मार्गशीर्ष महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. या महिन्याला खूप धार्मिक महत्त्व आहे. विशेषत: या महिन्यात देवी लक्ष्मीची आणि श्री विष्णूंची उपासना केली जाते. अनेक महिला मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करतात (Margashirsha Guruvar Vrat 2024). या व्रतामध्ये कलश स्थापन करून त्याला श्री लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते. कलशावर जो नारळ ठेवला जातो, त्यावर लावण्यासाठी हल्ली बरेच प्रकारचे देवीचे मुखवटे मिळतात. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यानिमित्त अनेकजणी मुखवट्यांची, देवीला नेसविण्याच्या छोट्या साड्यांची खरेदी करतात (Margashirsha Guruvar Vrat deviche mukhavate). आता ही खरेदी करण्यासाठी तुम्हाला बाजारात जायला वेळ नसेल तर देवीचे मुखवटे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता. अगदी घरबसल्या मनासारखी खरेदी करण्यासाठी देवीच्या मुखवट्यांचे हे काही पर्याय पाहा..(deviche mukhavate online shopping for Margashirsha Guruvar Vrat 2024)
मार्गशीर्ष गुरुवारसाठी देवीच्या मुखवट्यांची ऑनलाईन खरेदी
१. अंबाबाईचा मुखवटा
मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी कोल्हापुरच्या अंबाबाईचा मुखवटा घेण्याचा विचार असेल तर हा एक सुंदर पर्याय पाहा. अगदी हुबेहूब कोल्हापुरच्या महालक्ष्मीच्या मुखवट्यासारखा हा मुखवटा असून देवीचा टोप आणि गळ्यातला दागिना अतिशय सुबक, रेखीव आहे.
डॉक्टर सांगतात हिवाळ्यात मुलांना सर्दी- खोकला झाल्यास तुपात २ गोष्टी टाकून द्या- चटकन बरं वाटेल
हा मुखवटा ८ इंच उभा आणि ५ इंच आडवा आहे. याचे वजन २६० ग्रॅम असून तो २१०० रुपयाला ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतो आहे. मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी दरवर्षी देवीचे मुखवटे बदलले जात नाहीत. त्यामुळे थोडे जास्त पैसे देऊन एकदाच उत्तम खरेदी करायची असेल तर हा पर्याय चांगला आहे.
Click To Buy:
https://amzn.to/3VkoIO1
२. संतोषी मातेचा मुखवटा
थोडा कमी किमतीचा मुखवटा पाहिजे असेल तर हा एक पर्याय तुम्ही पाहू शकता. हा मुखवटा पॉलीफायबर प्रकारचा असून तो १६ सेमी उंच तर १० सेमी रुंद आहे.
हिवाळ्यात अंगावर पित्त येऊन खूप खाज सुटते? बघा का होतो शीतपित्ताचा त्रास आणि त्यावरचे उपाय
या देवीची मुद्रासुद्धा अतिशय प्रसन्न असून तिचे दागिनेही खूप रेखीव आणि आकर्षक आहे. हा मुखवटा सध्या ४९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे.
Click To Buy:
https://amzn.to/41c9DSm