आई ही प्रत्येकाच्या जीवनातील अनमोल व्यक्ती असते. ज्याचे वर्णन शब्दात करता येत नाही. असे म्हणतात की देव सर्वांसोबत राहू शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली. आई ही एक देवदूत असते जी आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठ्या गरजा पूर्ण करते. (Mother's Day 2022) आईचे जीवनातील महत्त्व शब्दात वर्णन करणे कोणासाठीही अवघड आहे. पण तरीही वर्षातील एक दिवस आईच्या नावाने केला जातो. (What is the best thing to gift on Mother's Day) जो आपण मदर्स डे म्हणून साजरा करतो.
यंदा 8 मे रोजी मातृदिन साजरा केला जाणार आहे. (Gift Ideas For Mother's day 2022) या निमित्ताने तुम्ही आईला काही भेटवस्तू गिफ्ट देऊ शकता. रोज आई आपल्यासाठी राबराब राबते, हीच वेळ आहे तुम्ही तिच्यासाठी काहीतरी करू शकता. या लेखात तुम्हाला मदर्स डे निमित्त काही कमीत कमी खर्चातील गिफ्ट आयडियाज सांगणार आहोत. (What are some ideas to do for Mother's Day)
1) पुष्पगुच्छ
साधेपणाने मदर्स डे साजरा करण्यात काहीच चुकीचं नाही पण त्यातही हटके ट्विस्ट असावा. सकाळी तिला तिच्या आवडत्या फुलांचा पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा द्या. तुम्ही गुलाब, लिली, ऑर्किड किंवा ट्यूलिप सारख्या विविध प्रकारच्या सुंदर फुलांमधून निवड करू शकता. ते ताजे आणि रंगीत असल्याची खात्री करा. ५०० रूपयांच्या आत तुम्हाला हा बुके मिळू शकेल.
2) ज्वेलरी
दागिने कोणाला आवडत नाहीत? मदर्स डेच्या दिवशी तुमच्या आईला भेट तिला आवडत असलेली कोणतीही ज्वेलरी देऊ शकता. अंगठी, ब्रेसलेट, नेकलेस, मंगळसुत्र, पैंजण इत्यादी पर्याय निवडू शकता. तुमचा बजेट जास्त असेल तर तुम्ही तिला डायमंड सेटही देऊ शकता.
3) सौंदर्य उत्पादनं
घरातील सर्व गोष्टी सांभाळत असताना बहुतेकदा माता त्यांच्या त्वचेची आणि सौंदर्याची काळजी घेणे विसरतात. मग या मदर्स डे ला तुम्ही तुमच्या आईला स्किनकेअर किट किंवा मेकअप किंवा केशभूषेची साधने आणि उपकरणे देऊ शकता. तिच्यासोबत चांगला वेळ घालवा.
4) परफ्यूम किंवा इतर वापरातील वस्तू
पर्स, सनग्लासेस, परफ्यूम किंवा एखादी साडी तुम्ही आईला गिफ्ट करू शकता. बाजारात किंवा ऑनलाईन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध होतील. ५०० ते १००० रूपयांच्या आत तुम्ही एकापेक्षा एक वस्तू भेट देऊन आईला खूष करू शकता.
5) आवडीचं जेवण बनवा
आई तुम्हाला उत्तम आणि चविष्ट अन्न खायला देण्याचा प्रयत्न करते, मग ती बरी असो वा नसो. या मदर्स डेला तुमच्या आईला सरप्राईज देण्यासाठी, तिच्या आवडीचे जेवण तिच्या स्वत: च्या शैलीत तयार करा आणि सर्व्ह करा. हे पाहून आईला खूप आनंद होईल. या दिवशी, स्टार्टरपासून मिष्टान्न पर्यंत अन्न तयार करा आणि आईला विशेष अनुभव द्या.
6) साडी गिफ्ट करा
जर तुमच्या आईला साड्यांचे कलेक्शन ठेवण्याची खूप आवड असेल तर तुम्ही तिला या दिवशी एक उत्तम सिल्क साडी भेट देऊ शकता. विशेषतः, कांचीवरम, जी हलकी आणि स्टाइलिश आहे. तुमची आई नोकरी करत असो किंवा गृहिणी असो, साडी ही भारतातील प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती असते. ही अशी शैली आहे जी कधीही फॅशनच्या बाहेर नसते. यासाठी आईच्या आवडीची साडी विकत घ्या आणि साडीसोबत एक गोंडस संदेश लिहिलेले कार्ड देखील द्या आणि जेव्हा आई हे गिफ्ट उघडेल तेव्हा ती आनंदी होईल आणि तुमचा प्रेमळ संदेश वाचेल आणि तुम्हाला प्रेमाने मिठी मारेल.