Lokmat Sakhi >Shopping > खणाचं ब्लाऊजपीस घरात पडून आहे का? मग असा बनवा खणाचा मस्त आकर्षक आकाश कंदील

खणाचं ब्लाऊजपीस घरात पडून आहे का? मग असा बनवा खणाचा मस्त आकर्षक आकाश कंदील

दिवाळीत ट्रॅडिशनल पद्धतीने घर सजवायचं असेल, तर असा एक खणाचा छान आकाश कंदील बनवा आणि घराबाहेर लावा. बघा घराचं रूप कसं पालटून जाईल ते.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 01:40 PM2021-10-28T13:40:20+5:302021-10-28T13:41:32+5:30

दिवाळीत ट्रॅडिशनल पद्धतीने घर सजवायचं असेल, तर असा एक खणाचा छान आकाश कंदील बनवा आणि घराबाहेर लावा. बघा घराचं रूप कसं पालटून जाईल ते.....

Is Khan blousepiece blouse lying around the house? Then make a very attractive sky lantern from it | खणाचं ब्लाऊजपीस घरात पडून आहे का? मग असा बनवा खणाचा मस्त आकर्षक आकाश कंदील

खणाचं ब्लाऊजपीस घरात पडून आहे का? मग असा बनवा खणाचा मस्त आकर्षक आकाश कंदील

Highlightsअगदी स्वस्तातल्या आणि टाकाऊ वस्तूंपासून आपण खणाचा आकाशदिवा बनवू शकतो.

खणाच्या साडीची जबरदस्त क्रेझ मागच्या दिवाळीत होती. त्यामुळे मागच्यावर्षी दिवाळीला अनेक जणींनी खणाच्या साड्याच घेतल्या होत्या. खण कापडाचं हे प्रेम इथपर्यंतच मर्यादित नव्हतं. त्यामुळेच तर खण कापडाचं तोरण, खण कापडाचे आकाशदिवे असं सगळं मागच्या दिवाळीत होऊन गेलं. खणाचे आकाशदिवे पाहून आपणही यंदा असाच आकाशदिवा घ्यायला पाहिजे होता, असं मनोमन अनेक जणांना वाटलं हाेतं. त्यामुळेच तर मागच्यावर्षी ज्यांचं राहून गेलं, असे बहुतांश लोक यावर्षी खणाचा आकाशदिवा लावणार आहेत. तुम्हीही तसाच विचार करत असाल, तर खण आकाशदिवा घरच्याघरी कसा तयार करायचा ते जाणून घ्या. 

 

खणाचा आकाश कंदील बाजारात विकत घ्यायला गेलं तर कमीतकमी ३०० ते ३५० रूपयांना मिळतो. पण खरं पाहता खणाच्या आकाश कंदीलासाठी एवढे पैसे देण्याची काहीच गरज नाही. कारण अगदी स्वस्तातल्या आणि टाकाऊ वस्तूंपासून आपण खणाचा आकाशदिवा बनवू शकतो. तसंच हा आकाश कंदील बनवायचा म्हणजे अगदी चार ते पाच तास बसून काम करावं लागेल, असंही मुळीच नाही. सगळं साहित्य तयार असेल तर अवघ्या अर्ध्यातासात तुमचा खणाचा आकाशदिवा तयार होतो. 

 

चला तर मग बघूया खणाचा आकाश कंदील बनविण्याची सोपी पद्धत. नुकतंच नवरात्र होऊन गेलं. नवरात्रीला सवाष्णीची ओटी भरायची आणि तिला ब्लाऊजपीस द्यायचं, ही आपल्याकडची प्रथा. त्यामुळे नवरात्रीला आपण कुणाच्या तरी घरी गेलेलो असतो आणि तिथून एखादा खणाचा ब्लाऊजपीस आपल्याकडे आलेला असतो. आता हा ब्लाऊजपीस नेमका कोणत्या साडीवर शिवावा, हा गहन प्रश्न आपल्यासमोर असल्याने आपण तो ब्लाऊजपीस कपाटात तसाच ठेवून दिलेला असतो. तो ब्लाऊजपीस जरा बाहेर काढा. कारण या सध्या उपयोगात नसलेल्या खण ब्लाऊजपीसचा उपयोग करूनच आपल्याला आकाशदिवा बनवायचा आहे. घरात जर खण ब्लाऊजपीस नसेल तर ८० ते १०० सेमी कपडा विकत आणला तरी त्यापासून आकाशदिवा तयार करता येतो.

 

आकाशदिवा तयार करण्यासाठी आपल्याला एक रिकामे खोके लागणार आहे. हे खोके फार मोठे नको आणि फार लहानही नको. असं एक मध्यम आकाराचं खोकं घ्या. आपल्याकडे असलेलं ब्लाऊजपीस त्याला चारही बाजूंनी गुंडाळून बघा. जर कपडा व्यवस्थित पुरतो आहे, असं वाटलं तर आकाश कंदील बनविण्याच्या पुढच्या स्टेपकडे वळा. जे खोके आपण आकाशदिवा बनविण्यासाठी निवडलं आहे, त्याच्या चारही बाजूंच्या कोपऱ्यावर दोन ते अडीच सेमी एवढी जागा सोडा आणि सरळ रेष मारून घ्या. अशा प्रकारचं मार्किंग चारही बाजूंवर आणि खोक्याच्या खालच्या आणि वरच्या बाजूवर करून घ्यावं. वरची बाजू पुर्णपणे उघडी असेल तरी चालते. आता चारही बाजूंचं मार्किंग झाल्यावर चारही दिशेने एक चौकोन तयार झालेला दिसेल. हा चौकोन व्यवस्थित कापून घ्या.

 

सगळ्या बाजूचे चौकोन व्यवस्थित कापल्यानंतर चार बाजू असलेला आकाशकंदीलाचा साचा आपल्यासमोर तयार झालेला असेल. आता या चारही बाजूला खणाचा कपडा व्यवस्थित गुंडाळा. कपडा गुंडळाताना तो सैलसर पडणार नाही, याची काळजी घ्या. व्यवस्थित ताणून कापड गुंडाळा जेणेकरून आकाशदिवा ताठ, कडक दिसेल. चारही बाजूंना खोक्याचे जे कॉर्नर आपण ठेवले आहेत, त्याला आणि कपड्याला स्टॅपलर मारा किंवा फेव्हिकॉलने चिटकवून घ्या. कापड चिटकविताना एवढी काळजी घ्यावी की खणाचे काठ खालच्या बाजूनेच येतील. आता आकाश कंदिलाचा बेस तर आपल्यासमोर तयार झाला. आता या आकाशदिव्याला सजविण्यासाठी तुम्ही तुम्हाला सुचेल तशी सजावट करू शकता. आकाश कंदीलाच्या खालच्या भागाला लोकरीचे गोंडे करून लावू शकता. कुंदन, मोती वेगवेगळ्या रंगाचे स्टोन असे साहित्य वापरूनही तुम्ही हा आकाश दिवा सजवू शकता. 

 

आकाश दिवा सजवून झाल्यानंतर एखादी मजबूत लेस घ्या. तिचे चार समान तुकडे करा आणि ते आकाशदिव्याच्या वरच्या बाजूने आतून चिटकवून टाका. या चारही तुकड्यांचे शेवटचे टोक एकत्र करा आणि गाठ मारून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही लेसचा वापर करून आकाश कंदिल टांगू शकता. या आकाश कंदीलमध्ये जेव्हा तुम्ही एखादा लाईट लावाल, तेव्हा त्याची शोभा आणखीनच वाढेल. 

 

Web Title: Is Khan blousepiece blouse lying around the house? Then make a very attractive sky lantern from it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.