Join us  

आता ऑनलाइनही मिळतात हलव्याचे सुंदर दागिने, घरबसल्या करा खरेदी -पाहा ३ देखणे पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2024 3:55 PM

Makar Sankranti Halwa Dagine traditional Jewellery online shopping : एका क्लिकवर खरेदी करता येतील असे हलव्याचे सुंदर दागिने

संक्रांत सण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाला तीळगूळ, गुळाची पोळी, काळे कपडे, हलव्याचे दागिने, पतंग यांना विशेष महत्त्व असते. लग्नानंतर किंवा जन्मानंतरचा पहिला संक्रांत सण असेल तर तेव्हा हा सण जास्त उत्साहात साजरा होतो. नव्याने लग्न झालेल्या महिला संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात आणि हौस म्हणून हलव्याचे दागिनेही घातले जातात. या दिवशी नातेवाईक, मैत्रिणी, शेजारी अशा महिलांना बोलवून हळदीकुंकू करण्याची आणि त्यांना वाण देण्याचीही पद्धत आहे (Makar Sankranti Halwa Dagine traditional Jewellery online shopping) . 

लहान मुलांचेही संक्रांतीच्या काळात बोरन्हाण केले जाते. त्यावेळी त्यांनाही हलव्याचे दागिने घालून सजवले जाते. हे दागिने एकदाच घातले जातात आणि ते टोचत असल्याने जास्त काळ ठेवलेही जात नाहीत. तसेच अनेकींना ते जास्तीत जास्त नाजूक डिझाईन्सचे हवे असतात. रोजच्या धावपळीत बाजारात जायला वेळ नसेल तर ऑनलाईनही हल्ली हे हलव्याच्या दागिन्यांचे वेगवेगळे पॅटर्न अगदी सहज मिळतात. पाहूयात असेच काही दागिन्यांचे छान आणि स्वस्तात मस्त पर्याय...   

१. पारंपरिक हलव्याचे दागिने

तीळगुळ म्हणजेच हलव्याला संक्रांतीला विशेष महत्त्व असते. काटेरी हलवा वापरुन तयार केलेले हे दागिने कौतुक म्हणून पहिल्या वर्षी तरी घातलेच जातात. पांढऱ्या रंगाचे हे दागिने काळी साडी किंवा कपड्यांवर विशेष खुलून दिसतात. यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्सचे दागिने बाजारात आणि ऑनलाईनही उपलब्ध असतात. अगदी स्वस्तात मस्त ३०० रुपयांत मिळणारा हा सेट एकदा पाहाच.

https://bit.ly/3RNx8es

२. लहान मुलींसाठी दागिने 

पहिला संक्रांत सण असलेल्या लहान मुलींसाठीही दागिन्यांचे अतिशय सुंदरप प्रकार ऑनलाईन उपलब्ध आहेत. अतिशय नाजूक असे हे हलव्याचे दागिने लहान बाळांना अतिशय छान दिसतात. 

https://bit.ly/3NTkMAg

३. हळदीकुंकवासाठी दागिन्यांचा सेट

लग्नानंतरचा पहिला संक्रांत सण असेल तर तो साजरा करण्याची पद्धत आहे. काळी साडी आणि हलव्याचे दागिने घालून महिलांना हळदीकुंकवाला बोलावले जाते. अशावेळी पारंपरिक हलव्याचे दागिने घालायचे असतील तर अगदी स्वस्तात मस्त असे हे दागिने खरेदी करता येऊ शकतात. यामध्ये अगदी वाकीपासून ते कंबरपट्टा आणि मुकूट असे सगळे दागिने मिळतात.

https://bit.ly/3SdjcvK

टॅग्स :खरेदीमकर संक्रांतीदागिने