Join us  

पावसाळ्यात चटकन वाळणारे कपडे खरेदी करायचे आहेत? ही घ्या लिस्ट, करा बजेट खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 6:31 PM

Shopping Tips For Monsoon Season: पावसाळ्यात कपडे असे हवेत की आपण भिजलो तरी कपडे मात्र चटकन वाळायला हवेत.. त्यामुळेच खास पावसाळ्यासाठी कपड्यांची खरेदी करणार असाल तर हे घ्या काही पॉकेट फ्रेंडली पर्याय..

ठळक मुद्देपावसाळ्यात आपले कपडे असे असावेत की त्यांच्यातला ओलसरपणा फार काळ टिकून राहणार नाही आणि ते चटकन वाळतील.

पावसाळ्यात सहसा असं होतं की घरातून एकदा बाहेर पडल्यावर कधी पाऊस आपल्याला गाठेल आणि आपण ओले होऊ हे काही सांगता येत नाही. बरं ऑफिस, कॉलेज, इतर काही महत्त्वाची कामं यांच्या वेळा ठरलेल्या असतात. त्यामुळे त्या वेळेला पाऊस (monsoon special tips) असो अथवा नसो, घरातून बाहेर पडावंच लागतं. रेनकोट, छत्री घेऊन बाहेर पडलं तरी थोड्याफार प्रमाणात कपडे ओले होतातच. म्हणूनच पावसाळ्यात आपले कपडे (fabric that dries easily in monsoon) असे असावेत की त्यांच्यातला ओलसरपणा फार काळ टिकून राहणार नाही आणि ते चटकन वाळतील. (Monsoon Shopping with minimum budget)

 

असे कपडे घ्यायचे म्हणजे नायलॉन, पॉलिस्टर आणि सिल्क अशा प्रकारचे कपडे आपण निवडायला हवेत. काॅटन आणि होजिअरी हे दोन पर्याय पावसाळ्यासाठी अजिबातच योग्य नाहीत. आता सिल्क घालून तर आपण काही पावसात जाऊ शकत नाही. त्यामुळे मग पॉलिस्टर आणि नायलॉन हे २ प्रकारचे कपडेच आपल्यासाठी योग्य आहेत. पॉलिस्टर आणि नायलॉनचे कुर्ते आपण या दिवसांत घेऊ शकतो. टॉप घेतले तर त्यासोबत जीन्स घालावी लागणार. पण पावसात भिजलो, तर जीन्स अजिबातच आरामदायी असत नाही. म्हणूनच पॉलिस्टर आणि नायलॉनच्या कपड्यांमध्ये उपलब्ध असणारे हे काही ऑप्शन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता. किंवा मग टॉप घेतले तर ते जीन्सऐवजी स्कर्टवर घालू शकता. 

 

खरेदीसाठी काही उत्तम पर्याय..१. अशा प्रकारचा ए- लाईन कुर्ता एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हा कुर्ता पॉलिस्टरचा असल्याने वजनाने हलका आहे. शिवाय ओला झाला तरी तो चटकन वाळेल. या कुर्त्याचा रंग बऱ्यापैकी गडद आहे. त्यामुळे माती, चिखल असे काही डाग पडलेच, तर ते लगेच उठूनही दिसणार नाहीत. हा कुर्ता ३४५ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे. खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करू शकता. Click To Shop: https://bit.ly/3z0zjSy

 

 

२. कुर्ता, टॉप यापेक्षा अशा पद्धतीचा वनपीस देखील तुम्ही या दिवसांत ट्राय करू शकता. हा वनपीस खूप पायघोळ नसल्याने खालच्या बाजूने पाण्यात, मातीत भिजणार नाही. शिवाय हा सिल्क पॉलिस्टर या प्रकारातला आहे. त्यामुळे पाण्यात वापरूनही खराब होणार नाही. ऑनलाईन शॉपिंग साईटवर तो ४९५ रुपयांना उपलब्ध असून खरेदी करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.Click To Shop:https://bit.ly/3ITx0Fh

 

 

३. जीन्स, कॉटन पॅण्ट याऐवजी पावसाळ्यात अशा प्रकारचे स्कर्टही तुम्ही वापरू शकता. या स्कर्टचं मटेरियल पॉलिस्टर, नायलॉन मिश्रित असल्याने त्यावर पाणी पडलं तरी ते चटकन ओघळून जाईल आणि ओलावा फार काळ टिकून राहणार नाही. २९९ रुपयांना हा स्कर्ट ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Click To Shop:https://www.amazon.in/dp/B097RM832P

 

टॅग्स :खरेदीमानसून स्पेशलपाऊसऑनलाइन