जीवनशैलीमध्ये झालेला बदल, आहारात झालेला बदल यांचा परिणाम तब्येतीवर जसा होतो, तसाच तो केसांवरही होतोच. त्यामुळेच तर हल्ली केसांमध्ये कोंडा होणं, केस कोरडे होऊन त्यांचं टेक्स्चर खराब होणं आणि केस गळणं अशा समस्या सामान्यपणे बहुतांश लोकांमध्ये आढळून येतात. प्रत्येक समस्येवर वेगवेगळा उपाय करणे शक्य नसते. म्हणून या तिन्ही समस्यांवर एकच तोडगा मिळाला, तर तो सगळ्यांनाच हवा आहे. म्हणूनच हा Mamaearth BhringAmla Shampoo वापरून पहा. आवळा आणि भृंगराज या औषधी वनस्पतींपासून तयार झालेला हा शाम्पू योग्य पोषण देऊन केसांच्या अनेक तक्रारी कमी करतो.
Mamaearth BhringAmla Shampoo ची वैशिष्ट्ये१. Mamaearth BhringAmla Shampoo मध्ये भृंगराज, आवळा यासोबतच इतर अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या केसांच्या समस्येवर गुणकारी ठरतात.
२. क्षीरपाक विधीनुसार या शाम्पूची निर्मिती तयार करण्यात आली आहे. ही एक आयुर्वेदिक पद्धती असून यामध्ये क्षीर म्हणजेच दूध याचा वापर केला जातो. दूध आणि इतर वनस्पती यांच्या मदतीने हा शाम्पू तयार करण्यात आल्याचं सांगितली जातं.
३. Mamaearth BhringAmla Shampoo मध्ये केसांना किंवा त्वचेला घातक ठरणारे पॅराबिन्स, मिनरल ऑइल्स असे कोणतेही घातक केमिकल्स नाहीत. त्यामुळे हा एक सुरक्षित शाम्पू आहे.
कोणासाठी विशेष उपयुक्त१. १५ वर्षांवरील स्त्री- पुरुष हा शाम्पू वापरू शकतात. सगळ्याच प्रकारच्या केसांसाठी हा शाम्पू उपयुक्त आहे.
२. केस गळणं, केसांमध्ये कोंडा होणं, केस खूप चिकट असणं अशा समस्या ज्यांना आहेत त्यांच्यासाठी हा शाम्पू उत्तम आहे.
व्हॅल्यू फॉर मनीया शाम्पूचा २५० मिलीचा पॅक ३४९ रुपयांना मिळतो. वजनानुसार किंमत बदलत जाते. किंमत आणि उपयोग यासाठी हे प्राॅडक्ट उत्तम आणि डर्मिटॉलॉजिकली टेस्टेड आहे.
रेटिंग : 4 ****