दिवाळीची बहुतांश तयारी खरेदीशी संबंधित असते. शॉपिंग कोणाला नाही आवडत. फॅशनेबल कपडे, घरातील सजावटीसाठी लागणारं साहित्य, यासह इतर वस्तू ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने आपण खरेदी करतो. इतर सणाच्या तुलनेत आपली अधिक धावपळ दिवाळी या सणानिमित्त होते.
दिवाळीत बाजारपेठ विविध वस्तूंनी फुलून जातात. या दिवसात ऑनलाइन किंवा ऑफलाइनमध्ये डिस्काउंट चालू असतात. मात्र, अनेकदा वस्तू खरेदी करताना फसवणूक होते, किंवा खराब वस्तूंची खरेदी टाळण्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. शॉपिंग करताना पैसे आणि वेळेची बचत कशी करावी? शॉपिंग करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? पाहा(Know How To Save Money While Shopping For Diwali!).
दिवाळीत खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी
- दिवाळीची खरेदी करताना जीवनावश्यक वस्तूंची यादी आणि बजेट तयार करा. यामुळे पैश्यांची बचत तर होईलच, शिवाय कोणतीही वस्तू खरेदी करण्याची राहून जाणार नाही.
- जवळपास प्रत्येक शहरात घराला सजवण्यासाठी लागणारं साहित्य, कपडे, फुटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स अशा प्रकारचे साहित्य मिळणारे मार्केट असतात. जर आपल्याला दिवाळीची शॉपिंग बजेटमध्ये करायची असेल तर, फेमस मार्केटमधूनच खरेदी करा.
- घराच्या सजावटीशी निगडीत वस्तू खरेदी करण्यापूर्वी, संपूर्ण घराकडे एकदा नजर टाका. यामुळे ऐन दिवाळीत अनावश्यक वस्तूंची खरेदी होणार नाही. अशा वेळी पैश्यांची बचतही होईल.
- फुटवेअर आणि कपडे खरेदी करण्यापूर्वी ट्राय करा. कारण प्रत्येक ब्रँडचा आकार वेगळा असतो. त्यामुळे खरेदी करताना नीट तपासून खरेदी करा.
- सणांच्या काळात बहुतांश ठिकाणी ऑफर्स चालू असतात. पण याच्या मोहात पडून आपण अनेक अनावश्यक वस्तू खरेदी करून घरी आणतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट खरेदी करण्यापूर्वी, याची खरंच गरज आहे का? याचा विचार करा. मगच ती वस्तू खरेदी करा.
- कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी ऑफलाइन आणि ऑनलाइन किंमतींची तुलना करा. नंतरच आवश्यक असणाऱ्या गोष्टी खरेदी करा.
- टीव्ही, फ्रिज, एसी अशी कोणतीही मोठी वस्तू खरेदी करण्यापूर्वी, एकदा रिव्ह्यू वाचा. या मोठ्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी मित्राची किंवा सहकाऱ्याची मदत घ्या.
दिवाळीची साफसफाई करताना लसूण वापरून पालींना लावा पळवून, घ्या एक सोपी ट्रिक-पाली होतील छुमंतर
- घरी आल्यानंतर वस्तूंमध्ये दोष आढळल्यास, त्वरित रिटर्न करा. कारण विलंबामुळे काही वस्तू लवकर रिटर्न होत नाही.
- ऑनलाइन पेमेंट करताना काळजी घ्या. जर कोणी तुम्हाला फोनवर पेमेंट संबंधित माहिती विचारत असेल तर, ती देऊ नका. कारण ई-कॉमर्स कंपन्या फोनवर पेमेंट संबंधित माहिती कधीच विचारत नाहीत.