Join us

नवरात्रीसाठी साडी खरेदी करताय? ३ गोष्टी लक्षात ठेवा, स्वस्तात मस्त साडी मिळेल चटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2024 14:20 IST

Navratri 2024 : Navratri special saree shopping : साडी खरेदी सोपी होण्यासाठी लक्षात ठेवायला हव्यात अशा महत्त्वाच्या टिप्स

साड्यांची खरेदी म्हणजे तमाम महिला वर्गासाठी अतिशय आवडीची गोष्ट. साडी घ्यायला त्यांना काही ना काही निमित्त हवे असते. कधी कोणाचे लग्न म्हणून, कधी घरातला एखादा कार्यक्रम म्हणून तर कधी सणवार म्हणून. काही ना काही कारणाने त्या साडी खरेदी करतातच. मग ती अगदी रोजच्या वापराची साडी असो किंवा काठापदराची नाहीतर डिझायनर हेवी साडी असो. नवरात्रीच्या दिवसांत तर सध्या नऊ दिवस रोज वेगळ्या रंगाच्या साड्या नेसण्याची नवीनच संकल्पना जोर धरु लागली आहे (Navratri 2024 : Navratri special saree shopping). 

या निमित्ताने किंवा सहज म्हणूनही काही जणी साडीची खरेदी करतात. आता साडीची खरेदी म्हणजे बरेच वेळखाऊ काम असे अनेकांना वाटते. भरपूर वेळ आणि पैसे देऊनही अनेकदा आपल्या मनासारखी साडी आपल्याला मिळतेच असे नाही. पण काही गोष्टींचे नीट नियोजन करुन गेल्यास आपण झटपट आणि मनासारखी साडी नक्की घेऊ शकतो. त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पाहूया...

(Image : Google)

१. बजेट ठरवा

आपल्याला नक्की किती रुपयांपर्यंत साडी घ्यायची आहे हे आधी नक्की केलेले असायला हवे. त्या बजेटमध्ये एकच साडी घ्यायची की २-३ साड्या घ्यायच्या याचाही विचार साधारणपणे आधीच करुन ठेवा. यामुळे तुम्हाला साडी घेताना गडबड होणार नाही. बजेट थोडेसे पुढे मागे झाले तर ठीक पण खूपच जास्त झाले तर मात्र नंतर आपण इतकी जास्त खरेदी केली असं आपल्याला वाटू शकतं. तसंच एकदा बजेट नक्की असेल तर आपल्या दुकानदारांनाही त्याप्रमाणे साडी दाखवा असे सांगता येऊ शकते. 

२. रंग, उंची यानुसार प्रकार ठरवा

आपल्या त्वचेचा पोत कसा आहे हे लक्षात घेऊन आपण साडीच्या रंगाची निवड करायला हवी. अनेकदा दुकानांमध्ये खूप जास्त दिवे लावलेले असल्याने त्याठिकाणी साडीचा रंग वेगळा दिसतो. पण बाहेर सूर्यप्रकाशात आल्यावर याच साडीचा रंग वेगळा दिसतो. त्यामुळे आपल्याला रंगाचा अंदाज येत नसेल तर आपण दुकानाबाहेर येऊन रंग पाहावा. तसेच काहीवेळा फिरता रंग असतो, ब्लाऊज कॉन्ट्रास्ट असतो, हे सगळे पाहून मगच साडीची खरेदी करावी. 

(Image : Google)

३. साडीचा पोत

साडी खरेदी करताना आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे साडीचा पोत. आपण बरेचदा रंग, डीझाईन याकडे लक्ष देतो पण पोत फारसा पाहिला जात नाही. मात्र साडीचा पोत अतिशय महत्त्वाचा असून त्याकडे लक्ष द्यायला हवे. साडी नेसायला सोपी, वजनाला हलकी आणि तरीही चोपून बसणारी असेल तर ती नेसायचा कंटाळा येत नाही आणि त्रासही होत नाही. त्यामुळे साडी कोणत्या ऋतूमध्ये घेतो, कोणत्या कार्यक्रमासाठी घेतो हे सगळे लक्षात घेऊन त्याप्रमाणे साडी घ्यायला हवी. 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४नवरात्रीसाडी नेसणेखरेदी