साडी नेसायची म्हणजे कटकट असे अनेकींना वाटते. कधी साडीचा पदर सांभाळायचा त्रास वाटतो तर कधी साडीचे वजन, मग ही साडी कॅरी करायची धास्ती असल्याने कधी एकदा साडी सोडतो असे होऊन जाते. पण आज आपण पाहणार आहोत साडीचा असा एक प्रकार जो नेसायला अगदी सोपा आहे, तसेच ही साडी वजनाला हलकी असल्याने नेसली की नाही हेही कळत नाही. इतकेच काय यामध्ये मिळणारे पेस्टल आणि व्हायब्रंट कलर तुमचा लूक पूर्ण चेंज करतात. तर या प्रकाराचे नाव आहे मल, यालाच मसलिन किंवा मलमल असेही म्हटले जाते. प्रोफेशनल मीटींग असो नाहीतर एखादे फंक्शन ही साडी अतिशय सुंदर दिसते आणि सगळ्यांमध्ये तुम्ही नक्की उठून दिसू शकता. अगदी लो बजेटमध्ये खरेदी करता येणारी आणि परफेक्ट चापून चोपून बसेल अशा या मल साडीविषयी माहिती घेऊया...
१. कोणत्याही ऋतूमध्ये वापरता येईल असा हा साडीचा प्रकार प्रकार आहे. कॉटन असल्याने उन्हाळ्यात या साडीमुळे थंड वाटते तर थंडीत या साडीमुळे उब मिळते.
२. पारंपरिक सुती कापड असूनही मॉडर्न लूक देणारा हा प्रकार कोणत्याही वयोगटातील महिलांना चांगलाच दिसतो.
३. थोडे ट्रेंडी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातले तर ही साडी आणखी उठून दिसू शकते.
४. यामध्ये प्लेन आणि प्रिंटेड असे दोन्हीही प्रकार पाहायला मिळतात. या प्रकारातील ब्लॉक प्रिंटच्या साडीला तरुणींमध्ये मोठी पसंती असल्याचे पाहायला मिळते.
५. कॉटन असल्याने अंगाला चोपून बसणारा मल साडी हा प्रकार सध्या भलताच ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये तुम्ही बारीक दिसायलाही मदत होते.
६. मल कॉटन हे कपड साधरणपणेा हातावर तयार केलेले कापड असल्याने अतिशय टिकाऊ असते.
७. प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये तयार होणारी ही साडी आता भारतात सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे.
८. मल कॉटन वजनाला हलके असल्याने त्यामध्ये बिनधास्त वावरणे शक्य होते.
९. मल साडीवर ट्रेंडी दागिने अतिशय उठून दिसतात. तसेच ही साडी तुम्हाला एलिगंट तसेच एकदम हटके लूक देतो.
१०. ही साडी इतकी पातळ असते की ती अंगठीतूनही बाहेर निघू शकते. या मल कापडाला मलमल किंवा मसलिन असेही म्हणतात.