'मीठ' हा अन्नपदार्थातील सगळ्यांत महत्वाचा पदार्थ आहे. 'मीठ' हा असा पदार्थ आहे की जो एखाद्या पदार्थ जास्त किंवा कमी घातला गेला तरीही पदार्थांची चव (Japanese Company Kirin Holdings Showcased Electric Salt Spoon At CES2025) बिघडते. कोणत्याही अन्नपदार्थात मीठ जास्त झाले तर तो पदार्थ खाता येत नाही, तसेच मीठ कमी झाले तर पदार्थ अळणी लागतो. यासाठीच पदार्थात मीठ घालताना ते स्वादानुसार घालावं असं म्हटलं जात. मीठ एखाद्या पदार्थाची चव बिघडवू शकत तसेच दुप्पट चांगली देखील करु शकते(electric spoon makes food saltier without extra sodium).
कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो अर्थात CES 2025 च्या पहिल्याच दिवशी बीअर आणि इतर शीतपेय बनवणाऱ्या जापनीज कंपनी किरीन होल्डिंगनं आपला नवीन ‘इलेक्ट्रिक चमचा’ सादर केला आहे. हा चमचा खाद्यपदार्थ खारट आहेत असं जिभेला भासवतो. कंपनीच्या मते हा चमचा सौम्य इलेक्ट्रिक करंटचा वापर करतो, ज्यामुळे अन्नातील सोडियम (Japan’s Kirin demoes ‘electric salt spoon’ that can control salt intake) अयानच्या अणूंची तीव्रता वाढते त्यामुळे कमी सोडियम असलेले पदार्थ देखील खारट लागतात. त्यामुळे आपण चक्क मिठाचा वापर न करता देखील अन्नपदार्थ तयार करु शकता किंवा आता कोणत्याही पदार्थात मीठ घालायला विसरलात तरीही हरकत नाही. कारण या 'इलेक्ट्रिक चमच्याच्या' मदतीने तुम्ही चक्क मिठाचा परफेक्ट , योग्य मापशीर स्वाद पदार्थात उतरवू शकता. नेमकं या चमच्याची काय भानगड आहे? आणि त्याचा वापर कसा करायचा ते पाहूयात.
लास वेगास इथे सुरु असलेले कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो मध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी हा इलेक्ट्रिक सॉल्ट स्पून वापरून पहिला. त्यांच्या मते हा चमचा आकाराने थोडा मोठा आहे. तसेच यामुळे पदार्थांची चव थोडी वाढते खरी परंतु हा वापरण्याची एक विशिष्ट पद्धत देखील आहे. हा चमचा जिभेला विजेचे सौम्य झटके देतो जे जाणवत देखील नाहीत परंतु त्यामुळे जिभेला पदार्थ अधिक खारट असल्याचा भास होतो.
चपाती लाटताना पीठ ओट्यावर फार सांडते? ही 'फ्लावर डस्टर' आयडिया पाहा, ओट्यावर पसारा होतच नाही...
या चमच्याची निर्मिती संशोधनाच्या आधारावर करण्यात आलेली आहे, त्यामुळे कंपनीच्या दाव्यात तथ्य असण्याची शक्यता आहे. किरीन होल्डिंगनं संशोधनाचा वापर करून या चमच्याचा पहिला व्यावसायिक डिवाइस लाँच केला. या टेक्नॉलॉजीवर २०११ मध्ये संशोधन करण्यात आलं आहे आणि तेव्हापासून करंट पास करणारे चमचे, काटे चमचे आणि चॉपस्टिक देखील बनवण्यात आल्या आहेत.
जापनीज कंपनी किरीनच्या मते या इलेक्ट्रिक चमच्याच्या वापराने लोकांच्या आहारातील मीठ कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खासकरून जपानमध्ये या डिवाइसचा चांगला वापर केला जाऊ शकतो, जिथे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने सांगितलेल्या मिठाच्या प्रमाणापेक्षा दुप्पट प्रमाणात मीठ खाल्ले जाते. तसेच यामुळे जास्तीचे मीठ खाल्ल्याने होणारे आजार देखील टाळता येतील.
चेहऱ्याला बेसन लावताना दुधात कालवावे की दह्यात? बघा नक्की काय लावल्याने चमकतो चेहरा...
या ‘इलेक्ट्रिक सॉल्ट स्पून’ चे काही मर्यादित युनिट गेल्यावर्षी जपानमध्ये विकले गेले ज्यांची किंमत १२७ डॉलर्स म्हणजे सुमारे अकरा हजार रुपये इतकी होती. येणाऱ्या पुढील काही कालावधीत हा डिवाइस कंपनीला जगभरात विक्रीसाठी उपलब्ध करायचा आहे. कंपनीच्या मते हा डिवाइस अतिरिक्त सोडियम न टाकता पदार्थांचा खारटपणा वाढवतो.