Join us  

काठापदराच्या भरजरी साड्या ऑनलाईन स्वस्तात मस्त; पाहा पर्याय, खरेदी करताना विसरू नका ४ नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 1:30 PM

Online saree shopping: एक साडी खरेदी करण्यासाठी ४- ५ दुकानं फिरत बसायला अजिबात वेळ नाही ना, म्हणूनच तर प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा सरळ हे काही ऑनलाईन पर्याय ट्राय करा.. फक्त ऑनलाईन साड्या खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्या..

ठळक मुद्देलग्नकार्यात शोभेल अशी भरजरी साडी स्वस्तात खरेदी करायची असेल, तर त्यासाठी ऑनलाईन खरेदीचा पर्याय वापरायला काहीच हरकत नाही.

लग्न घरचं, जवळचं असो किंवा मग दुरच्या नातलगाचं... तयारी तर करावीच लागते. बरं अशा लग्नसराईत नेमकं होतं काय की उपस्थित राहणारे पाहूणेही थोड्या- फार फरकाने तेच असतात. त्यामुळे मग प्रत्येक वेळी वेगळं काही तरी ड्रेसिंग करावं लागतं, वेगळी साडी नेसावी लागते, जी शक्यतो कुणी पाहिलेली नसते. लग्न समारंभात त्याच त्याच पाहुण्यांसमोर तीच ती साडी नेसणं म्हणजे भलतंच बोअरिंग काम. आता साडी तर खरेदी करायची असते पण त्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची कधी कधी आपली अजिबातच तयारी नसते. म्हणूनच जर लग्नकार्यात शोभेल अशी भरजरी साडी स्वस्तात खरेदी करायची असेल, तर त्यासाठी ऑनलाईन खरेदीचा (online shopping) पर्याय वापरायला काहीच हरकत नाही. 

 

कांजीवरम साड्यांचे भरपूर प्रकार..Variety in Kanjivaram sareeकांजीवरम साडी म्हणजेच महागच असणार... असा या साडीबद्दलचा गैरसमज अजूनही टिकून आहे. ४ ते ५ हजारांच्या खाली काही कांजीवरम मिळणार नाही, असंच आपल्याला वाटतं. पण असं नाहीये... कांजीवरम साड्यांची सुरूवात अगदी दिड ते दोन हजारांपासून होते. अर्थात महागड्या साड्याआणि या साड्या यांच्या टेक्स्चर, डिझाईन, फॅब्रिकमध्ये फरक असतोच, पण तरीही या स्वस्तातल्या कांजीवरम साड्या जर नीट परखून घेतल्या तर त्या ही नक्कीच चांगला लूक देऊ शकतात. मिंत्रा या ऑनलाईन शॉपिंग साईटवर कांजीवरम साड्यांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. अगदी १ हजार रूपयांपासून साड्यांच्या किमती सुरू होतात. खालील साईट चेक करा...

 

गोल्डन रंगाची ही साडी अतिशय ट्रेण्डी लूक देणारी आहे. तेच ते रंग रिपिट करायचा कंटाळा आला असेल तर ही एव्हरग्रीन गोल्डन रंगाची साडी घेऊन बघा... अवघ्या ९४५ रूपये किमतीत डिझायनर लूक असणारी साडी मिळत असेल, तर आणि काय हवे....https://www.myntra.com/sarees/vastranand/vastranand-brown--gold-toned-silk-blend-woven-design-kanjeevaram-saree/11571492/buy

अशा साड्याही देतात वेगळा लूकलग्नसराईमध्ये पारंपरिक काठपदर साड्या किंवा डिझायनर पॅटर्न साड्या जास्त प्रमाणात नेसल्या जातात. आता लग्न जर जवळच्या नातलगाचे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची कांजीवरम साडीही नेसू शकता. ही पिवळ्या रंगाचा बेस असणारी ही साडी थोडी फार प्रिंटेड लूक असणारी आहे.

 

सोनेरी काठ आणि लालसर पिवळा पदर, अशी ही साडी नक्कीच तुम्हाला वेगळा लूक देऊ शकते. त्यामुळे कांजीवरम साडीतच काही वेगळं बघायचं असेल, तर ही खालील वेबसाईटला क्लिक करून ही साडी नक्की बघा..

https://www.myntra.com/sarees/mitera/mitera-yellow-silk-blend-woven-design-kanjeevaram-saree/11458584/buy

कांजीवरम प्युअर बनारसी सिल्क या प्रकारातली साडी बघायची असेल तर ॲमेझॉन या शॉपिंग साईटची ही लिंक चेक करा. बैंगनी रंगाची ही साडी अतिशय भरजरी असून नेसल्यावर नक्कीच रिच लूक देणारी असेल.

 

सध्या केवळ ८४५ रूपयांना ही साडी मिळत असून ही साडी तुम्ही दुरच्या, जवळच्या अशा कोणत्याही लग्नात नेसू शकता. ही साडी बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

https://www.amazon.in/Pujia-Mills-womens-kanjivaram-banarasi/dp/B09L731CFS/ref=sr_1_5?keywords=silk%2Bsaree&qid=1639467099&s=apparel&sr=1-5&th=1

ऑनलाईन साड्या खरेदी करताना फसवणूक होऊ नये म्हणून हे नियम पाळा..4 rules for online saree shopping१. चार आणि त्यापेक्षा अधिक स्टार असणाऱ्याच साड्या घ्या.२. रिव्ह्यूज न वाचता कधीच साडी घेऊ नका.. एका साडीसाठी तुम्ही तिचे कमीतकमी १५ ते २० रिव्ह्यूज तरी वाचलेच पाहिजेत.३. ज्या ग्राहकांनी या आधी साडी खरेदी केलेली आहे, त्यांनी त्यांच्या साडीचे फोटो साईटवर अपलोड केलेले असतात. ते फोटो नीट काळजीपुर्वक बघा. त्यामुळेच साडीचा खरा रंग कसा आहे याचा अंदाज येतो आणि साडी खरेदी करणे सोपे जाते.४. ज्या साड्यांना रिटर्न पॉलिसी आहे, अशाच साड्या घ्या. 

हाय रे तेरा घागरा! ए लाइन घागरा, सुंदर एम्ब्रॉयडरी आणि 45 दिवस.. नवरी नटली अंकिता लोखंडे

 

टॅग्स :खरेदीऑनलाइनफॅशनकांचेपुरम