Join us  

नवरात्रात गरब्यासाठी घागरा खरेदी करायचा? पाहा लेटेस्ट पॅटर्न्स, निवडा परफेक्ट ट्रेण्डी घागरा झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2023 5:36 PM

Navratri Garba Dance Ghagra Dress Online Shopping : घागरा खरेदीसाठी त्याची कलर कॉम्बिनेशन, किमती, डिझाईन्स माहित असायला हव्यात.

नुकतेच गणपती संपले आणि अवघ्या १० दिवसांवर नवरात्रीचा सण आला. नवरात्री म्हणजे नऊ रात्री चालणारा देवीचा उत्सव. देवीची आराधना करतानाच आपण तिच्यासाठी उपवास, मनोभावे आरत्या, भोंडला, गरब्याचा डान्स असे एक ना अनेक प्रकार करतो. गरबा हा गुजरातमधील प्रसिद्ध नृत्यप्रकार  असला तरी आता भारतातच नाही तर जगातही हा गरबा अतिशय आवडीने खेळला जातो. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळेच या नृत्याचा आनंद घेताना दिसतात. हल्ली बऱ्याच ठिकाणी गरबा नाईटचेही आयोजन केलेले दिसते. याठिकाणी ग्रुपने गरबा सादरीकरण, जेवण, बक्षिसे असा भला मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. गरबा म्हटल्यावर त्याला साजेल वेषही हवाच (Navratri Garba Dance Ghagra Dress Online Shopping). 

चनिया चोळी किंवा घागरा, त्यावर मोठ्या आकाराचे दागिने, भरपूर बांगड्या असे सगळे घालून गरबा खेळताना येणारी मजा काही औरच. यंदाच्या वर्षी तुम्हीही गरबा खेळायला जाणार असाल आणि परफेक्ट पारंपरिक लूक करण्याचा विचार करत असाल तर आज आपण खास नवरात्रीसाठी शॉपिंगचे पर्याय पाहणार आहोत. घागरा खरेदीसाठी त्याची कलर कॉम्बिनेशन, किमती, डिझाईन्स माहित असायला हव्यात. बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ नसेल तर घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग करुन तुम्ही तुम्हाला हवा तसा स्वस्तात मस्त घागरा खरेदी करु शकता. पाहूया या खरेदीसाठीचे काही हटके पर्याय.    

१. गरबा म्हटल्यावर त्याला पारंपरिक गडद रंगाचे कॉम्बिनेशन असलेला आणि आरसे किंवा टिकल्या असलेला घागरा हवा. असा घोळदार घागरा त्यावर ब्लाऊज आणि छानशी ओढणी याने हा लूक पूर्ण होतो. लाल आणि काळ्या रंगाचे हे कॉम्बिनेशन अतिशय उठावदार दिसते. यावर सिल्व्हर रंगाची ज्वेलरी छान उठून दिसू शकते. 

Click To Buy :

https://bit.ly/3ti1mgW 

२. अतिशय स्वस्तात मस्त असा सेमी स्टीच घागरा पाहात असाल तर हिरव्या आणि लाल रंगाच्या कॉम्बिनेशनमधला सिल्कच्या कापडाचा हा घागरा चांगला पर्याय ठरु शकतो. वजनाला हलका असल्याने गरबा खेळणेही सोपे जाते. त्यावरील पारंपरिक पानाफुलांच्या डीझाइनमुळे त्याला एकप्रकारचा वेगळाच गेटअप येतो. 

Click To Buy :

https://bit.ly/3LP8PdA

३. पारंपरिक आणि तरीही थोडा वस्टर्न लूक देणारा घागरा बघत असाल तर असा कलरफूल घागरा खूप मस्त दिसेल. कोणत्याही स्कीन टोनवर सूट होणाऱ्या या घागऱ्याचा घरही भरपूर असल्याने गरबा खेळताना त्याला वेगळाच गेट अप येईल. यावर तुम्ही तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची ओढणी पेअर करु शकता. 

Click To Buy :

https://bit.ly/46kA3RU

४. गडद निळ्या आणि गुलाबी रंगाचा सिल्कच्या कापडाचा घागरा घातल्यास आपला लूक खुलून येतो. रंग गडद असल्याने आपण त्यात उठून दिसू शकतो. अशा रंगांमध्ये फोटोही छान येतात आणि वजनाने हे कापड हलके असल्याने नाचायला त्रास होत नाही. 

Click To Buy :

https://bit.ly/3LPvvuj

टॅग्स :खरेदीनवरात्रीगरबा