Lokmat Sakhi >Shopping > नवरात्र स्पेशल : कुमारीकांना देण्यासाठी ५०-१०० रुपयांचे पर्याय, खरेदी सोपी-मुलीही खूश...

नवरात्र स्पेशल : कुमारीकांना देण्यासाठी ५०-१०० रुपयांचे पर्याय, खरेदी सोपी-मुलीही खूश...

Navratri Special : Kumarika pujan gift ideas for gils shopping : खरेदी करायला जाताना डोक्यात काही पर्याय असतील तर खरेदीचे काम होईल सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2024 11:07 AM2024-09-29T11:07:07+5:302024-09-30T14:22:04+5:30

Navratri Special : Kumarika pujan gift ideas for gils shopping : खरेदी करायला जाताना डोक्यात काही पर्याय असतील तर खरेदीचे काम होईल सोपे

Navratri Special Kumarika pujan gift ideas for gils shopping : Rs 50-100 options to give to girls, shopping is easy - girls are also happy... | नवरात्र स्पेशल : कुमारीकांना देण्यासाठी ५०-१०० रुपयांचे पर्याय, खरेदी सोपी-मुलीही खूश...

नवरात्र स्पेशल : कुमारीकांना देण्यासाठी ५०-१०० रुपयांचे पर्याय, खरेदी सोपी-मुलीही खूश...

नवरात्र हा देशभरात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण. या ९ ते १० दिवसांत देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते. कुमारीका म्हणजेच लग्न न झालेल्या लहान मुली हे देवीचेच रुप असतात असे मानून मुलींची पूजा केली जाते. यावेळी मुलींना प्रेमाने काहीबाही वस्तू दिली जाते. मुली म्हटल्यावर त्यांना देण्याचे बरेच पर्याय असतात. हे जरी खरे असले तरी लहान मुलींना नेमके काय आवडेल, आपल्या बजेटमध्ये काय बसेल या सगळ्याचा विचार करावाच लागतो. बाजारात अशा बऱ्याच वस्तू मिळत असल्या तरी आपण नियोजन करुन बाजारात गेलो तर आपली खरेदी झटपट होते. वेळ आणि श्रमही वाचल्याने सणावाराच्या गोष्टींचा ताण होत नाही. म्हणूनच आज आपण लहान मुलींना कुमारीका म्हणून बोलवल्यावर देता येतील अशा वस्तूंची यादी पाहणार आहोत (Navratri Special : Kumarika pujan gift ideas for gils shopping). 

१. सुकामेवा 

लहान मुलींचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांना पोषक आहार देणे आवश्यक असते. त्यामुळे सुकामेव्याची लहान पाकीटे दिल्यास ते उपयुक्त ठरु शकते. बाजारातून जास्तीचा सुकामेवा आणून आपण ही पाकीटे घरी तयार करु शकतो. किंवा तितकाही वेळ घालवायचा नसेल तर बाजारात हल्ली विविध प्रकारच्या सजावटीची पाकीटे उपलब्ध असतात. 

२. हेअर अॅक्सेसरीज

मुली म्हटलं की त्यांना हेअरबँड, क्लिप्स, हेअर बो अशा गोष्टी आपसूकच आवडत असतात. वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या या गोष्टी सतत लागतातच. हल्ली बाजारात यामध्ये खूप व्हरायटी पाहायला मिळतात. नवरात्रीच्या निमित्ताने मुलींना असे काही दिले तरी त्या खूश होतात आणि त्याचा चांगला वापरही होतो. 

३. स्टेशनरी

शाळेची किंवा अन्य स्टेशनरी ही लहान मुला-मुलींना लागणारी आणखी एक महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे पेन्सिल, रबर, शार्पनर, पट्टी, खडे, फेविकॉल यांसारख्या गोष्टी कितीही आणल्या तरी कमीच असतात. असे सेटही मिळतात, ते दिल्यास मुलींना आवडते आणि रोजच्या वापरासाठी उपयोगीही होते. 

(Image : Google)
(Image : Google)

४. पुस्तक

तुम्हाला थोडं वेगळं काही करायचं असेल तर गोष्टींची, कवितांची, चित्रकलेची, अॅक्टीव्हीटीची पुस्तकं हाही चांगला पर्याय असतो. हल्ली बाजारात स्वस्तात मस्त असं बरंच काही काही मिळतं. मुलांना सतत नवीन नवीन अॅक्टीव्हीटीज लागतात. त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय ठरतो. 

५. पाण्याची बाटली 

लहान मुलांना सतत पाण्याच्या बाटल्या लागतात. शाळेची, क्लासची, बाहेर जायची अशा वेगवेगळ्या बाटल्याही लागतात. बरेचदा मुलांच्या बाटल्या सारख्या तुटतात, हरवतात. त्यामुळे बाटली ही लहान मुलांना आवश्यक असलेली एक महत्त्वाची गोष्ट असते. 

(Image : Google)
(Image : Google)

६. कापड 

लहान मुलींना खणाचे, काठाचे असे फ्रॉक, टॉप फार छान दिसतात. ताग्यातून कापड खरेदी करुन त्याचे कटपीस केले तरी स्वस्तात मस्त काम होऊ शकते. आपल्या आवडीच्या फॅशनचे, मापाचे फ्रॉक मुलींचे पालक शिवून घेऊ शकतात. रेडीमेड कटपीसही कमी किमतीत सहज उपलब्ध होतात. 

Web Title: Navratri Special Kumarika pujan gift ideas for gils shopping : Rs 50-100 options to give to girls, shopping is easy - girls are also happy...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.