आपण पॅक फूडचे डबे विकत आणतो. पनीर आणतो, चीज, बिस्किटे, फरसाण. कितीतरी खाद्यपदार्थ विकत आणतो. पण ते आणताना आपण बारकाईने त्यावरची एक्सपायरी डेट कधी तपासून पाहतो का? क्वचित कधी असं झालं की एक्सपायर झालेले पदार्थ जर आपल्याकडे आले तर आपण काय करायचं? दुकानदार बदलून देत नसेल, दाद देत नसेल तर काय करता येईल?
(Image : google)
कायदा काय म्हणतो?पॅकबंद वस्तूंच्या नियमांनुसार (1977) पॅकबंद खाद्यपदार्थांच्या वेष्टणावर पॅकिंगची तारीख आणि तो किती दिवसात वापरावा ( यूज बिफोर / बेस्ट बिफोर ) याची मुदत छापणं बंधनकारक आहे. या मुदतीनंतर किंवा तारखेनंतर तो माल विकणं हा गुन्हा आहे. मात्र तरीही अनेकदा मुदत संपत आलेले खाद्यपदार्थ अगदी सवलतीच्या दरात विकले जाताना दिसतात.
एक्सपायरी डेट होवून गेलेला पदार्थ घरी आला तर?
१. दुकानदाराकडे जाऊन तक्रार करुन तो डबा बदलून मागावा.२. त्यासह कंपनीच्या कस्टमर केअरकडे तक्रार करावी कारण मुदतबाह्य पदार्थ विकले जातात याची नोंद झाली पाहिजे. सोबत त्या डब्याचं, पॅकचं छायाचित्र जोडावं.३. नियंत्रक , वैध मापन शास्त्र , प्रशासकीय कुटीर क्रमांक- 7, फ्री प्रेस जर्नल मार्ग नरीमन पॉईंट , मुंबई ४०००२१ .या पत्त्यावर लेखी तक्रार करता येते. शिवाय dclmms _complaints@yahoo.com या मेल आयडीवर तक्रारीचा मेलही करता येईल.
(Image :google)
खरेदी करताना काय काळजी घ्यायची?
१. किंमतीत सूट, मोफत भेटवस्तू , एकावर एक फ्री यासारख्या योजनांचा फायदा घ्यायला हरकत नाही. परंतु एक्सपायरी डेट चेक करुनच विकत घेणं योग्य.२. खरेदी करताना किंमत, बेस्ट बिफोर, मुदत यासगळ्याचा विचार करुनच वस्तू घ्या. खराब वस्तू निघाली तर तक्रार करा. फसवणूक टाळा.