Lokmat Sakhi >Shopping > हळदी कुंकवाला वाण म्हणून द्या १५ हटके, टकाटक वस्तू; खर्च अगदी कमी-वस्तूही अत्यंत उपयोगी

हळदी कुंकवाला वाण म्हणून द्या १५ हटके, टकाटक वस्तू; खर्च अगदी कमी-वस्तूही अत्यंत उपयोगी

Makar Sankranti Haldi Kumkum 2024 Vaan Option : (Haldi kunkunsathi Vaan) : वाणासाठी कापडी पिशव्या, कागदी पिशव्या देणं सोपा पर्याय आहे. पिशव्या तुम्हाला १० ते ५० रूपयांच्या आत मिळतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 10:14 AM2024-01-15T10:14:29+5:302024-01-15T17:12:46+5:30

Makar Sankranti Haldi Kumkum 2024 Vaan Option : (Haldi kunkunsathi Vaan) : वाणासाठी कापडी पिशव्या, कागदी पिशव्या देणं सोपा पर्याय आहे. पिशव्या तुम्हाला १० ते ५० रूपयांच्या आत मिळतील.

Makar Sankranti Haldi Kumkum Vaan Option : Best Vaan Ideas For Haldi Kumkum Gift Ideas For Haldi Kum Kum | हळदी कुंकवाला वाण म्हणून द्या १५ हटके, टकाटक वस्तू; खर्च अगदी कमी-वस्तूही अत्यंत उपयोगी

हळदी कुंकवाला वाण म्हणून द्या १५ हटके, टकाटक वस्तू; खर्च अगदी कमी-वस्तूही अत्यंत उपयोगी

हळदी कुंकवाच्या (Haldi Kumkum 2024) कार्यक्रमाचं आकर्षण असते ते म्हणजे तुम्हाला वाण म्हणून कोणती वस्तू मिळणार. (Haldi Kum kum Vaan) मकर संक्रांतीपासून (Makar Sankranti) हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरूवात होते. (Best Vaan Ideas For Haldi Kumkum) तिळाचे लाडू, फुलं, पुस्तक हे सर्व काही सेम असते पण प्रत्येक घरात वेगळं असतं ते म्हणजे वाण. (Haldi Kumkum Vaan Option) वाणासाठी जर तुम्ही कमी खर्चात उत्तम वस्तू शोधत असाल वाण म्हणून देण्यासाठी काही खास १५ वस्तूंचे पर्याय पाहूया. (Haldi Kumkum Gift Ideas in Low Budget)

१) हळदी कुंकवाच्या दिवशी बायकांना वाण म्हणून देण्यासाठी तुम्ही हॅण्ड बॅग्जची निवड करू शकता.  ५० रूपयांपासून ते २०० रूपयांपर्यंत तुम्हाला आकर्षक लहान, मोठया आकाराच्या हॅण्ड बॅग्स मिळतील

२) साडी कव्हर, पिलो कव्हर किंवा फ्रिजचे कव्हर वाण म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.  ५० ते १५० रूपयांच्या आत रूपयात तुम्हाला आकर्षक कव्हर्स मिळतील. 

३) हळदी कुंकवाला आलेल्या बायकांना तुम्ही हातातले कडे किंवा  बांगड्यांचा सेटही गिफ्ट करू शकता. पण बांगड्याची साईज वेगवेगळी असल्यामुळे गोंधळ होऊ शकतो म्हणून एकाच साईजचे एडजस्टेबल कडे घ्या.

४) आर्टिफिशयल मंगळसुत्र तुम्हाला १०० ते ५०० रूपयांच्या रेंजमध्ये चांगल्या डिजाईन्समध्ये मिळेल, तुम्हाला आवडेल त्या पॅटर्नचे सिल्व्हर किंवा गोल्ड मंगळसुत्र तुम्ही देऊ शकता. 

५) नेलपेंट हा वाण म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय आहे.  १० रूपयांपासून १०० रूपयांपर्यंत तुम्ही हव्या त्या रंगाच्या नेलपेंट्स घेऊ शकता.

६) स्टिलचे डबे, प्लेट किंवा ताट वाणासाठी परफेक्ट आहे. याचा वापरही बराच केला जातो.

७) आपण कुठेही गेलो तरी पाण्याची बॉटलसोबत घेऊन जातोच. हळदी कुंकवासाठी आलेल्या महिलांना तुम्ही पाण्याच्या बॉटल्स देऊ शकता.

८) कपड्यांचे किंवा भांड्याचे साबण  रोजच्या वापरात असतात.  तुम्ही तुम्हाला आवडेल त्या साबणाच्या वड्या हळदी कुकंवाच्यासाठी आलेल्या महिलांना देऊ शकता.

९) निऱ्याची पीन किंवा हेअर ब्रॉचसुद्धा बायकांना वापरायला खूप आवडते. खड्यांच्या पिना तुम्ही वाणासाठी आणू शकता.

१०) साबण ठेवण्याचे स्टॅण्ड  तुम्हाला १० ते २० रूपयांपासून  १०० रूपयांपर्यंत सहज उपलब्ध होतील.  

हळदी कुंकवासाठी घ्या २० रूपयांपेक्षाही कमी किमतीत स्वस्त सुंदर वस्तूंचे पर्याय

११) हळदी कुकुंवाला वाण म्हणून देण्यासाठी बेडशीटसुद्धा उत्तम पर्याय आहे. तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर तुम्ही १०० रूपयांपासून  ते ३०० रूपयांपर्यंतच्या कोणत्याही बेडशीट घेऊ शकता.

१२) अर्धा किलो एक किलो गूळ, साखर किंवा शेंगदाणे तुम्ही वाणात देऊ शकता. या वस्तू प्रत्येकाच्याच  घरात वापरल्या जातील.

१३) वाणासाठी कापडी पिशव्या, कागदी पिशव्या देणं सोपा पर्याय आहे. पिशव्या तुम्हाला १० ते ५० रूपयांच्या आत मिळतील.

नेहमी तेच तेच वाण कशाला? हळदी कुकूंवाला ५० रूपयांच्या आत द्या 'या' उपयोगी वस्तू; वाणाचे युनिक ऑपश्न

१४) प्लास्टीकचे बाऊल, प्लास्टीकच्या वाट्या वाणात देऊ शकतात. रोजच्या वापरासाठी उपयोगात येतील.

१५) स्टिलचे चमचे किंवा कुंकवाचा करंडा  हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वाण म्हणून देऊ शकता.

Web Title: Makar Sankranti Haldi Kumkum Vaan Option : Best Vaan Ideas For Haldi Kumkum Gift Ideas For Haldi Kum Kum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.