आधी कतरिनाच्या लग्नाच्या तयारीची चर्चा, मग तिच्या लग्नाची चर्चा आणि आता सध्या तिच्या लग्नातल्या लेहेंग्याची, लूक आणि मेकअपची तसेच दागिन्यांची जबरदस्त चर्चा सुरू आहे. आता लग्न म्हणजे नववधूची साडी, लेहेंगा पाहण्यात महिलांना जेवढा इंटरेस्ट असतो, तेवढाच इंटरेस्ट नववधूच्या गळ्यातले मंगळसूत्र (Trends in mangalsutra design) पाहण्यातही असतो. म्हणूनच कतरिनाचं मंगळसूत्र (Katrina Kaif's mangalsutra) आणि त्याची किंमत हा सगळ्यांसाठीच उत्सूकतेचा विषय आहे. कतरिनाप्रमाणेच दिपिका पदुकोन, सोनम कपूर, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींची मंगळसूत्रेही चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती. तुम्हीही जर मंगळसुत्राचे डिझाईन बदलण्याचा किंवा नविन मंगळसूत्र घेण्याचा विचार करत असाल तर हे काही मंगळसूत्रांचे लेटेस्ट ट्रेण्ड (latest designs of mangalsutra) नक्कीच बघा...
सोनम कपूरचं क्लासी मंगळसूत्रmangalsutra of Sonam Kapoorसोनम कपूर तर बॉलीवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. कारण एवढा परफेक्ट तिचा फॅशन, ड्रेसिंग आणि स्टाईल सेन्स आहे. त्यामुळे अर्थातच तिच्या गळ्यातले मंगळसूत्रही निश्चितच खास असणार हे नक्की. ज्वेलरी डिझायनर उषिता रौतानी यांनी सोनमच्या मंगळसूत्राचं डिझाईन बनवलं होतं. साेनमचं मंगळसूत्र शॉर्टच असलं तरी खूपच देखणं होतं. तिने तिच्या आणि तिच्या नवराच्या राशींचे चिन्हं हिऱ्यांमध्ये बनविले होते आणि ते मंगळसूत्रात दोन्ही बाजूंनी टाकले हाेते. मंगळसूत्राच्या मधोमध सोलिटेअर हिरा होता. सोनमचं हे मंगळसूत्र चांगलंच व्हायरल झालं होतं. मंगळसूत्रातला हा असा काहीसा वेगळा प्रयोग तुम्हीही निश्चितच करून बघू शकता.
सरस्वती मंगळसूत्रSaraswati mangalsutraमध्यंतरी ‘सरस्वती’ या मराठी मालिकेवरून सरस्वती मंगळसूत्राची फॅशन चांगलीच हिट झाली होती. या मंगळसूत्रात पदक किंवा वाट्या असतात त्या ठिकाणी सरस्वतीचं चिन्ह होतं. अनेक मराठी घरातल्या महिलांना ते मंगळसूत्र चांगलंच आवडलं होतं आणि अनेक जणींनी ते घडवूनही घेतलं होतं. ते एवढं लोकप्रिय होतं की सरस्वती मंगळसूत्र म्हणूनच ओळखलं जायचं. असं पारंपरिक पद्धतीचं पण मॉडर्न डिझाईनचं मंगळसूत्रही तुम्ही घेऊ शकता.
अनुपमाचं मंगळसूत्रAnupama mangalsutraअनुपमा ही मालिका सध्या चांगलीच गाजते आहे. या मालिकेत सध्या अनुपमा घटस्फोट झाल्यामुळे मंगळसूत्र घालत नसली तरी ती जे मंगळसूत्र घालायची ते अनेक जणींना चांगलंच आवडलं होतं. अतिशय साधं आणि सुटसुटीत डिझाईन असलेलं हे मंगळसूत्र नाजूक होतं. ऑफिस, डेली युज अशासाठी ते अनेक जणींना परफेक्ट वाटलं होतं. मध्ये हिऱ्याचं पेंडंट आणि दोन्ही बाजूंना सोन्यात मढवलेले काळे मणी असं ते डिझाईन चांगलंच हिट झालं होतं.
एका बाजूला सोन्याची चेन आणि दुसऱ्या बाजूला काळी सर अशा मंगळसूत्राचीही सध्या चांगलीच क्रेझ आहे.. हिऱ्यांत मढवलेले एकात एक गुुंफलेले गोल किंवा डायमंड शेप असं त्याचं पेंडंट असतं आणि ते देखील खूपच आकर्षक दिसतं.