easier, see what to do..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.